मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीय २:११सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘याहवेहसाठी आणले जाणारे प्रत्येक अन्नार्पण हे खमीर न घालता तयार करावे, तुम्ही याहवेहसाठी आणलेल्या अन्नार्पणात खमीर किंवा मध जाळू नये.

  2. लेवीय २:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    तुम्ही त्यांना प्रथमफळाचे अर्पण म्हणून याहवेहकडे आणू शकता, परंतु ते वेदीवर प्रसन्न करणारे सुवासिक अर्पण म्हणून करू नये.

  3. लेवीय २:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    प्रत्येक अर्पण मीठ घालून रुचकर करावे, कारण तुमच्या परमेश्वराबरोबर झालेल्या कराराचे मीठ तुमच्या अन्नार्पणात असलेच पाहिजे.

  4. लेवीय २:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘जर तुम्ही याहवेहसाठी प्रथम पिकाचे धान्यार्पण आणले, तर नवीन कणसाला चिरडून भाजलेल्या दाण्याचे अर्पण करावे.

  5. लेवीय २:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यावर जैतुनाचे तेल व धूप ठेवावे; ते धान्यार्पण आहे.

  6. लेवीय २:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने त्या चिरडलेल्या धान्याचा आणि तेलाचा स्मरणभाग, सर्व धूपांबरोबर एकत्र जाळावा, याहवेहसाठी अर्पण असे हे एक अन्नार्पण असावे.

  7. लेवीय ३:१सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘जर तुमचे अर्पण हे शांत्यर्पण असेल आणि तुम्ही कळपातील नर किंवा मादी प्राण्याचे अर्पण करीत असाल, तुम्ही निर्दोष असा प्राणी याहवेहसमोर आणावा.

  8. लेवीय ३:२सुमारे इ.स.पू. १४९०

    तुम्ही तुमचा हात त्या अर्पणाच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वारात त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत, त्यांनी वेदीच्या भोवती त्याचे रक्त शिंपडावे.

  9. लेवीय ३:३सुमारे इ.स.पू. १४९०

    शांत्यर्पणातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण आणावे: अंतर्गत अवयव आणि त्यांना जोडून असलेली सर्व चरबी,

  10. लेवीय ३:४सुमारे इ.स.पू. १४९०

    कंबरेजवळ असलेल्या चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग जे तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल.

  11. लेवीय ३:५सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर अहरोनाच्या पुत्रांनी जळत्या लाकडावर असलेल्या होमार्पणावरील वेदीवर त्याचे हवन करावे. हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.

  12. लेवीय ३:६सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘परंतु शांत्यर्पणाचे अर्पण म्हणून शेरडामेंढरांतील नर किंवा मादी यांचे याहवेहला अर्पण करावयाचे असेल तर तो पशू निर्दोष असावा.

  13. लेवीय ३:७सुमारे इ.स.पू. १४९०

    जर तुम्ही कोकर्‍याचे अर्पण करीत असाल तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे,

  14. लेवीय ३:८सुमारे इ.स.पू. १४९०

    तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त अर्पण म्हणून वेदीच्या भोवती शिंपडतील.

  15. लेवीय ३:९सुमारे इ.स.पू. १४९०

    शांत्यर्पणातून जे अन्नार्पण तुम्ही याहवेहसाठी आणावयाचे ते हे: त्याची चरबी, पाठीच्या हाडाजवळून कापलेली संपूर्ण चरबीदार शेपटी, आतील अवयव आणि त्याला जोडून असलेली सर्व चरबी,

  16. लेवीय ३:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग.

  17. लेवीय ३:११सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून याजक या सर्वाचे वेदीवर हवन करेल.

  18. लेवीय ३:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘जर तुमचे अर्पण बोकड असेल, तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे,

  19. लेवीय ३:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त वेदीच्या भोवती शिंपडतील.

  20. लेवीय ३:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    जे काही अर्पण तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून आणता ते अशाप्रकारे असावे: आतील अवयव आणि आतड्यांवरील सर्व चरबी,

  21. लेवीय ३:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग.

  22. लेवीय ३:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    याजक त्यांचे अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करतील, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. सर्व चरबी याहवेहसाठी आहे.

  23. लेवीय ३:१७सुमारे इ.स.पू. १४९०

    “ ‘भावी पिढीसाठी हे विधी सर्वकाळासाठी आहेत, जिथे कुठे तुम्ही राहाल: तुम्ही कोणतीही चरबी किंवा कोणतेही रक्त सेवन करू नये.’ ”

  24. लेवीय ४:१सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह मोशेला म्हणाले:

  25. लेवीय ४:२सुमारे इ.स.पू. १४९०

    “इस्राएली लोकांस सांग की जो कोणी अजाणतेने पाप करून याहवेहच्या नियमानुसार निषिद्ध कृत्ये करत असेल, तर त्याच्यासाठी हे नियम आहेत.”