मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम ३९:३४सुमारे इ.स.पू. १४९१

    मेंढ्याच्या लाल रंगवलेल्या कातड्यांचे आच्छादन आणि इतर प्रकारचे टिकाऊ चर्म, झाकण व त्याचा पडदा;

  2. निर्गम ३९:३५सुमारे इ.स.पू. १४९१

    कराराच्या नियमाचा कोश, त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण;

  3. निर्गम ३९:३६सुमारे इ.स.पू. १४९१

    मेज व त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर;

  4. निर्गम ३९:३७सुमारे इ.स.पू. १४९१

    शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्याच्या दिव्यांची रांग व त्याची सर्व उपकरणे आणि प्रकाशासाठी जैतुनाचे तेल;

  5. निर्गम ३९:३८सुमारे इ.स.पू. १४९१

    सोन्याची धूपवेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप व तंबूच्या प्रवेशद्वारासाठी पडदा;

  6. निर्गम ३९:३९सुमारे इ.स.पू. १४९१

    कास्याची वेदी व तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; गंगाळ व त्याची बैठक;

  7. निर्गम ३९:४०सुमारे इ.स.पू. १४९१

    अंगणाचे पडदे, खुंट्या व त्यांच्या बैठका आणि अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी पडदे; दोर्‍या व अंगणासाठी तंबूच्या मेखा; निवासमंडप व सभामंडपा साठी लागणारे सर्व साहित्य;

  8. निर्गम ३९:४१सुमारे इ.स.पू. १४९१

    पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.

  9. निर्गम ३९:४२सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएल लोकांनी सर्व कामे केली होती.

  10. निर्गम ३९:४३सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशेने कामाचे परीक्षण केले व पाहिले की त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.

  11. निर्गम ४०:१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले:

  12. निर्गम ४०:२सुमारे इ.स.पू. १४९१

    “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडप, सभामंडप उभा करावा.

  13. निर्गम ४०:३सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यामध्ये कराराच्या नियमाचा कोश ठेवावा आणि कोश पडद्याने झाकावा.

  14. निर्गम ४०:४सुमारे इ.स.पू. १४९१

    मेज आत आणून त्यावरचे सामान व्यवस्थित लावावे. मग दीपस्तंभ आत आणावा व त्याचे दिवे लावावे.

  15. निर्गम ४०:५सुमारे इ.स.पू. १४९१

    कराराच्या नियमाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेवावी आणि निवासमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा लावावा.

  16. निर्गम ४०:६सुमारे इ.स.पू. १४९१

    “निवासमंडपाच्या प्रवेशद्वारापुढे, सभामंडपापुढे होमार्पणाची वेदी ठेवावी.

  17. निर्गम ४०:७सुमारे इ.स.पू. १४९१

    सभामंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवून त्यात पाणी भरावे.

  18. निर्गम ४०:८सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याभोवती अंगण करावे आणि त्या अंगणाच्या प्रवेशद्वारास पडदा लावावा.

  19. निर्गम ४०:९सुमारे इ.स.पू. १४९१

    “अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडप व त्यातील प्रत्येक वस्तूवर अभिषेक करावा, ते व त्यातील सर्व सामान वेगळे करावे म्हणजे ते पवित्र होईल.

  20. निर्गम ४०:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    मग होमार्पणाची वेदी व तिची सर्व पात्रे यांचा अभिषेक करावा; वेदीला पवित्र करावे म्हणजे ती वेदी परमपवित्र होईल.

  21. निर्गम ४०:११सुमारे इ.स.पू. १४९१

    मग गंगाळ व त्याच्या बैठकीस अभिषेक कर व ते समर्पित कर.

  22. निर्गम ४०:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    “अहरोन व त्याचे पुत्र यांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणावे व त्यांना पाण्याने धुवावे.

  23. निर्गम ४०:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घालावीत. त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्याला अभिषेक करून पवित्र करावे.

  24. निर्गम ४०:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याच्या पुत्रांना आणून त्यांना झगे घालावे.

  25. निर्गम ४०:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    जसा त्यांच्या पित्याला अभिषेक केला, तसाच त्यांनाही अभिषेक करावा, म्हणजे याजक म्हणून ते माझी सेवा करतील. त्यांचा हा याजकपणाचा अभिषेक पिढ्यान् पिढ्या चालू राहील.”