मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीय १३:४६सुमारे इ.स.पू. १४९०

    जोपर्यंत कुष्ठरोग टिकून आहे, तोपर्यंत तो मनुष्य अशुद्ध असून त्याने छावणीबाहेर एकटे राहावे.

  2. लेवीय १३:४७सुमारे इ.स.पू. १४९०

    एखाद्या लोकरीच्या वा तागमिश्रित सुताच्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला रोगाचा संसर्ग झाला आहे,

  3. लेवीय १३:४८सुमारे इ.स.पू. १४९०

    सुताच्या, लोकरीच्या ताण्याने विणलेले वस्त्र वा तागमिश्रित चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोग झाला आहे, असा संशय आला

  4. लेवीय १३:४९सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि जर ते चामड्याच्या, विणलेल्या वस्त्रावर, अथवा चामड्याच्या वस्तूवर हिरवट किंवा तांबूस चट्टा असला, तर तो कुष्ठरोगच आहे, म्हणून तपासणीसाठी ती वस्तू याजकाकडे अवश्य घेऊन जावी.

  5. लेवीय १३:५०सुमारे इ.स.पू. १४९०

    याजक ती वस्तू सात दिवसापर्यंत वेगळी ठेवील व सातव्या दिवशी त्या चट्ट्याची पुन्हा तपासणी करेल. तो चट्टा पसरला असेल, तर त्या विणलेल्या किंवा चामड्याच्या वस्त्राला वा वस्तूला संसर्गजन्य कुष्ठरोग झाला आहे असे समजावे; ती वस्तू अशुद्ध होय.

  6. लेवीय १३:५१सुमारे इ.स.पू. १४९०

    And he shall look on the plague on the seventh day: if the plague be spread in the garment, either in the warp, or in the woof, or in a skin, or in any work that is made of skin; the plague is a fretting leprosy; it is unclean.

  7. लेवीय १३:५२सुमारे इ.स.पू. १४९०

    तेव्हा याजकाने ती वस्त्रे, ते कापड किंवा ती विणलेली लोकरीची वा चामड्याची वस्तू संसर्गजन्य आहे असे म्हणून अग्नीत जाळून टाकावी.

  8. लेवीय १३:५३सुमारे इ.स.पू. १४९०

    पण सातव्या दिवशी ते विणलेले वस्त्र किंवा चामड्याची वस्तू तपासली असता तो चट्टा पसरला नाही, असे याजकाला दिसून आले, तर त्याने कुष्ठरोगाची शंका असलेली वस्तू धुऊन टाकण्याचा आदेश द्यावा व नंतर आणखी सात दिवस ती वेगळी ठेवावी.

  9. लेवीय १३:५४सुमारे इ.स.पू. १४९०

    Then the priest shall command that they wash the thing wherein the plague is, and he shall shut it up seven days more:

  10. लेवीय १३:५५सुमारे इ.स.पू. १४९०

    मग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो पसरला नाही. तरी तो अशुद्ध आहे असे समजावे; ती वस्तू जाळून टाकावी कारण तिला आतून, बाहेरून, सगळीकडून कुष्ठरोगाचा संसर्ग पोहोचला आहे असे समजावे.

  11. लेवीय १३:५६सुमारे इ.स.पू. १४९०

    पण धुतल्यानंतर चट्ट्याचा रंग फिकट झाला आहे, असे याजकाला दिसून आले, तर त्याने चट्टा असलेल्या विणलेल्या कापडाच्या वा चामड्याच्या वस्तूचा तेवढाच भाग कापून टाकावा.

  12. लेवीय १३:५७सुमारे इ.स.पू. १४९०

    इतके करूनही जर तो चट्टा या विणलेल्या वस्त्रावर किंवा चामड्याच्या वस्तूवर पुन्हा फुलून निघाला, तर याजकाने ती वस्तू अवश्य जाळून टाकावी, कारण तिला कुष्ठरोग आहे.

  13. लेवीय १३:५८सुमारे इ.स.पू. १४९०

    पण ती विणलेल्या कापडाची किंवा चामड्याची वस्तू धुतल्यानंतर तिच्यावरील चट्टा नाहीसा झाला, तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी, म्हणजे ती शुद्ध होईल.

  14. लेवीय १३:५९सुमारे इ.स.पू. १४९०

    लोकरीच्या व तागमिश्रित सुताच्या विणलेल्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला, चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहे.

  15. लेवीय १४:१सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह मोशेला म्हणाले,

  16. लेवीय १४:२सुमारे इ.स.पू. १४९०

    कोणत्याही रोगग्रस्त व्यक्तीला त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीसमयी, जेव्हा त्यांना याजकाकडे आणले जाते तेव्हा हे नियम आहेत:

  17. लेवीय १४:३सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने छावणीबाहेर जाऊन बरे झालेल्या कुष्ठरोग्यांस तपासून पाहावे. जर ते कुष्ठरोगी बरे झाले आहेत असे दिसून आले,

  18. लेवीय १४:४सुमारे इ.स.पू. १४९०

    याजक आज्ञा करतील की दोन जिवंत शुद्ध पक्षी आणि काही गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी आणि एजोब त्या व्यक्तीच्या शुद्धीकरणासाठी आणाव्यात.

  19. लेवीय १४:५सुमारे इ.स.पू. १४९०

    मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात त्यापैकी एक पक्षी मारावा;

  20. लेवीय १४:६सुमारे इ.स.पू. १४९०

    गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन दुसर्‍या जिवंत पक्ष्यासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात या सर्व वस्तू बुडवाव्यात.

  21. लेवीय १४:७सुमारे इ.स.पू. १४९०

    मग याजकाने ते रक्त कुष्ठरोगातून मुक्त झालेल्या व्यक्तीवर सात वेळा शिंपडावे व तो शुद्ध झाला आहे, असे जाहीर करून त्या जिवंत पक्ष्याला उघड्या शेतात सोडून द्यावे.

  22. लेवीय १४:८सुमारे इ.स.पू. १४९०

    मग शुद्ध करण्यात येणार्‍या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडण करावे व स्नान करावे; म्हणजे तो विधिनियमानुसार शुद्ध होईल. त्यानंतर त्याने छावणीत राहण्यासाठी परत यावे. तरी सात दिवसापर्यंत त्याने आपल्या तंबूबाहेरच राहावे.

  23. लेवीय १४:९सुमारे इ.स.पू. १४९०

    सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे, आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे. मग तो शुद्ध होईल.

  24. लेवीय १४:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    आठव्या दिवशी त्यांनी दोन निर्दोष कोकरे, एक वर्षांची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला एक एफाचा एकतृतीयांश भाग सपीठ आणि एक लोगभर तेल घेऊन यावे.

  25. लेवीय १४:११सुमारे इ.स.पू. १४९०

    मग शुद्ध जाहीर करणार्‍या याजकाने शुद्ध होणार्‍या मनुष्यास सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर उभे करावे.