Skip to content

Prophets बद्दल बायबलमधील वचने

655 वचने · 128 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते पार गेल्यावर एलीयाह अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून घेतले जाण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करावे ते मला सांग?” “अलीशाने उत्तर दिले, तुमच्यामध्ये असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”

  2. एलीयाह म्हणाला, “तू एक कठीण गोष्ट मागितली आहेस; तरी देखील जेव्हा तू मला तुझ्यापासून दूर जात असताना पाहिलेस, तर ते तुझे होईल; अन्यथा ते होणार नाही.”

  3. ते एकत्र असे बोलत चालत असताना, अचानक अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे प्रगट झाले आणि त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे केले आणि वावटळीद्वारे एलीयाह स्वर्गात वर घेतला गेला.

  4. अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्याला पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले.

  5. तेव्हा अलीशाने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा उचलला आणि तो यार्देन काठी परत गेला आणि उभा राहिला.

  6. त्याने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा घेतला आणि पाण्यावर मारला. “एलीयाहचा याहवेह परमेश्वर कुठे आहेत?” जेव्हा त्याने झग्याने पाण्यावर मारले तेव्हा पाणी हे उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि अलीशा पैलतीरावर गेला.

  7. यरीहोतील संदेष्ट्यांचा एक समूह, जो हे पाहत होता म्हणाला, “एलीयाहचा आत्मा अलीशावर उतरला आहे.” ते त्याला भेटण्यास गेले आणि भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले.

  8. परंतु यहोशाफाटने विचारले, “याहवेहचा एखादा संदेष्टा इथे नाही काय, म्हणजे आपण याहवेहला विचारू शकू?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या अधिकार्‍याने उत्तर दिले, “शाफाटाचा पुत्र अलीशा इथे आहे. जो एलीयाहच्या हातावर पाणी घालत असे.”

  9. यहोशाफाटने म्हटले, “याहवेहचे वचन त्याच्यासोबत आहे.” मग इस्राएलाच्या राजा आणि यहोशाफाट व एदोम हे राजे त्याला भेटण्यास गेले.

  10. परंतु आता एका वीणावादकाला मजकडे घेऊन या.” हा वादक वीणा वाजवित असताना याहवेहचा हात अलीशावर आला

  11. संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचे भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.”

  12. ती आपल्या पतीला म्हणाली, “मला माहीत आहे की हा मनुष्य जो वरचेवर आपल्या मार्गाने येतो, तो परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे.

  13. तेव्हा त्यांच्यासाठी आपण धाब्यावर एक लहानशी खोली तयार करू. तिथे त्यांच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक दिवा ठेवू. म्हणजे जेव्हा ते येतील तेव्हा इथे राहू शकतील.”

  14. जेव्हा ती परमेश्वराच्या मनुष्याच्या डोंगरावर पोहोचली, तेव्हा तिने त्याचे पाय धरले. जेव्हा गेहजी तिला दूर लोटू लागला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला सोड! ती फार दुःखात आहे, पण याहवेहने त्याचे कारण मला कळविले नाही आणि ते माझ्यापासून गुप्त ठेवले.”

  15. अलीशा गिलगाल येथे परत आला आणि त्या भागात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचा समूह त्याच्यापुढे बसलेला होता, त्याने आपल्या सेवकास म्हटले, “चुलीवर मोठे भांडे ठेऊन या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.”

  16. एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.”

  17. ही इस्राएली मुलगी काय म्हणते हे नामानाने जाऊन राजाला सांगितले.

  18. तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “मग आता जा आणि मी इस्राएलाच्या राजाला पत्र पाठवितो.” मग नामान आपल्याबरोबर चांदीचे दहा तालांत, सोन्याची सहा हजार सोन्याची नाणी आणि उंची पोशाखांचे दहा जोड घेऊन निघाला.

  19. त्याने इस्राएलाच्या राजासाठी जे पत्र नेले, त्यामध्ये असे लिहिले होते: “या पत्रासोबत मी माझा सेवक नामानला तुमच्याकडे पाठवित आहे, तुम्ही त्याचे कुष्ठरोग बरे करावे.”

  20. इस्राएलाच्या राजाने ते पत्र वाचले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली व म्हणाला, “मी परमेश्वर आहे काय? मी कोणाला मारून त्याला पुन्हा जिवंत करू शकतो काय? या व्यक्तीने कोणाला तरी माझ्याकडे कुष्ठरोग बरा होण्यासाठी का पाठविले आहे? पाहा तो कसा माझ्यासोबत भांडण करण्याचे काहीतरी निमित्त शोधीत आहे!”

  21. इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली आहेत, असे जेव्हा परमेश्वरचा मनुष्य अलीशाने ऐकले, तेव्हा त्याने राजाला हा निरोप पाठविला: “तुम्ही आपली वस्त्रे का फाडली? त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवून द्या आणि त्याला समजून येईल की इस्राएलमध्ये संदेष्टा आहे.”

  22. नंतर नामान आणि त्याचे सर्व लोक परमेश्वराच्या मनुष्याकडे परत गेले. तो त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “शेवटी इस्राएलशिवाय जगामध्ये इतरत्र कुठेही परमेश्वर नाही, हे मला आता पूर्णपणे समजून चुकले आहे. तुमच्या सेवकाद्वारे आणलेल्या नजराण्यांचा कृपया स्वीकार करा.”

  23. तेव्हा संदेष्ट्याने उत्तर दिले, “ज्यांची मी सेवा करतो त्या जिवंत याहवेहची शपथ, मी काहीही स्वीकार करणार नाही.” आणि नामानाने त्याला फार आग्रह केला, पण त्याने नकार दिला.

  24. त्यावेळी अरामाच्या राजाने इस्राएलशी युद्ध केले असता, आपल्या अधिकार्‍यांशी मसलत केली आणि तो म्हणाला, “मी अमुक ठिकाणी माझा तळ देणार आहे.”

  25. परमेश्वराच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठविला: “सावध राहा, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, कारण अरामी सैनिक त्या ठिकाणी दबा धरून बसले आहेत.”