- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय ६:२४सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय ६:२५सुमारे इ.स.पू. १४९०
“अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग, पापार्पणासंबंधी नियम हे आहेत: ज्या स्थळी होमार्पणाच्या पशूंचा वध करतात त्याच स्थळी या पापार्पणाच्या पशूचाही याहवेहसमोर वध करावा. हे परमपवित्र आहे.
- लेवीय ६:२६सुमारे इ.स.पू. १४९०
ज्या याजकाने हा पापार्पणविधी केला असेल, त्याने सभामंडपाच्या अंगणात पवित्रस्थानात ते खावे.
- लेवीय ६:२७सुमारे इ.स.पू. १४९०
जे काही या मांसाला स्पर्श करेल ते पवित्र होईल आणि जर काही रक्त वस्त्रावर उडाले असेल, तर ते तुम्ही पवित्रस्थानी धुवावे.
- लेवीय ६:२८सुमारे इ.स.पू. १४९०
ज्या मातीच्या पात्रात मांस शिजविले असेल, ते पात्र फोडून टाकावे पण तांब्याच्या पात्रात शिजविले असेल; तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे.
- लेवीय ६:२९सुमारे इ.स.पू. १४९०
याजकीय घराण्यातील कोणीही पुरुष ते खाऊ शकतात; ते परमपवित्र आहे.
- लेवीय ६:३०सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु कोणतेही पापार्पण, ज्याचे रक्त पवित्रस्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी सभामंडपात आणले जाते ते खाऊ नये; ते जाळून टाकावे.”
- लेवीय ७:१सुमारे इ.स.पू. १४९०
“दोषार्पण जे परमपवित्र आहे त्यासंबंधी जे नियम आहेत ते हे:
- लेवीय ७:२सुमारे इ.स.पू. १४९०
ज्या स्थळी होमार्पणाचे यज्ञपशू मारले जातात, त्याच निर्धारित स्थळी दोषार्पणाच्या यज्ञपशूचा वध करावा आणि त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे.
- लेवीय ७:३सुमारे इ.स.पू. १४९०
मग याजकाने त्याची सर्व चरबी: चरबीदार शेपूट, आतड्यावरील चरबी,
- लेवीय ७:४सुमारे इ.स.पू. १४९०
कंबरेजवळील चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग तुम्ही गुरद्यासह काढून टाकावे.
- लेवीय ७:५सुमारे इ.स.पू. १४९०
आणि याजकाने या सर्वांचे याहवेहला अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करावे. हे दोषार्पण होय.
- लेवीय ७:६सुमारे इ.स.पू. १४९०
याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला हा बली खाण्याचा अधिकार असून त्यांनी तो बली पवित्रस्थानातच बसून खावा; कारण हे परमपवित्र आहे.
- लेवीय ७:७सुमारे इ.स.पू. १४९०
“पापार्पणासारखेच दोषार्पण आहे; त्या दोघांचे नियम सारखेच आहेत. अर्पिलेला हा बली प्रायश्चित्तविधी करणार्या याजकाच्याच अधिकाराचा होईल.
- लेवीय ७:८सुमारे इ.स.पू. १४९०
जो याजक एखाद्या मनुष्याच्या वतीने होमार्पण करेल, त्या अर्पण पशूच्या कातडीवर त्या याजकाचाच हक्क असेल.
- लेवीय ७:९सुमारे इ.स.पू. १४९०
भाजलेल्या किंवा शिजविलेल्या किंवा तळलेल्या प्रत्येक अन्नधान्याचे अर्पण, विधी करणार्या याजकाचे होईल,
- लेवीय ७:१०सुमारे इ.स.पू. १४९०
अन्नधान्याचे प्रत्येक अर्पण, जैतुनाच्या तेलात मिश्रण केलेली किंवा कोरडी, अहरोनाच्या सर्व पुत्रांच्या सामूहिक मालकीची आहेत.”
- लेवीय ७:११सुमारे इ.स.पू. १४९०
“याहवेहसाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा:
- लेवीय ७:१२सुमारे इ.स.पू. १४९०
“उपकारस्तुती म्हणून केलेल्या शांत्यर्पणात तेल लावलेल्या बेखमीर जाड भाकरी, बेखमीर व वरून तेल लावलेल्या पातळ पापड्या, नीट मळलेल्या व तेल मिसळलेल्या उत्तम पिठाच्या जाड भाकरी असाव्यात.
- लेवीय ७:१३सुमारे इ.स.पू. १४९०
उपकारस्तुतीच्या या शांत्यर्पणासह खमीर घालून केलेल्या जाड भाकरींचेही अर्पण करावे.
- लेवीय ७:१४सुमारे इ.स.पू. १४९०
या अर्पणातील काही भाग संपूर्ण अर्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून प्रत्येक प्रकारची भाकर वेदीपुढे याहवेहला अर्पण करावी, म्हणजे याजक जो वेदीवर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडतो त्या याजकाचाच त्यावर हक्क असेल.
- लेवीय ७:१५सुमारे इ.स.पू. १४९०
उपकारस्तुती करिता अर्पिलेल्या शांत्यर्पणातील यज्ञबलीचे मांस अर्पण केल्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही शिल्लक ठेऊ नये.
- लेवीय ७:१६सुमारे इ.स.पू. १४९०
“परंतु यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वैच्छिक असेल, तर अर्पणातील भाग त्या दिवशीच खावे, पण उरलेले भाग दुसर्या दिवशी खाण्यास हरकत नाही.
- लेवीय ७:१७सुमारे इ.स.पू. १४९०
अर्पणातील काही मांस तिसर्या दिवसापर्यंत शिल्लक राहिले असेल तर ते अग्नीत जाळून टाकावे.
- लेवीय ७:१८सुमारे इ.स.पू. १४९०
शांत्यर्पणाच्या मांसापैकी काही मांस तिसर्या दिवशी खाल्ले, तर ज्याने ते अर्पण केले असेल त्याला स्वीकारले जाणार नाही. त्याचे त्यांना काहीच श्रेय मिळणार नाही, कारण ते अशुद्ध झाले आहे; त्यापैकी काहीही खाणारा व्यक्ती जबाबदार धरला जाईल.