circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- निर्गम ३८:१५सुमारे इ.स.पू. १४९१
आणि अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या दुसर्या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे होते, त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या.
- निर्गम ३८:१६सुमारे इ.स.पू. १४९१
अंगणाच्या सर्व बाजूचे पडदे कातलेल्या रेशमी तागाचे होते.
- निर्गम ३८:१७सुमारे इ.स.पू. १४९१
खांबांच्या बैठका कास्याच्या होत्या. खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या आणि त्यांच्या वरच्या भागाला चांदीचे आवरण दिले होते; अशाप्रकारे अंगणाच्या प्रत्येक खांबाला चांदीच्या पट्ट्या होत्या.
- निर्गम ३८:१८सुमारे इ.स.पू. १४९१
अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा होता व त्यावर भरतकाम केले होते. ते अंगणाच्या पडद्यासारखे वीस हात लांब होते आणि पाच हात उंच होते.
- निर्गम ३८:१९सुमारे इ.स.पू. १४९१
त्याला चार खांब व कास्याच्या चार बैठका होत्या. त्यांच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या आणि त्याच्या वरच्या भागाला चांदीचे आवरण दिले होते.
- निर्गम ३८:२०सुमारे इ.स.पू. १४९१
निवासमंडप व अंगणाच्या सभोवती वापरलेल्या सर्व मेखा कास्याच्या होत्या.
- निर्गम ३८:२१सुमारे इ.स.पू. १४९१
मोशेच्या आज्ञेनुसार बनविलेले कराराच्या नियमाचे निवासमंडप यासाठी जी सामुग्री वापरली गेली, त्यांची मोजणी, अहरोन याजक याचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली लेव्यांच्या द्वारे केली गेली, ती अशी:
- निर्गम ३८:२२सुमारे इ.स.पू. १४९१
याहवेहने मोशेला जे सर्व आज्ञापिले होते ते यहूदाह वंशातील हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याने तयार केले;
- निर्गम ३८:२३सुमारे इ.स.पू. १४९१
त्याच्याबरोबर दान वंशातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब होता; हा शिल्पकार व कुशल कारागीर, निळे, जांभळे आणि किरमिजी रंगाचे रेशमी ताग यावर भरतकाम करणारा होता.
- निर्गम ३८:२४सुमारे इ.स.पू. १४९१
हेलावणीच्या अर्पणातून पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी वापरलेले सोने हे पवित्रस्थानाच्या वजनानुसार एकोणतीस तालांत व सातशे तीस शेकेल असे होते.
- निर्गम ३८:२५सुमारे इ.स.पू. १४९१
इस्राएली समुदायातील जनगणना झालेल्या लोकांपासून आलेली चांदी पवित्रस्थानाच्या वजनानुसार शंभर तालांत आणि एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल होती.
- निर्गम ३८:२६सुमारे इ.स.पू. १४९१
जनगणना झालेले वीस वर्ष व त्याहून अधिक वयाचे सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास पुरुष होते—त्याचा प्रत्येक पुरुषाकरिता एक बेका, म्हणजेच पवित्रस्थानाच्या वजनानुसार अर्धा शेकेल मिळाला होता.
- निर्गम ३८:२७सुमारे इ.स.पू. १४९१
शंभर तालांत चांदी पवित्रस्थानाच्या व पडद्याच्या ओतीव बैठका तयार करण्यासाठी वापरली; शंभर बैठकांसाठी शंभर तालांत, प्रत्येकी एका बैठकीसाठी एक तालांत वापरला.
- निर्गम ३८:२८सुमारे इ.स.पू. १४९१
खाबांच्या कड्यांसाठी, खांबांच्या वरील भागास आवरण देण्यासाठी व त्यांच्या पट्ट्या बनविण्यासाठी एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल वापरण्यात आले.
- निर्गम ३८:२९सुमारे इ.स.पू. १४९१
हेलावणीच्या अर्पणात सत्तर तालांत आणि दोन हजार चारशे शेकेल कास्य होते.
- निर्गम ३८:३०सुमारे इ.स.पू. १४९१
त्याचा वापर त्यांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या बैठका, कास्याची वेदी व त्याची कास्याची चाळणी व वेदीवरील उपकरणे बनविण्यासाठी केला,
- निर्गम ३८:३१सुमारे इ.स.पू. १४९१
निवासमंडपाच्या अंगणाभोवती व त्याच्या प्रवेशद्वारासाठी बैठका आणि निवासमंडपाच्या व अंगणाच्या सभोवती मेखा करण्यासाठी त्याचा वापर केला.
- निर्गम ३९:१सुमारे इ.स.पू. १४९१
पवित्रस्थानातील सेवेसाठी त्यांनी निळे, जांभळे व किरमिजी रंगाच्या सुताची विणलेली वस्त्रे बनविली. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे अहरोनासाठी सुद्धा त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.
- निर्गम ३९:२सुमारे इ.स.पू. १४९१
मग त्यांनी एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा वापर करून बनविला.
- निर्गम ३९:३सुमारे इ.स.पू. १४९१
त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे बनविले आणि निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या धाग्यात आणि रेशमी ताग कातून—कुशल कारागिराच्या हातांनी बनविले.
- निर्गम ३९:४सुमारे इ.स.पू. १४९१
एफोदासाठी त्यांनी दोन खांदेपट्ट्या बनविल्या, ज्या त्याच्या दोन कोपर्यांना बांधता येतील अशा जोडल्या.
- निर्गम ३९:५सुमारे इ.स.पू. १४९१
कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच होता; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे तो बनविला होता.
- निर्गम ३९:६सुमारे इ.स.पू. १४९१
त्यांनी गोमेद रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविले आणि त्यावर मुद्रा कोरावी अशी इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरली.
- निर्गम ३९:७सुमारे इ.स.पू. १४९१
मग त्यांनी इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून ती रत्ने एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर लावली, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
- निर्गम ३९:८सुमारे इ.स.पू. १४९१
कुशल कारागिरांच्या हस्तकृतीने त्यांनी ऊरपट बनविला. त्यांनी तो एफोदाप्रमाणेः सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांचे सूत व कातलेल्या रेशमी तागाचा बनविला.