मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम ३७:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे.

  2. निर्गम ३७:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले व त्याच्या कळ्या व फुले होती.

  3. निर्गम ३७:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी होती, दुसरी कळी दुसर्‍या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस आणि तिसरी कळी तिसर्‍या फांदीच्या जोडीखाली होती; सर्व मिळून सहा फांद्या होत्या.

  4. निर्गम ३७:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    या सर्व कळ्या व फांद्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून घडविल्या होत्या.

  5. निर्गम ३७:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी त्याचे सात दिवे बनविले व शुद्ध सोन्याचे वातीचे चिमटे आणि तबके सुद्धा बनविली.

  6. निर्गम ३७:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे एक तालांत शुद्ध सोन्याने तयार केली.

  7. निर्गम ३७:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार केली. ती चौरस होती. तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात होती व तिची शिंगे तिच्याशी अखंड अशी होती.

  8. निर्गम ३७:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी वेदीचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण घातले व त्याभोवती सोन्याचा काठ केला.

  9. निर्गम ३७:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या बनविल्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या केल्या.

  10. निर्गम ३७:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी ते दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले व त्यांना सोन्याचे आवरण घातले.

  11. निर्गम ३७:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे पवित्र अभिषेकाचे तेल व शुद्ध, सुगंधी धूप बनविले.

  12. निर्गम ३८:१सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी बाभळीच्या लाकडाची होमार्पणाची वेदी तयार केली. ती तीन हात उंच, पाच हात लांब, पाच हात रुंद असून चौकोनी होती.

  13. निर्गम ३८:२सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी वेदीच्या चार कोपर्‍यांना प्रत्येकी एक शिंग बनविले, शिंगे व वेदी अखंड बनविली व वेदीला कास्याचे आवरण घातले.

  14. निर्गम ३८:३सुमारे इ.स.पू. १४९१

    वेदीची सर्व पात्रे, म्हणजे त्याचे भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे बनविले.

  15. निर्गम ३८:४सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी वेदीसाठी कास्याच्या जाळीची चाळण तयार केली, जी वेदीच्या काठाखाली वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत होती.

  16. निर्गम ३८:५सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी कास्याच्या चाळणीच्या चार कोपर्‍यांना दांडे अडकविण्यासाठी ओतीव कास्याच्या कड्या तयार केल्या.

  17. निर्गम ३८:६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण घातले.

  18. निर्गम ३८:७सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी ते दांडे कड्यात अडकविले, म्हणजे वेदी वाहून नेताना दांडे वेदीच्या दोन बाजूंनी असतील. वेदी लाकडाची असून ती आतून पोकळ बनविली.

  19. निर्गम ३८:८सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी कास्याचे गंगाळ व त्याची बैठक सुद्धा कास्याची बनविली. सभामंडपाच्या दाराशी सेवा करणार्‍या स्त्रियांच्या आरशांचे ते बैठक होते.

  20. निर्गम ३८:९सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी अंगण तयार केले. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब होती व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे होते.

  21. निर्गम ३८:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका होत्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या होत्या.

  22. निर्गम ३८:११सुमारे इ.स.पू. १४९१

    उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब होती आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका होत्या व खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या.

  23. निर्गम ३८:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    पश्चिमेकडील शेवटची बाजू पन्नास हात रुंदीची होती आणि त्याला पडदे लावलेले होते, त्याला दहा खांब व दहा बैठका असून खांबांना चांदीच्या कड्या व पट्ट्या होत्या.

  24. निर्गम ३८:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    सूर्योदयाकडील पूर्वेकडील बाजू पन्नास हात रुंद होती.

  25. निर्गम ३८:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात लांबीचा पडदा होता. त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या,