मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीय ८:६सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर मोशेने अहरोन आणि त्याच्या पुत्रांना पुढे आणले आणि त्यांना पाण्याने आंघोळ घातली.

  2. लेवीय ८:७सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याने अहरोनास अंगरखा घातला, कंबरपट्टा कसला, झगा घातला, झग्यावर एफोद घातले, एफोदावर सुशोभित केलेला कमरबंद त्याच्या सभोवती बांधला.

  3. लेवीय ८:८सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर त्याने अहरोनाला ऊरस्त्राण घातले व त्यात उरीम व थुम्मीम ठेवले.

  4. लेवीय ८:९सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर त्याच्या डोक्यावर फेटा बांधला. त्या फेट्याच्या पुढील भागी सोन्याची एक पट्टी म्हणजे पवित्र मुद्रा जोडली, याहवेहने मोशेला आज्ञा दिल्यानुसार त्याने हे केले.

  5. लेवीय ८:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन, निवासमंडप व त्यातील जे सर्वकाही होते, त्यांना अभिषेक करून ती पवित्र केली.

  6. लेवीय ८:११सुमारे इ.स.पू. १४९०

    काही तेल त्याने वेदीवर सात वेळा शिंपडले; वेदी आणि त्यावरील सर्व उपकरणे, हात धुण्याचे भांडे व त्याची बैठक पवित्र करण्यासाठी त्याने ते तेल त्यांच्यावरही शिंपडले.

  7. लेवीय ८:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    मग त्याने अभिषेकाचे थोडे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र केले.

  8. लेवीय ८:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    मग मोशेने अहरोनाच्या पुत्रांना पुढे आणले, त्यांना झगे घातले, कमरपट्टे कसले व फेटे बांधले, याहवेहने मोशेला आज्ञा दिल्यानुसार त्याने हे केले.

  9. लेवीय ८:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    मग मोशेने पापार्पणाच्या यज्ञबलीसाठी एक गोर्‍हा आणला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

  10. लेवीय ८:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    मग मोशेने त्या गोर्‍ह्याचा वध केला आणि वेदी पवित्र करण्यासाठी त्या गोर्‍ह्याचे रक्त वेदी व तिची चारही शिंगे यांना आपल्या बोटांनी लावले. शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतले. अशाप्रकारे वेदीसाठी प्रायश्चित्त करून त्याने वेदी पवित्र केली.

  11. लेवीय ८:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    मोशेने आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील लांब पाळ, दोन्ही गुरदे काढून घेऊन तिचे वेदीवर हवन केले.

  12. लेवीय ८:१७सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने गोर्‍हा, त्याची कातडी, त्याचे मांस आणि आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकले.

  13. लेवीय ८:१८सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर त्याने होमार्पणासाठी एक मेंढा घेतला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

  14. लेवीय ८:१९सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर मोशेने त्याचा वध केला आणि त्या मेंढ्याचे रक्त वेदीभोवती शिंपडले.

  15. लेवीय ८:२०सुमारे इ.स.पू. १४९०

    मग मोशेने तो मेंढा कापून त्याचे तुकडे केले आणि त्या तुकड्यांसह डोके व चरबी यांचा होम केला.

  16. लेवीय ८:२१सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याची आतडी व खूर पाण्याने धुऊन त्याने संपूर्ण मेंढ्याचे वेदीवर होम केले. हे होमार्पण आहे. ते सुवासिक असे, याहवेहसाठी सादर केलेले अन्नार्पण आहे, जसे याहवेहने मोशेला आज्ञा केली होती.

  17. लेवीय ८:२२सुमारे इ.स.पू. १४९०

    मग मोशेने दुसरा मेंढा, अर्थात् समर्पणाचा मेंढा घेतला व अहरोन व त्याच्या पुत्रांनी मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

  18. लेवीय ८:२३सुमारे इ.स.पू. १४९०

    मग मोशेने त्याचा वध केला व त्याचे काही रक्त घेऊन ते अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला व उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावले.

  19. लेवीय ८:२४सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर मोशेने काही रक्त अहरोनाच्या पुत्रांच्या उजव्या कानाच्या पाळ्यांना व उजव्या हाताच्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावले. उर्वरित सर्व रक्त त्याने वेदीभोवती शिंपडले.

  20. लेवीय ८:२५सुमारे इ.स.पू. १४९०

    मग त्याने सर्व चरबी आणि चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाची लांब पाळ व उजवी मांडी ही घेतली.

  21. लेवीय ८:२६सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि बेखमीर भाकरीची टोपली, जी याहवेहसमोर होती त्यातून त्याने एक जाड भाकर, जैतुनाच्या तेलात मळलेली एक जाड भाकर आणि एक पातळ भाकर घेतली, आणि त्याने ते सर्व चरबीच्या भागावर आणि उजव्या मांडीवर ठेवले.

  22. लेवीय ८:२७सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याने हे सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातांवर ठेवले आणि त्यांनी ते याहवेहसमोर हेलावणीचे अर्पण घेऊन त्याची ओवाळणी केली.

  23. लेवीय ८:२८सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर मोशेने ते सर्व त्यांच्या हातातून घेतले आणि ते वेदीवर होमार्पणासहित समर्पणाचे अर्पण म्हणून सादर केले, हा याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण होते.

  24. लेवीय ८:२९सुमारे इ.स.पू. १४९०

    मग मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेतला, हा समर्पणाच्या गोर्‍ह्याचा त्याचा स्वतःचा वाटा होता, तो त्याने ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळले. याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.

  25. लेवीय ८:३०सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर मोशेने अभिषेकाचे थोडे तेल व वेदीवरील थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याच्या वस्त्रावर आणि त्याच्या पुत्रांवर व त्यांच्या वस्त्रांवर शिंपडले. अशारितीने मोशेने अहरोन व त्याचे पुत्र यांना याहवेहच्या सेवेसाठी पवित्र केले.