- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय ७:१९सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘ज्या मांसाचा स्पर्श एखाद्या विधिनियमानुसार अपवित्र वस्तूला झाल्यास ते खाऊ नये; ते जाळून टाकावे. दुसरे मांस जो कोणी विधिपूर्वक शुद्ध आहे, तो ते खाऊ शकतो.
- लेवीय ७:२०सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे.
- लेवीय ७:२१सुमारे इ.स.पू. १४९०
जर कोणी विधिनियमांनुसार अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल—मानवासंबंधीची अशुद्धता किंवा अशुद्ध पशू वा सरपटणार्या अशुद्ध पशूला स्पर्श करेल व नंतर याहवेहस अर्पित शांत्यर्पणाचे सेवन करेल, त्याचा लोकातून उच्छेद व्हावा.’ ”
- लेवीय ७:२२सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय ७:२३सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकांस सांग: तुम्ही बैलांची, मेंढरांची किंवा शेळ्यांची चरबी खाऊ नये.
- लेवीय ७:२४सुमारे इ.स.पू. १४९०
मेलेल्या प्राण्याची चरबी किंवा हिंस्त्र श्वापदाने फाडलेल्या प्राण्याची चरबी सापडली तर ती इतर कामासाठी वापरता येईल, परंतु तुम्ही ती खाऊ नये.
- लेवीय ७:२५सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहला केलेल्या होमार्पणातील चरबी जो कोणी खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा.
- लेवीय ७:२६सुमारे इ.स.पू. १४९०
जिथे कुठे तुम्ही राहाल, पशूचे किंवा पक्ष्याच्या रक्ताचे केव्हाही सेवन करू नये.
- लेवीय ७:२७सुमारे इ.स.पू. १४९०
जो कोणी ते खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा.”
- लेवीय ७:२८सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय ७:२९सुमारे इ.स.पू. १४९०
इस्राएली लोकांस सांग: जो कोणी याहवेहसाठी शांत्यर्पण आणेल, त्याने त्याचा काही भाग याहवेहला अर्पणासाठी वेगळा आणावा.
- लेवीय ७:३०सुमारे इ.स.पू. १४९०
त्याने तो स्वहस्ते याहवेहस अर्पण करावा. चरबी व ऊर यांचे अर्पण आणून वेदीसमोर ओवाळले जाऊन ते याहवेहला ओवाळणीचे अर्पण करावे.
- लेवीय ७:३१सुमारे इ.स.पू. १४९०
मग याजक चरबीचे वेदीवर हवन करेल, पण ऊर अहरोन व त्याच्या पुत्रांचे होईल.
- लेवीय ७:३२सुमारे इ.स.पू. १४९०
तू त्याची उजवी मांडी शांत्यर्पणाचा भाग म्हणून याजकास द्यावी.
- लेवीय ७:३३सुमारे इ.स.पू. १४९०
अहरोनाच्या पुत्रांपैकी जो शांत्यर्पणातील रक्त व चरबी अर्पण करेल, त्याला त्याचा वाटा म्हणून उजवी मांडी देण्यात यावी.
- लेवीय ७:३४सुमारे इ.स.पू. १४९०
कारण ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही इस्राएली लोकांतर्फे याजक अहरोन आणि त्याच्या पुत्रांना दिली आहेत. शांत्यर्पणाचा हा भाग त्यांचा सर्वकाळचा वाटा म्हणून देण्यात यावा.
- लेवीय ७:३५सुमारे इ.स.पू. १४९०
होमार्पणातील हा भाग याहवेहची सेवा करण्यासाठी नेमलेल्या सर्व याजकांना, म्हणजेच अहरोन व त्याच्या पुत्रांना दिला पाहिजे.
- लेवीय ७:३६सुमारे इ.स.पू. १४९०
कारण याहवेहनी त्यांचा अभिषेक केला, त्याच दिवशी त्यांनी इस्राएली लोकांना आज्ञा दिली की, त्यांनी हा सर्वकाळचा वाटा त्या वंशाला पिढ्यान् पिढ्या द्यावा.
- लेवीय ७:३७सुमारे इ.स.पू. १४९०
होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकांच्या अभिषेकाचे अर्पण व शांत्यर्पण यांच्या विधीसंबंधीचे हे नियम आहेत.
- लेवीय ७:३८सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहनी हे नियम सीनाय पर्वतावर मोशेला दिले. सीनायच्या रानात इस्राएली लोकांना याहवेहप्रीत्यर्थ कोणती अर्पणे आणावी म्हणून मोशेला हे नियम देण्यात आले.
- लेवीय ८:१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय ८:२सुमारे इ.स.पू. १४९०
“अहरोन आणि त्याच्या पुत्रांना, त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणासाठी एक गोर्हा, दोन मेंढे आणि टोपलीभर बेखमीर भाकरी घेऊन ये,
- लेवीय ८:३सुमारे इ.स.पू. १४९०
आणि सर्व लोकांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र कर.”
- लेवीय ८:४सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केले आणि सर्व लोक सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमले.
- लेवीय ८:५सुमारे इ.स.पू. १४९०
तेव्हा मोशेने सर्व लोकांना म्हटले, “याहवेहने जे करण्यास आज्ञा दिली आहे, ते हेच आहे.”