मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीय ११:१सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  2. लेवीय ११:२सुमारे इ.स.पू. १४९०

    “इस्राएली लोकांना सांग: पृथ्वीवर राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी हे प्राणी तुम्ही खाऊ शकता.

  3. लेवीय ११:३सुमारे इ.स.पू. १४९०

    ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता.

  4. लेवीय ११:४सुमारे इ.स.पू. १४९०

    “जे प्राणी फक्त रवंथ करतात किंवा त्यांचे फक्त खूर दुभागलेले आहेत, ते तुम्ही खाऊ नयेत. उंट जरी रवंथ करतात तरी त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.

  5. लेवीय ११:५सुमारे इ.स.पू. १४९०

    रानससा जरी रवंथ करतो तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.

  6. लेवीय ११:६सुमारे इ.स.पू. १४९०

    ससा जरी रवंथ करतो, तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात; तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.

  7. लेवीय ११:७सुमारे इ.स.पू. १४९०

    डुकरे देखील अशुद्ध आहेत; जरी त्यांचे दुभागलेले खूर आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत.

  8. लेवीय ११:८सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.

  9. लेवीय ११:९सुमारे इ.स.पू. १४९०

    “समुद्राच्या आणि नद्यांच्या पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी तुम्ही कल्ले आणि खवले असलेले कोणतेही प्राणी खाऊ शकता.

  10. लेवीय ११:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    पण ज्यांना कल्ले व खवले नाहीत—मग ते समुद्रात राहणारे वा इतर जलचर असोत—असे सर्व मासे तुम्हाला निर्विवाद अशुद्ध असून निषिद्ध आहेत.

  11. लेवीय ११:११सुमारे इ.स.पू. १४९०

    तुम्ही ते अशुद्ध समजावे व ते खाऊ नयेत किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्शही करू नये.

  12. लेवीय ११:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    ज्यांना कल्ले व खवले नाहीत असा प्रत्येक जलचर प्राणी तुम्हाला निषिद्ध आहे.

  13. लेवीय ११:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    “जे पक्षी तुम्ही अशुद्ध समजावेत आणि ते तुम्ही खाऊ नयेत कारण ते अशुद्ध आहेत ते हे: गरुड, गिधाड, काळे गिधाड,

  14. लेवीय ११:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    लाल पतंग, कोणत्याही जातीचे काळे पतंग,

  15. लेवीय ११:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    कोणत्याही जातीचे कावळे,

  16. लेवीय ११:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    शिंग असलेले घुबड, किंचाळणारे घुबड, समुद्रपक्षी, सर्व जातीचे बहिरी ससाणे,

  17. लेवीय ११:१७सुमारे इ.स.पू. १४९०

    लहान घुबड, करढोक, मोठे घुबड,

  18. लेवीय ११:१८सुमारे इ.स.पू. १४९०

    पांढरे घुबड, वाळवंटी घुबड, कुरर,

  19. लेवीय ११:१९सुमारे इ.स.पू. १४९०

    करकोचा, कोणत्याही प्रकारचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.”

  20. लेवीय ११:२०सुमारे इ.स.पू. १४९०

    चार पाय असलेले उडणारे कीटक तुम्ही खाऊ नये, ते तुमच्यासाठी अशुद्ध समजले जातात.

  21. लेवीय ११:२१सुमारे इ.स.पू. १४९०

    तरीसुद्धा उडणारे कीटक, जे त्यांच्या चारही पायांवर चालतातः जमिनीवर उड्या मारण्याकरिता ज्यांच्या पायांवर एकजोड असतो, ते तुम्ही खाऊ शकता.

  22. लेवीय ११:२२सुमारे इ.स.पू. १४९०

    उड्या मारीत चालणारे सर्व जातींचे टोळ, नाकतोडे, खरपुडे व गवतेटोळ तुम्ही खावेत.

  23. लेवीय ११:२३सुमारे इ.स.पू. १४९०

    मात्र चार पाय असून जे उडतात ते सर्व कीटक तुम्हाला निषिद्ध आहेत.

  24. लेवीय ११:२४सुमारे इ.स.पू. १४९०

    वर उल्लेखलेल्या प्राण्यांमुळे तुम्ही अशुद्ध व्हाल, जो कोणी त्यांच्या मृतशरीराना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  25. लेवीय ११:२५सुमारे इ.स.पू. १४९०

    जे कोणी त्यांचे मृतदेह उचलतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील.