मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीय १२:४सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर पुढील तेहतीस दिवस संपेपर्यंत ती बाळंतपणात होणार्‍या आपल्या रक्तस्त्रावाच्या अशुद्धतेपासून शुद्ध होत असताना, तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये अथवा पवित्रस्थानात जाऊ नये.

  2. लेवीय १२:५सुमारे इ.स.पू. १४९०

    जर ती कन्येला जन्म देईल, तर ती स्त्री जशी तिच्या मासिक पाळीच्या वेळेस अशुद्ध राहते तशी ती चौदा दिवस अशुद्ध राहील. नंतर रक्तस्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तिने सहासष्ट दिवस वाट पाहावी.”

  3. लेवीय १२:६सुमारे इ.स.पू. १४९०

    हे शुद्ध होण्याचे दिवस संपल्यानंतर तिला पुत्र झालेला असो की कन्या, तिला पुढील नियम लागू आहेत: तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरू आणावे व पापार्पणासाठी होला किंवा पारव्याचे पिलू सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे घेऊन जावे.

  4. लेवीय १२:७सुमारे इ.स.पू. १४९०

    याजक याहवेहला ते अर्पण करून तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल म्हणजे बाळंतपणात होणार्‍या रक्तस्त्रावापासून ती विधिपूर्वक शुद्ध होईल. पुत्र किंवा कन्या झालेल्या स्त्री विषयी हा विधिनियम आहे.

  5. लेवीय १२:८सुमारे इ.स.पू. १४९०

    जर कोकरू आणण्याइतकी तिची ऐपत नसेल, तर तिने एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले आणावी. त्याचे अर्पण करून याजक तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल, म्हणजे ती पुन्हा विधिपूर्वक शुद्ध होईल.

  6. लेवीय १३:१सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  7. लेवीय १३:२सुमारे इ.स.पू. १४९०

    “जेव्हा एखाद्या मनुष्याच्या त्वचेवर सूज, पुरळ किंवा पुटकुळी आली आणि त्यामुळे त्याची त्वचा पांढरी झाली असली, तो कुष्ठरोगाचा चट्टा असेल, त्याला अहरोन याजकाकडे किंवा याजक असलेले त्याचे पुत्र यापैकी एकाकडे आणावे.

  8. लेवीय १३:३सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने त्या व्यक्तीच्या त्वचेवरील चट्टा तपासावा आणि चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील व तो त्वचेपेक्षा खोल गेलेला असेल, तर हा कुष्ठरोग समजावा; आणि याजकाने त्या व्यक्तीचा तपासणी केल्यावर, त्याला विधिनियमानुसार अशुद्ध म्हणून जाहीर करावे.

  9. लेवीय १३:४सुमारे इ.स.पू. १४९०

    जर त्वचेवरील चट्टा पांढरा असेल, परंतु तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झाले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे.

  10. लेवीय १३:५सुमारे इ.स.पू. १४९०

    सातव्या दिवशी, याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवरील चट्टा अधिक पसरलेला नसेल, तर याजकाने त्याला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.

  11. लेवीय १३:६सुमारे इ.स.पू. १४९०

    सातव्या दिवशी, याजकाने त्याची पुन्हा तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला आहे व तो त्वचेवर पसरला नसेल, तर तो शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे; कारण तो साधारण खवंद होय. त्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत आणि पूर्ववत शुद्ध व्हावे.

  12. लेवीय १३:७सुमारे इ.स.पू. १४९०

    परंतु याजकापुढे शुद्ध सिद्ध झाल्यावर, तो चट्टा त्वचेवर पसरू लागला, तर त्या व्यक्तीने स्वतःला पुन्हा याजकासमोर हजर करावे.

  13. लेवीय १३:८सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने त्या व्यक्तीची तपासणी करावी आणि खवंद त्वचेवर पसरलेला दिसून आल्यास, त्याला अशुद्ध असे जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे.

  14. लेवीय १३:९सुमारे इ.स.पू. १४९०

    “एखाद्या मनुष्याला कुष्ठरोग झाला असेल, तर त्याला याजकाकडे न्यावे.

  15. लेवीय १३:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवर पांढरी सूज येऊन आणि तेथील केस पांढरे झाले असतील आणि सूजेवर उघडी जखम आढळल्यास,

  16. लेवीय १३:११सुमारे इ.स.पू. १४९०

    तर हा जुना कुष्ठरोग असून याजकाने त्या व्यक्तीला अशुद्ध म्हणून जाहीर करावे, यापुढे त्याला अधिक तपासणीसाठी वेगळे ठेवू नये; कारण तो अशुद्धच आहे.”

  17. लेवीय १३:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    जर कुष्ठरोग सर्व त्वचेवर पसरलेला असेल आणि याजक जितके पाहू शकतो तितके म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पसरलेला असेल तर,

  18. लेवीय १३:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते कोड संपूर्ण शरीरावर पसरलेले असेल तर त्याने त्याला शुद्ध म्हणून जाहीर करावे. कुष्ठरोगापासून बरा झाला आहे, असे जाहीर करावे; कारण तो संपूर्ण शुभ्र झाला आहे, म्हणजेच तो शुद्ध होय.

  19. लेवीय १३:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    परंतु त्यांच्यावर उघडी जखम आढळल्यास, ते अशुद्ध समजावे.

  20. लेवीय १३:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने त्वचेवरील जखम पाहून त्या व्यक्तीला अशुद्ध जाहीर करावे; त्वचा नसलेले मांस अशुद्ध असून ते कुष्ठरोग आहे; हा गंभीर आजार आहे.

  21. लेवीय १३:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    परंतु उघडी जखम फिरून पांढरी पडली तर त्या कुष्ठरोग्याने याजकाकडे यावे.

  22. लेवीय १३:१७सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने त्यांना तपासावे, जर तो भाग खरोखर पूर्णपणे पांढरा झालेला असेल, तर तो मनुष्य शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे.

  23. लेवीय १३:१८सुमारे इ.स.पू. १४९०

    ज्या माणसाच्या त्वचेवर फोड येऊन पुढे तो फोड बरा झाला

  24. लेवीय १३:१९सुमारे इ.स.पू. १४९०

    व फोडाच्या जागी तांबूस पांढरा चट्टा राहिला, तर त्याने याजकाकडे तपासणीसाठी गेले पाहिजे.

  25. लेवीय १३:२०सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर तो चट्टा त्वचेखाली खोलवर गेला असेल आणि त्याच्यावरील केस पांढरे झाले असतील, तर याजकाने त्याला अशुद्ध म्हणून जाहीर करावे; कारण फोडामधून कुष्ठरोग निर्माण झाला आहे.