मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीय ४:२८सुमारे इ.स.पू. १४९०

    पण जेव्हा ते त्यांच्या लक्षात येईल, तेव्हा त्यांनी आपल्या पापाबद्दल प्रायश्चिताचे अर्पण म्हणून एक निर्दोष शेळी आणावी.

  2. लेवीय ४:२९सुमारे इ.स.पू. १४९०

    त्या व्यक्तीने त्याचे हात पापार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि होमार्पणाच्या स्थळी तिचा वध करावा.

  3. लेवीय ४:३०सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने आपल्या बोटांनी काही रक्त घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतावे.

  4. लेवीय ४:३१सुमारे इ.स.पू. १४९०

    मग सर्व चरबी काढून शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने तिचा याहवेहसाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा. अशाप्रकारे याजकाने त्या व्यक्तीसाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.

  5. लेवीय ४:३२सुमारे इ.स.पू. १४९०

    जर कोणी पापार्पणासाठी अर्पण म्हणून एखादे कोकरू घेऊन येतो, तर ती एक निर्दोष मादी असावी.

  6. लेवीय ४:३३सुमारे इ.स.पू. १४९०

    होमार्पणाच्या पशूंचा वध करतात तिथे तिला आणावे, तिच्या मस्तकावर हात ठेवावा आणि पापार्पण म्हणून तिचा वध करावा.

  7. लेवीय ४:३४सुमारे इ.स.पू. १४९०

    “नंतर याजकाने पापार्पणाच्या रक्तातील काही रक्त बोटांनी घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे, व राहिलेले सर्व रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.”

  8. लेवीय ४:३५सुमारे इ.स.पू. १४९०

    शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीचा उपयोग करतात, तसा या चरबीचा उपयोग करावा. याजकाने सर्व चरबी काढून तिचे वेदीवर याहवेहसमोर होम करावे. अशाप्रकारे याजक त्या व्यक्तींसाठी प्रायश्चित करेल, म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.

  9. लेवीय ५:१सुमारे इ.स.पू. १४९०

    जर पाहिलेल्या किंवा माहीत झालेल्या गोष्टींबद्दल साक्ष देण्यासाठी सार्वजनिकरित्या केलेला आरोप जे ऐकतात पण काही बोलत नाहीत, तर ते पाप करतात, त्यांना जबाबदार धरले जाईल.

  10. लेवीय ५:२सुमारे इ.स.पू. १४९०

    एखादी व्यक्ती अजाणतेने विधिनियमानुसार अशुद्ध ठरविलेल्या वस्तूला म्हणजेच खाण्यास निषिद्ध असलेल्या ग्रामपशूच्या किंवा वनपशूच्या मृत शरीराला, किंवा सरपटणार्‍या अशुद्ध प्राण्याच्या मृत शरीराला स्पर्श करेल, तर ती व्यक्ती अशुद्ध झाली. निषिद्ध असलेल्या मृत शरीराचा स्पर्श झाला, हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले, तर ती व्यक्ती दोषी आहे.

  11. लेवीय ५:३सुमारे इ.स.पू. १४९०

    कोणत्याही प्रकारच्या मानवी अशुद्धतेस कोणतीही व्यक्ती अजाणतेने स्पर्श करेल आणि ते अशुद्ध झाले आहेत हे त्यांना समजणार नाही, परंतु नंतर त्यांना त्यांचा दोष समजून आल्यास;

  12. लेवीय ५:४सुमारे इ.स.पू. १४९०

    किंवा जर कोणता व्यक्ती अविचाराने शपथ घेतो, मग ती शपथ चांगली असो वा वाईट असो, नंतर आपण ती शपथ अज्ञानाने घेतली हे त्याला कळून आले, तेव्हा तो दोषी ठरेल.

  13. लेवीय ५:५सुमारे इ.स.पू. १४९०

    जर कोणाला याची जाणीव होते की ते यापैकी कोणत्याही बाबतीत दोषी आहेत, तर त्याने जे पातक केले ते पातक कबूल करावे,

  14. लेवीय ५:६सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि त्यांनी केलेल्या पापांचा दंड म्हणून कळपातील एक मादी कोकरू किंवा शेळी याहवेहला पापार्पण अशी करावी; आणि याजकाने त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.

  15. लेवीय ५:७सुमारे इ.स.पू. १४९०

    परंतु एखाद्याला याहवेहला कोकरू देणे शक्य नसेल, तर त्याने आपल्या पापांबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक पापार्पणासाठी व एक होमार्पणासाठी आणावी.

  16. लेवीय ५:८सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याने ती याजकाकडे आणावी आणि याजकाने प्रथम पापार्पणाचा यज्ञ करावा. त्याने त्या पक्ष्याची मान मुरगळावी, परंतु डोके मानेपासून वेगळे करू नये.

  17. लेवीय ५:९सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर पापार्पणाचे काही रक्त वेदीभोवती शिंपडावे. बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय.

  18. लेवीय ५:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    दुसरा पक्षी त्याने विधिपूर्वक होमार्पण म्हणून अर्पावा. अशाप्रकारे याजकाने त्यांच्यासाठी त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल.

  19. लेवीय ५:११सुमारे इ.स.पू. १४९०

    “जर होले किंवा पारव्याची पिल्ले आणण्याइतकीही त्याची ऐपत नसेल, तर त्याने एफाचा दहावा भाग उत्तम पीठ आणावे. ते पापार्पण असल्यामुळे त्याने ते जैतुनाच्या तेलात मिश्रित करू नये किंवा त्यावर धूपही ठेवू नये.

  20. लेवीय ५:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातील मूठभर पीठ घेऊन संपूर्ण पापार्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून याहवेहला इतर अर्पणांचा होम करतात तसे त्याचे वेदीवर होम करावे. हे त्याच्यावतीने पापार्पण होय.

  21. लेवीय ५:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    अशारितीने याजकाने त्यांच्या अशा प्रकारच्या कोणत्याही पापांबद्दल प्रायश्चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल. अन्नार्पणासंबंधी सांगितल्याप्रमाणे, पापार्पणाचे उरलेले पीठ याजकाचे होईल.”

  22. लेवीय ५:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह मोशेला म्हणाले:

  23. लेवीय ५:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    “याहवेहशी अविश्वासूपणा करून त्यांची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला, तर त्याने दोषार्पण म्हणून, तू ठरवशील तितक्या निवासमंडपातील चांदीच्या शेकेलांच्या ठरलेल्या किमतीचा एक निर्दोष मेंढा आणावा.

  24. लेवीय ५:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    पवित्र वस्तू दूषित करून त्यांनी जे पाप केले त्याची ते भरपाई करतील. त्यांनी भरपाईची रक्कम देऊन वर वीस टक्के अधिक दंड द्यावा. त्यांनी दोषार्पणाचा एक मेंढा याजकाकडे आणावा आणि याजक त्यांच्यासाठी तो मेंढा अर्पून प्रायश्चित्त करेल व त्यांची क्षमा होईल.

  25. लेवीय ५:१७सुमारे इ.स.पू. १४९०

    “अजाणतेने याहवेहने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, तरी ते दोषी ठरतील आणि त्याकरिता ते जबाबदार असतील.