- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय १४:१२सुमारे इ.स.पू. १४९०
नंतर याजकाने एक कोकरू व एकतृतीयांश लीटर जैतुनाचे तेल दोषार्पण म्हणून वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळावे.
- लेवीय १४:१३सुमारे इ.स.पू. १४९०
पवित्रस्थानात ज्या ठिकाणी पापार्पणाच्या व होमार्पणाच्या बलींचा वध करतात, त्या ठिकाणी याजकाने कोकराला ठार मारावे. पापार्पणातील बलीप्रमाणेच या दोषार्पणातील बली याजकाच्या हक्काचा आहे. हे परमपवित्र होय.
- लेवीय १४:१४सुमारे इ.स.पू. १४९०
मग याजकाने या दोषबलीचे काही रक्त घ्यावे आणि शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.
- लेवीय १४:१५सुमारे इ.स.पू. १४९०
मग याजकाने तेलाचा काही भाग घ्यावा आणि ते आपल्या डाव्या हाताच्या तळहातावर ओतावे,
- लेवीय १४:१६सुमारे इ.स.पू. १४९०
व याजकाने त्यात आपल्या उजव्या हाताची बोटे बुडवून ते याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे.
- लेवीय १४:१७सुमारे इ.स.पू. १४९०
यानंतर तळहातावर शिल्लक राहिलेले तेल याजकाने शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या पायाच्या व उजव्या हाताच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे.
- लेवीय १४:१८सुमारे इ.स.पू. १४९०
याजकाच्या तळहातावर शिल्लक राहिलेले सर्व तेल शुद्ध ठरविण्याच्या माणसाच्या मस्तकास लावावे. अशाप्रकारे याजकाने त्या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे.
- लेवीय १४:१९सुमारे इ.स.पू. १४९०
नंतर अशुद्धतेपासून शुद्ध झालेल्या माणसासाठी याजकाने पापबली अर्पावा व त्याच्यासाठी प्रायश्चित्ताचा विधी करावा; आणि यानंतर याजकाने होमबलीचा वध करावा,
- लेवीय १४:२०सुमारे इ.स.पू. १४९०
मग याजकाने अन्नार्पणासह, होमबली वेदीवर अर्पावा व त्या माणसासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे तो मनुष्य शुद्ध ठरेल.
- लेवीय १४:२१सुमारे इ.स.पू. १४९०
जर तो गरीब असेल आणि इतके आणण्याची त्याची ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे. अन्नार्पणासाठी जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग आणावा,
- लेवीय १४:२२सुमारे इ.स.पू. १४९०
आणि ऐपतीप्रमाणे त्याने पारव्याची दोन पिल्ले किंवा दोन होले आणावे; त्यातील एक पापबली व दुसरा होमबली म्हणून अर्पण करावा.
- लेवीय १४:२३सुमारे इ.स.पू. १४९०
“प्रायश्चित्तविधीसाठी त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी आठव्या दिवशी ते पक्षी याहवेहसमोर सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावेत.
- लेवीय १४:२४सुमारे इ.स.पू. १४९०
मग याजकाने दोषार्पणाचे कोकरू व अर्धा लीटर तेल घेऊन वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी ओवाळावे.
- लेवीय १४:२५सुमारे इ.स.पू. १४९०
त्यानंतर दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.
- लेवीय १४:२६सुमारे इ.स.पू. १४९०
मग याजकाने आपल्या डाव्या तळहातावर तेलातील काही तेल ओतावे,
- लेवीय १४:२७सुमारे इ.स.पू. १४९०
आणि याजकाने आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी सात वेळा ते याहवेहपुढे शिंपडावे.
- लेवीय १४:२८सुमारे इ.स.पू. १४९०
मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन ते शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला दोषबलीचे रक्त लावले त्या जागी लावावे.
- लेवीय १४:२९सुमारे इ.स.पू. १४९०
याजकाने त्याच्या तळहातावर उरलेले तेल त्या शुद्ध होणार्या माणसाच्या प्रायश्चित्तासाठी याहवेहपुढे त्याच्या डोक्यास लावावे.
- लेवीय १४:३०सुमारे इ.स.पू. १४९०
मग त्या व्यक्तीला परवडेल त्याप्रमाणे त्याने पारव्याच्या किंवा होल्याच्या पिल्लाचे अर्पण करावे.
- लेवीय १४:३१सुमारे इ.स.पू. १४९०
एक पक्ष्याचे पापार्पण म्हणून व दुसर्या पक्ष्याचे अन्नार्पणासह होमार्पण म्हणून अर्पणे करावी. अशाप्रकारे याजकाने शुद्ध होणार्या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे.”
- लेवीय १४:३२सुमारे इ.स.पू. १४९०
हे नियम सर्वसाधारणपणे शुद्धीकरणासाठी लागणारे अर्पण आणण्याची ऐपत नसलेल्या कुष्ठरोग्यांसाठी आहेत.
- लेवीय १४:३३सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,
- लेवीय १४:३४सुमारे इ.स.पू. १४९०
“जेव्हा तुम्ही कनान देशात प्रवेश कराल, जो मी तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, आणि मी तेथील एखाद्या घराला कुष्ठरोगाचा चट्टा देईन,
- लेवीय १४:३५सुमारे इ.स.पू. १४९०
तेव्हा त्या घराच्या मालकाने याजकाकडे येऊन त्याला सांगावे, ‘आमच्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसत आहे.’
- लेवीय १४:३६सुमारे इ.स.पू. १४९०
याजकाने घरामध्ये जाऊन चिन्हाचे परीक्षण करण्यापूर्वी, त्याने घर रिकामे करण्याचा आदेश दिला पाहिजे, अन्यथा त्या घरातील सर्व वस्तू अशुद्ध होऊ शकतील. त्यानंतर याजकाने त्या घरात प्रवेश करून त्याची तपासणी करावी.