मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम ३६:७सुमारे इ.स.पू. १४९१

    कारण जी सामुग्री त्यांच्याजवळ होती, ती सर्व कामाच्या आवश्यकतेपेक्षा अधिक होती.

  2. निर्गम ३६:८सुमारे इ.स.पू. १४९१

    सर्व कुशल कारागिरांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार केला व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले.

  3. निर्गम ३६:९सुमारे इ.स.पू. १४९१

    सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात होती.

  4. निर्गम ३६:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी पाच पडदे एकमेकांना जोडले व इतर पाच पडद्यांचेही तसेच केले.

  5. निर्गम ३६:११सुमारे इ.स.पू. १४९१

    जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर त्यांनी निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनविले आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच केले.

  6. निर्गम ३६:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    तसेच त्यांनी एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्‍या पडद्याच्या किनारीपर्यंत तसेच पन्नास फासे केले, हे फासे समोरासमोर होते.

  7. निर्गम ३६:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी सोन्याचे पन्नास आकडे तयार केले आणि त्याचा उपयोग पडद्याच्या दोन जोड्या एकत्र बांधण्यासाठी केला, यासाठी की निवासमंडप अखंड होईल.

  8. निर्गम ३६:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी त्यांनी बोकडाच्या केसाचे पडदे तयार केले; ते अकरा पडदे होते.

  9. निर्गम ३६:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात होती.

  10. निर्गम ३६:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी पाच पडदे एकत्र जोडले आणि इतर सहा पडदे एकत्र जोडले.

  11. निर्गम ३६:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास फासे करून तो एकजोड केला आणि दुसर्‍या पडद्याच्या किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड केला.

  12. निर्गम ३६:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी कास्याचे पन्नास आकडे तयार केले आणि ते फासात घालून तंबू एकजोड केला.

  13. निर्गम ३६:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे आच्छादन केले आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन केले.

  14. निर्गम ३६:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी निवासमंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या तयार केल्या.

  15. निर्गम ३६:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद होती.

  16. निर्गम ३६:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    एक फळी दुसर्‍या फळीला जोडण्यासाठी त्यांच्या समोरासमोर दोन कुसे केली. निवासमंडपाच्या प्रत्येक फळीला त्यांनी अशाप्रकारे कुसे केली.

  17. निर्गम ३६:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    निवासमंडपाच्या दक्षिणेस त्यांनी वीस फळ्या तयार केल्या

  18. निर्गम ३६:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका केल्या—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक.

  19. निर्गम ३६:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला, म्हणजे उत्तरेला त्यांनी वीस फळ्या तयार केल्या

  20. निर्गम ३६:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि प्रत्येक फळीखाली दोन, अशा चांदीच्या चाळीस बैठका केल्या.

  21. निर्गम ३६:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    निवासमंडपाच्या शेवटच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिम बाजूस त्यांनी सहा फळ्या तयार केल्या.

  22. निर्गम ३६:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि निवासमंडपाच्या मागच्या बाजूच्या कोपर्‍यांसाठी त्यांनी दोन फळ्या तयार केल्या.

  23. निर्गम ३६:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    या दोन कोपर्‍यातील फळ्या खालपासून वरपर्यंत दुहेरी असून एकाच कडीत जोडल्या होत्या; दोन्ही कोपर्‍यांच्या फळ्या एकसारख्याच होत्या.

  24. निर्गम ३६:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका होत्या.

  25. निर्गम ३६:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याचप्रमाणे त्यांनी निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे पाच अडसर तयार केले,