- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- निर्गम ४०:१६सुमारे इ.स.पू. १४९१
जसे याहवेहने आज्ञापिले होते, मोशेने सर्वकाही तसेच केले.
- निर्गम ४०:१७सुमारे इ.स.पू. १४९१
दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडपाची उभारणी करण्यात आली.
- निर्गम ४०:१८सुमारे इ.स.पू. १४९१
जेव्हा मोशेने निवासमंडपाची उभारणी केली, त्याने बैठका जागेवर लावल्या, फळ्या उभ्या केल्या, त्यात अडसर टाकले व खांब उभे केले.
- निर्गम ४०:१९सुमारे इ.स.पू. १४९१
मग मोशेने निवासमंडपावरून तंबू पसरला आणि तंबूवर आच्छादन टाकले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.
- निर्गम ४०:२०सुमारे इ.स.पू. १४९१
मग त्याने कराराच्या नियमाच्या पाट्या घेतल्या व त्या कोशामध्ये ठेवल्या, कोशाचे दांडे जोडले व त्यावर प्रायश्चिताचे झाकण लावले.
- निर्गम ४०:२१सुमारे इ.स.पू. १४९१
मग मोशेने कोश निवासमंडपात आणला आणि पडदे अडकविले आणि याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे कराराच्या नियमाचा कोश झाकून घेतला.
- निर्गम ४०:२२सुमारे इ.स.पू. १४९१
मोशेने सभामंडपामध्ये, निवासमंडपाच्या उत्तर दिशेला पडद्याच्या बाहेर मेज ठेवला
- निर्गम ४०:२३सुमारे इ.स.पू. १४९१
व मोशेने त्यावर याहवेहसमोर भाकर ठेवली, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.
- निर्गम ४०:२४सुमारे इ.स.पू. १४९१
त्याने सभामंडपामध्ये मेजासमोर, निवासमंडपाच्या दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवला
- निर्गम ४०:२५सुमारे इ.स.पू. १४९१
आणि याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे याहवेहसमोर दिवे लावले.
- निर्गम ४०:२६सुमारे इ.स.पू. १४९१
मग मोशेने सभामंडपात, पडद्याच्या समोर सोन्याची वेदी ठेवली
- निर्गम ४०:२७सुमारे इ.स.पू. १४९१
व याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे वेदीवर सुगंधी धूप जाळला.
- निर्गम ४०:२८सुमारे इ.स.पू. १४९१
मग त्याने निवासमंडपाच्या प्रवेशद्वाराला पडदे लावले.
- निर्गम ४०:२९सुमारे इ.स.पू. १४९१
मग मोशेने निवासमंडपाच्या, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ होमार्पणाची वेदी ठेवली व त्यावर होमार्पण व अन्नार्पण केले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.
- निर्गम ४०:३०सुमारे इ.स.पू. १४९१
नंतर मोशेने सभामंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरून ठेवले,
- निर्गम ४०:३१सुमारे इ.स.पू. १४९१
आणि मोशे आणि अहरोन व अहरोनाचे पुत्र यांनी आपले हात व पाय धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर केला.
- निर्गम ४०:३२सुमारे इ.स.पू. १४९१
जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करीत किंवा वेदीजवळ जात, तेव्हा ते आपले हात व पाय धूत असत, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.
- निर्गम ४०:३३सुमारे इ.स.पू. १४९१
मग मोशेने निवासमंडप व वेदी यांच्याभोवती अंगण केले आणि अंगणाच्या प्रवेशद्वारात पडदे लावले. अशाप्रकारे मोशेने सर्व काम पूर्ण केले.
- निर्गम ४०:३४सुमारे इ.स.पू. १४९१
मग मेघाने सभामंडप झाकले आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला.
- निर्गम ४०:३५सुमारे इ.स.पू. १४९१
मोशे सभामंडपात प्रवेश करू शकत नव्हता कारण त्यावर मेघ होता आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला होता.
- निर्गम ४०:३६सुमारे इ.स.पू. १४९१
इस्राएली लोकांच्या सर्व प्रवासात, जेव्हा निवासमंडपावरून मेघ वर जाई तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत;
- निर्गम ४०:३७सुमारे इ.स.पू. १४९१
पण मेघ वर गेला नाही, तर तो वर जाईल त्या दिवसापर्यंत ते पुढे जात नसत.
- निर्गम ४०:३८सुमारे इ.स.पू. १४९१
त्यांच्या संपूर्ण प्रवासात निवासमंडपावर दिवसा याहवेहचा मेघ, तर रात्री त्या मेघात अग्नी, असे इस्राएलने पाहिले.
- लेवीय १:१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहनी मोशेला बोलाविले आणि सभामंडपातून त्याच्याशी बोलणे केले. ते म्हणाले,
- लेवीय १:२सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा तुमच्यामधील कोणी याहवेहसाठी अर्पण आणतील, तेव्हा तुमच्या गुरांमधील किंवा कळपातील प्राण्यांचे अर्पण आणावे.