The Providence of God बद्दल बायबलमधील वचने: Ordaining the conditions and circumstances of men
Ordaining the conditions and circumstances of men बद्दल वचने
गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात; ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात.
ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्यातून वर उचलून घेतात; ते त्यांना राजपुत्रांबरोबर बसवितात, आणि त्यांना वतन म्हणून सन्मानाचे आसन प्राप्त होते. “कारण पृथ्वीचा पाया याहवेहचा आहे; त्यावरच त्यांनी जग स्थापले आहे.
पूर्वेकडून, पश्चिमेकडून किंवा जंगलातून मनुष्याला स्वतःची उन्नती करता येत नाही.
मात्र परमेश्वरच न्याय करणारे आहेत: ते एकाला खाली पाडतात आणि दुसर्यास उंच करतात.