- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय १:१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहनी मोशेला बोलाविले आणि सभामंडपातून त्याच्याशी बोलणे केले. ते म्हणाले,
- लेवीय १:२सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा तुमच्यामधील कोणी याहवेहसाठी अर्पण आणतील, तेव्हा तुमच्या गुरांमधील किंवा कळपातील प्राण्यांचे अर्पण आणावे.
- लेवीय १:३सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘जर हे होमार्पण गुरांमधून करावयाचे असेल, तर निर्दोष असलेला नरगोर्हा तुम्ही अर्पण करावा. तुम्ही ते सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आणावे, म्हणजे ते याहवेहद्वारे मान्य केले जाईल.
- लेवीय १:४सुमारे इ.स.पू. १४९०
तुम्ही तुमचे हात त्या होमार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि प्रायश्चित्त म्हणून तुमच्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वीकारले जाईल.
- लेवीय १:५सुमारे इ.स.पू. १४९०
तुम्ही याहवेहसमोर त्या गोर्ह्याचा वध करावा आणि नंतर अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, ते त्याचे रक्त आणतील आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वेदीभोवती शिंपडतील.
- लेवीय १:६सुमारे इ.स.पू. १४९०
तुम्ही यज्ञपशूची कातडी काढावी आणि पशूचे कापून तुकडे करावे.
- लेवीय १:७सुमारे इ.स.पू. १४९०
अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, त्यांनी वेदीवर अग्नी ठेवावा आणि अग्नीवर लाकडांची रचना करावी.
- लेवीय १:८सुमारे इ.स.पू. १४९०
नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी वेदीवर जळत असलेल्या लाकडांवर त्या पशूचे तुकडे, शिर व चरबी यासह व्यवस्थित रचून ठेवावी.
- लेवीय १:९सुमारे इ.स.पू. १४९०
पाय व आतडी पाण्याने धुऊन याजकाने त्या सगळ्यांचे वेदीवर होम करावे. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे. याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
- लेवीय १:१०सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘जर हे होमार्पण कळपातून आणलेले, मेंढी किंवा शेळी असेल तर तुम्ही दोष नसलेल्या नराचे अर्पण करावे.
- लेवीय १:११सुमारे इ.स.पू. १४९०
तुम्ही याहवेहसमोर वेदीच्या उत्तर दिशेला त्या प्राण्याचा वध करावा आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे.
- लेवीय १:१२सुमारे इ.स.पू. १४९०
मग त्या पशूचे कापून तुकडे करावेत आणि याजकाने शिर व चरबी यासह ते तुकडे वेदीवरील लाकडांवर ठेवावे.
- लेवीय १:१३सुमारे इ.स.पू. १४९०
त्याची आतडी आणि पाय तुम्ही पाण्याने धुऊन घ्यावीत आणि याजकाने हे सर्व घेऊन यावे आणि त्यांचा वेदीवर होम करावा. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
- लेवीय १:१४सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘जर याहवेहसाठी पक्ष्यांचे होमार्पण म्हणून अर्पण असेल तर त्याने पारवा किंवा कबुतराची पिल्ले अर्पण करावी.
- लेवीय १:१५सुमारे इ.स.पू. १४९०
याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून काढावे आणि त्याचे वेदीवर होम करावे; त्याचे रक्त वेदीच्या बाजूला वाहू द्यावे.
- लेवीय १:१६सुमारे इ.स.पू. १४९०
त्याने त्या पक्ष्याची चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकावयाच्या जागी फेकून द्यावी.
- लेवीय १:१७सुमारे इ.स.पू. १४९०
तो त्याला पंखांच्या मधोमध फाडेल, त्याचे पूर्णपणे तुकडे करणार नाही आणि नंतर याजक त्याचे वेदीवरील जळत्या लाकडांवर होमार्पण करेल. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
- लेवीय २:१सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘जेव्हा कोणी याहवेहला धान्यार्पण आणत असेल, तर त्यांची अर्पणे उत्तम पिठाची असावीत. त्यांनी त्यावर जैतुनाचे तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा.
- लेवीय २:२सुमारे इ.स.पू. १४९०
आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांच्याकडे ते आणावे. याजक मूठभर पीठ आणि तेल घेतील, त्याचबरोबर सर्व धूप स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर एकत्र जाळतील, हे अन्नार्पण, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
- लेवीय २:३सुमारे इ.स.पू. १४९०
अन्नार्पणातून राहिलेले धान्य अहरोन आणि त्याच्या पुत्रांचे असावे; याहवेहला दिलेल्या अन्नार्पणाचा हा परमपवित्र भाग आहे.
- लेवीय २:४सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘जर तुम्ही भट्टीत भाजलेले अन्नार्पण आणता, तर ते उत्तम पिठाचे असावे: बेखमीर जाड भाकरी आणि जैतुनाच्या तेलात मळलेल्या किंवा पातळ बेखमीर भाकरी आणि वर जैतुनाचे तेल लावलेले असे असावे.
- लेवीय २:५सुमारे इ.स.पू. १४९०
जर तुमचे अन्नार्पण तव्यावर भाजलेले असेल तर ते उत्तम पिठापासून तयार केलेले तेलात मिसळलेले आणि बेखमीर असे असावे.
- लेवीय २:६सुमारे इ.स.पू. १४९०
तिचा भुगा करावा आणि त्यावर तेल ओतावे; हे धान्यार्पण आहे.
- लेवीय २:७सुमारे इ.स.पू. १४९०
जर तुमचे धान्यार्पण भांड्यात शिजविलेले असेल, तर ते उत्तम पिठाचे आणि थोडेसे जैतुनाचे तेल वापरून तयार केलेले असावे.
- लेवीय २:८सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहला अर्पण करण्याचे अशा प्रकारच्या वस्तूंनी बनविलेले धान्यार्पण तुम्ही याजकास आणून द्यावे व त्याने ते वेदीवर ठेवावे.