Hur
Hur चा उल्लेख असलेली वचने
मग मोशेने सांगितल्याप्रमाणे यहोशुआ अमालेकी सैन्याशी लढला आणि मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या शिखरावर गेले.
जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.
तो वडीलजनांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत येथेच थांबा, जर कोणाचा काही वाद असला तर त्यांनी अहरोन आणि हूर तुमच्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे जावे.”
“पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे.
मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे,
याहवेहने मोशेला जे सर्व आज्ञापिले होते ते यहूदाह वंशातील हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याने तयार केले;
अजुबाहच्या मृत्यूनंतर कालेबाने एफ्राथेशी विवाह केला. तिच्या पोटी त्यास हूर झाला.
हूरास उरी झाला व उरीस बसालेल झाला.
ही कालेबाची संतती होय. एफ्राथेचा ज्येष्ठपुत्र हूरचे पुत्र: शोबाल हा किर्याथ-यआरीमाचा पिता होता.
यहूदाहचे वंशज: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.
पेनुएल गदोरचा पिता होता, आणि एजेरला हूशा झाला. हूरचे वंशज: ज्येष्ठपुत्र एफ्राथाह आणि तो बेथलेहेमाचा पिता होता.
परंतु हूरचा पुत्र, उरीचा पुत्र बसालेलाने गिबोनात कास्याच्या धातूची वेदी याहवेहच्या कोशासमोर बनविली होती; आता शलोमोन व सर्व लोक त्यांची इच्छा जाणून घेण्यास आले.