मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने

163 वचने · 41 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत किंवा डुलकीही घेत नाहीत.

  2. प्रवाशांचे एक आराधना गीत. शलोमोनाची रचना. याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.

  3. तुमचे पहाटे उठणे आणि रात्री उशीरापर्यंत अन्नप्राप्तीसाठी कष्ट करणे व्यर्थ आहे— कारण आपल्या प्रियजनांस याहवेहच शांत झोप देतात.

  4. ते सर्व प्राणिमात्राला अन्नपुरवठा करतात, त्यांची करुणा सनातन आहे.

  5. संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि मला ओळखले आहे.

  6. माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता; दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो.

  7. माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात; माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे.

  8. हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच, ते सर्व तुम्हाला माहीत असतात.

  9. तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता; तुम्ही आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आहे.

  10. तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील; तुमचा उजवा हात मला आधार देईल.

  11. सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या, युद्ध समयी तुम्हीच माझे शिरस्त्राण व्हा.

  12. याहवेह सर्वांशी भलेपणाने वागतात; त्यांची करुणा त्यांच्या सर्व निर्मितीवर स्थिर असते.

  13. याहवेहचे प्रत्येक मार्ग न्यायीपणाचे आहे आणि ते आपल्या सर्व कृत्यात विश्वासू आहेत.

  14. ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात व हाक मारणार्‍या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात.

  15. तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा, आणि ते तुझे मार्ग सुकर करतील.

  16. तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या, आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील.

  17. मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात.

  18. आपण पदरात नाणेफेक करतो, पण त्याचा प्रत्येक निर्णय याहवेहच्या हाती असतो.

  19. मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो, पण याहवेहची योजनाच यशस्वी होते.

  20. याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात. तर मग स्वतःचे मार्ग कोण समजू शकेल?

  21. मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत.

  22. लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे, परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते.

  23. “अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे!

  24. मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो, मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो, त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी, आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी.

  25. परंतु हा त्याचा उद्देश नाही, त्याच्या मनात हे नाही; त्याचा उद्देश आहे की नाश करावा, अनेक राष्ट्रांचा नाश करून त्यांचा अंत करावा.