मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीय ८:३१सुमारे इ.स.पू. १४९०

    मग मोशे, अहरोन व त्याच्या पुत्रांना म्हणाला, “मी तुम्हाला आज्ञा दिली होती त्याप्रमाणे, सभामंडपाच्या प्रवेशद्वारात मांस शिजवा व ते मांस टोपलीतील समर्पित भाकरीसह खावे.

  2. लेवीय ८:३२सुमारे इ.स.पू. १४९०

    उरलेले मांस व भाकरी मात्र अग्नीत जाळून टाका.

  3. लेवीय ८:३३सुमारे इ.स.पू. १४९०

    मग सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही सभामंडपाच्या द्वाराबाहेर जाऊ नका, कारण तुमचा समर्पणविधी सात दिवसाचा आहे.

  4. लेवीय ८:३४सुमारे इ.स.पू. १४९०

    आज जो विधी करण्यात आला तो तुमच्या प्रायश्चित्तासाठी याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे करण्यात आला.

  5. लेवीय ८:३५सुमारे इ.स.पू. १४९०

    शिवाय, सात दिवस सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ रात्रंदिवस राहून, याहवेहने दिलेल्या आज्ञेचे पालन केल्याने तुम्ही मरणार नाही, कारण मला अशी आज्ञा देण्यात आली आहे.”

  6. लेवीय ८:३६सुमारे इ.स.पू. १४९०

    तेव्हा अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी ते सर्वकाही केले जे करण्याची आज्ञा याहवेहनी मोशेद्वारे त्यांना दिली होती.

  7. लेवीय ९:१सुमारे इ.स.पू. १४९०

    आठव्या दिवशी मोशेने अहरोन आणि त्याचे पुत्र व इस्राएलच्या पुढाऱ्यांना बोलाविले.

  8. लेवीय ९:२सुमारे इ.स.पू. १४९०

    तो अहरोनाला म्हणाला, “तुझ्या पापार्पणासाठी व्यंग नसलेला एक गोर्‍हा व होमार्पणासाठी व्यंग नसलेला एक मेंढा घेऊन याहवेहसमोर अर्पण कर.

  9. लेवीय ९:३सुमारे इ.स.पू. १४९०

    मग इस्राएली लोकांना सांग: तुम्ही तुमच्या पापार्पणासाठी एक बोकड व होमार्पणासाठी एक गोर्‍हा व एक कोकरू निवडून घ्यावे. ही दोन्ही एका वर्षांची असून व्यंग नसलेली असावीत,

  10. लेवीय ९:४सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि याहवेहसमोर शांत्यर्पणाचे बली म्हणून एक गोर्‍हा आणि एक मेंढा व अन्नार्पणासाठी तेल मिसळलेले अन्नबली आणावे. कारण याहवेह आज तुम्हाला दर्शन देणार आहेत.”

  11. लेवीय ९:५सुमारे इ.स.पू. १४९०

    म्हणून मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सभामंडपापुढे सर्वकाही आणले आणि संपूर्ण मंडळी याहवेहसमोर येऊन उभी राहिली.

  12. लेवीय ९:६सुमारे इ.स.पू. १४९०

    तेव्हा मोशे म्हणाला, “हे करण्याची आज्ञा तुम्हाला याहवेहनी दिली आहे, जेणेकरून याहवेहचे गौरव तुम्हाला प्रकट व्हावे.”

  13. लेवीय ९:७सुमारे इ.स.पू. १४९०

    मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ ये आणि तुझे पापार्पण आणि तुझे होमार्पण यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर; लोकांसाठी बलीचे अर्पण कर आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर, याहवेहने आज्ञा दिली त्याप्रमाणे ते कर.”

  14. लेवीय ९:८सुमारे इ.स.पू. १४९०

    तेव्हा अहरोन वेदीजवळ गेला आणि त्याने स्वतःच्या पापासाठी गोर्‍ह्याचा वध केला.

  15. लेवीय ९:९सुमारे इ.स.पू. १४९०

    मग अहरोनाचे पुत्र त्या गोर्‍ह्याचे रक्त घेऊन त्याच्याकडे आले आणि अहरोनाने आपले बोट रक्तात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले; उर्वरित रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतून दिले.

  16. लेवीय ९:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेहनी मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा यांचा वेदीवर होम केला.

  17. लेवीय ९:११सुमारे इ.स.पू. १४९०

    कातडे व मांस मात्र त्याने वस्तीबाहेर नेऊन अग्नीत जाळले.

  18. लेवीय ९:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    मग अहरोनाने स्वतःच्या होमबलीचा वध केला आणि त्या बलीचे रक्त त्याच्या पुत्रांनी त्याला सोपवून दिले व त्याने ते वेदीभोवती शिंपडले.

  19. लेवीय ९:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे केले व ते तुकडे शिरासह अहरोनाकडे दिले आणि अहरोनाने त्या प्रत्येक भागाचा वेदीवर होम केला.

  20. लेवीय ९:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याने आतडी व पाय धुऊन वेदीवरील होमार्पणासह त्यांचा होम केला.

  21. लेवीय ९:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    मग लोकांनी आणलेली अर्पणे अहरोनाने अर्पण केली. लोकांसाठी पापार्पण म्हणून आणलेल्या पापबलीच्या बोकडाचा जसा वध केला, तसाच या बोकडाचाही वध केला.

  22. लेवीय ९:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर त्याने होमार्पण आणले आणि सूचना दिल्याप्रमाणे त्याचे अर्पण केले.

  23. लेवीय ९:१७सुमारे इ.स.पू. १४९०

    मग त्याने सकाळच्या होमार्पणाबरोबर अन्नार्पणही सादर केले व त्यातील मूठभर धान्य वेदीवर जाळून टाकले.

  24. लेवीय ९:१८सुमारे इ.स.पू. १४९०

    यानंतर अहरोनाने लोकांच्या शांत्यर्पणाच्या गोर्‍ह्याचा आणि मेंढ्यांचा वध केला आणि त्याच्या पुत्रांनी त्याला रक्त सोपविले आणि त्याने ते वेदीच्या सभोवार शिंपडले.

  25. लेवीय ९:१९सुमारे इ.स.पू. १४९०

    परंतु त्याने गोर्‍ह्याची व मेंढ्याची चरबी, म्हणजे चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा