मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम ३९:९सुमारे इ.स.पू. १४९१

    तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला होता व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत होती.

  2. निर्गम ३९:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावली. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज, व माणिक

  3. निर्गम ३९:११सुमारे इ.स.पू. १४९१

    दुसर्‍या रांगेत पाचू, नीलमणी व हिरे,

  4. निर्गम ३९:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    तिसर्‍या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;

  5. निर्गम ३९:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे. त्यांना नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या कोंदणात लावले होते.

  6. निर्गम ३९:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने होती. प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले.

  7. निर्गम ३९:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या तयार केल्या.

  8. निर्गम ३९:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी सोन्याची दोन कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनविल्या, त्या दोन कोंदणांमध्ये घालून ऊरपटाच्या दोन्ही टोकास बसविल्या.

  9. निर्गम ३९:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये बसविल्या,

  10. निर्गम ३९:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडले.

  11. निर्गम ३९:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी सोन्याच्या दोन कड्या तयार केल्या व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडल्या.

  12. निर्गम ३९:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी सोन्याच्या आणखी दोन कड्या बनविल्या व त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून जोडल्या, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडल्या.

  13. निर्गम ३९:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने कमरबंदाला अशा बांधाव्या की ऊरपट एफोदावरून सरकणार नाही; हे त्यांनी याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे केले.

  14. निर्गम ३९:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनविला—विणकाम करणार्‍याच्या कामाप्रमाणे विणला.

  15. निर्गम ३९:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याच्या मधोमध चिलखताच्या गळ्याप्रमाणे त्या झग्याचे तोंड होते. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे गोट होता.

  16. निर्गम ३९:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेर्‍यावर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या सुताची डाळिंबे बनविली.

  17. निर्गम ३९:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    डाळिंबांच्या मध्ये झग्याच्या घेरावर शुद्ध सोन्याच्या घंट्या बनवून लावल्या.

  18. निर्गम ३९:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे सेवा करण्यासाठी घालावयाच्या झग्याच्या घेराच्या काठावर घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने लावले.

  19. निर्गम ३९:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    यानंतर त्यांनी अहरोन व त्याचे पुत्र यांच्यासाठी रेशमी तागाचे विणलेले अंगरखे तयार केले.

  20. निर्गम ३९:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि रेशमी तागाचा फेटा व रेशमी तागाची टोपी आणि रेशमी तागाची अंतर्वस्त्रे केली.

  21. निर्गम ३९:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    कातलेल्या रेशमी तागाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे भरतकाम केलेला कमरबंद होता; जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.

  22. निर्गम ३९:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी शुद्ध सोन्याची पवित्र मुद्रेची पाटी बनविली आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तसे हे कोरले: याहवेहसाठी पवित्र.

  23. निर्गम ३९:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    ती जोडता यावी म्हणून त्यांनी ती निळ्या फेट्याला दोरीने बांधली, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.

  24. निर्गम ३९:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    याप्रकारे निवासमंडप व सभामंडप यांचे काम समाप्त झाले. इस्राएली लोकांनी जे काही याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच केले.

  25. निर्गम ३९:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    मग त्यांनी निवासमंडप मोशेकडे आणला: तंबू व त्याचे सर्व सामान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;