मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम ३६:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला पाच आणि पश्चिमेच्या बाजूच्या म्हणजेच शेवटच्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर होते.

  2. निर्गम ३६:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    मध्यभागी लावण्याचे अडसर फळ्यांच्या मधून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचतील असे तयार केले.

  3. निर्गम ३६:३४सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी फळ्यांना सोन्याचे आवरण लावले आणि आडव्या खांबांना अडकविण्यासाठी सोन्याच्या कड्या केल्या. त्यांनी आडव्या खांबांना सुद्धा सोन्याचे आवरण दिले.

  4. निर्गम ३६:३५सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाचे पडदे बनविले व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले.

  5. निर्गम ३६:३६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व त्यावर सोन्याचे आवरण घातले. त्यासाठी त्यांनी सोन्याच्या कड्या व चांदीच्या चार बैठका बनविल्या.

  6. निर्गम ३६:३७सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या रेशमी तागाचा नक्षीदार पडदा तयार केला.

  7. निर्गम ३६:३८सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी पाच खांब व त्यांच्या कड्या बनविल्या. त्या खांबांचा वरचा भाग व बांधे यांना सोन्याचे आवरण घातले आणि त्यांच्या कास्याच्या पाच बैठका बनविल्या.

  8. निर्गम ३७:१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा कोश तयार केला—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच होता.

  9. निर्गम ३७:२सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यावर त्याने आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याच्याभोवती सोन्याचा काठ केला.

  10. निर्गम ३७:३सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याने त्यासाठी सोन्याच्या चार कड्या केल्या आणि त्याच्या चार पायांना दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्‍या बाजूला लावल्या.

  11. निर्गम ३७:४सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण घातले.

  12. निर्गम ३७:५सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि ते दांडे कोश वाहून नेण्यासाठी कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले.

  13. निर्गम ३७:६सुमारे इ.स.पू. १४९१

    नंतर त्याने शुद्ध सोन्याचे प्रायश्चिताचे झाकण बनविले; जे अडीच हात लांब व दीड हात रुंद होते.

  14. निर्गम ३७:७सुमारे इ.स.पू. १४९१

    झाकणाच्या टोकांना त्याने घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब बनविले.

  15. निर्गम ३७:८सुमारे इ.स.पू. १४९१

    एका बाजूस एक करूब आणि दुसर्‍या बाजूस दुसरे करूब बनविले; झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घेतले.

  16. निर्गम ३७:९सुमारे इ.स.पू. १४९१

    या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादन करीत होते. करुबांची मुखे समोरासमोर असून त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे होती.

  17. निर्गम ३७:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनविला; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होता.

  18. निर्गम ३७:११सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी त्याला शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याभोवती सोन्याचा काठ बनविला.

  19. निर्गम ३७:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी त्याच्याभोवती चार बोटे रुंदीएवढी पट्टी बनवून, त्यावर सोन्याचा काठ तयार केला.

  20. निर्गम ३७:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या तयार करून त्या चार पायांच्या चार कोपर्‍यांवर बसविल्या.

  21. निर्गम ३७:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    मेज वाहून नेण्याच्या दांड्या धरण्यासाठी कड्या पट्टीच्या जवळ लावल्या.

  22. निर्गम ३७:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    मेज वाहून नेण्यासाठी असलेले दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले होते व त्यांना सोन्याचे आवरण घातले होते.

  23. निर्गम ३७:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील उपकरणे म्हणजे ताटे, पात्रे व वाट्या व त्याचे कलश हे त्यांनी शुद्ध सोन्याचे बनविले.

  24. निर्गम ३७:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी शुद्ध सोन्याचा दीपस्तंभ बनविला. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असा तयार केला.

  25. निर्गम ३७:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाल्या होत्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्‍या बाजूला.