मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने

163 वचने · 41 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ‘माझे सेनापती सर्व राजे नाहीत काय?’ असे ते म्हणतात.

  2. ‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय? हमाथ अर्पादसारखा आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय?

  3. जशी माझ्या हाताने मूर्तींपूजक राज्ये ताब्यात घेतली, अशी राज्ये ज्यांच्या प्रतिमा यरुशलेम आणि शोमरोनपेक्षा श्रेष्ठ होत्या—

  4. शोमरोन आणि तिच्या मूर्तींबरोबर मी जसा व्यवहार केला तसा व्यवहार मी यरुशलेम आणि तिच्या मूर्तींबरोबर करू नये काय?’ ”

  5. जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन.

  6. कारण ते म्हणतात: “ ‘माझ्या हाताच्या शक्तीने मी हे केले आहे, आणि माझ्या शहाणपणाने हे केले आहे, कारण माझ्याकडे समंजसपणा आहे. मी राष्ट्रांच्या सीमा काढून टाकल्या, मी त्यांचे खजिने लुटले; एका बलवानाप्रमाणे मी त्यांच्या राजांना वश केले.

  7. जसा कोणी घरट्यात पोहोचतो, तसेच राष्ट्रांच्या संपत्तीसाठी माझा हात पोहोचला. जसे लोक सोडून दिलेली अंडी गोळा करतात, तसे मी सर्व देशांना एकत्र केले; कोणीही पंख फडफडविला नाही, किंवा किलबिल करण्यासाठी तोंड उघडले नाही.’ ”

  8. जो कुर्‍हाड फिरवितो त्याच्यावरच कुऱ्हाड उठते काय, किंवा करवतीचा जो वापर करतो त्याच्याचविरुद्ध ती बढाई मारते काय? जसे एखादा व्यक्ती जी काठी उचलतो तीच त्याच्यावर उगारते काय, किंवा जे लाकूड नाही, त्याला धमकावण्यासाठी जड काठी हवेत फिरते काय!

  9. म्हणून, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, त्याच्या दणकट योद्ध्यांवर विनाशकारी रोग पाठवतील; त्यांच्या ऐश्वर्यात धगधगत्या ज्योतीसारखा अग्नी प्रज्वलित केला जाईल अग्नी प्रज्वलित केला जाईल.

  10. इस्राएलचा प्रकाश अग्नी होईल, त्यांचे पवित्र परमेश्वर एक ज्वाला होतील; त्याचे काटे आणि काटेरी झुडपे ते एकाच दिवसात जळतील व भस्म करतील.

  11. मी, याहवेह, त्यावर लक्ष ठेवतो; मी त्याला सतत पाणी देतो. मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करतो जेणेकरून कोणीही त्याला इजा करणार नाही.

  12. ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात, त्याप्रमाणे सर्वसमर्थ याहवेह यरुशलेमची ढाल होतील; ते तिला संरक्षण देऊन सोडवतील, ते त्यांना ओलांडून जातील आणि त्याला सोडवतील आणि त्याचा बचाव करतील.”

  13. माझ्यासारखे कोणी आहे काय? त्याने ते घोषित करावे. त्याने तसे जाहीर करावे आणि माझ्यासमोर प्रस्तुत करावे, मी माझ्या पुरातन लोकांची स्थापना केल्यापासून काय घडले, आणि पुढे काय होणार आहे होय, काय घडणार आहे हे त्यांनी सांगावे.

  14. मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते? मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही? तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय? तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय? मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल! नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो; त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात आणि तहानेने मरतात.

  15. मोशेच्या उजव्या हाताजवळ राहण्यासाठी आपल्या प्रतापी सामर्थ्याची भुजा पाठविणारे, त्यांच्यासमोर समुद्राच्या जलास दुभागून अजरामर किर्ती मिळविली,

  16. जशी गुरे सपाटीवर जातात, तसे याहवेहच्या आत्म्याने त्यांना विसावा दिला. आपले नाव प्रतापी व्हावे म्हणून तुम्ही तुमच्या लोकांचे मार्गदर्शन केले.

  17. “मानवपुत्रा, सोरच्या अधिपतीला सांग: सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘आपल्या अंतःकरणातील गर्वाने तू म्हणालास, “मी देव आहे; देवाच्या आसनावर समुद्राच्या हृदयात मी बसतो.” तुला वाटते की तू देवासारखा सुज्ञ आहे, परंतु तू मानव आहेस आणि देव नाही.

  18. तू दानीएलापेक्षा सुज्ञ आहेस काय? तुझ्यापासून काही गुपित नाही काय?

  19. तुझी सुज्ञता व समज याद्वारे तू आपल्यासाठी संपत्ती मिळविली आणि आपल्या खजिन्यात सोने आणि चांदीचा साठा केलास.

  20. व्यापारातील तुझ्या महान कुशलतेने तू आपले धन वाढविलेस, आणि तुझ्या संपत्तीमुळे तुझे हृदय गर्विष्ठ झाले आहे.

  21. “ ‘यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘कारण तू स्वतःला ज्ञानी, अगदी देवासारखे ज्ञानी समजतोस,

  22. म्हणून मी परकीय लोकांना तुझ्याविरुद्ध आणेन, जे राष्ट्रांमध्ये सर्वात क्रूर आहेत; तुझे सौंदर्य व ज्ञान याविरुद्ध ते त्यांची तलवार उपसतील आणि ती तुझ्या चमकत्या वैभवाला भेदून जाईल.

  23. ते तुला खाली गर्तेत आणतील, आणि तिथे समुद्राच्या मधोमध तुझा भयानक मृत्यू होईल.

  24. तेव्हा जे लोक तुला मारतात त्यांच्यादेखत तू म्हणशील काय, “मी देव आहे?” जे तुझा वध करतात त्यांच्या हातात, तू केवळ मानव असशील, देव नाही.

  25. परकीय लोकांच्या हातून तू बेसुंती लोकांसारखा मृत्यू पावशील. हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह म्हणतात.’ ”