मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीय १५:५सुमारे इ.स.पू. १४९०

    जे कोणी अशा माणसाच्या अंथरुणाला स्पर्श करतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत ते अशुद्ध राहतील.

  2. लेवीय १५:६सुमारे इ.स.पू. १४९०

    स्रावामुळे अशुद्ध झालेला मनुष्य ज्या बैठकीवर बसला असेल त्या बैठकीवर जो कोणी बसेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. त्याने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे.

  3. लेवीय १५:७सुमारे इ.स.पू. १४९०

    जो कोणी अशा मनुष्याला स्पर्श करेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  4. लेवीय १५:८सुमारे इ.स.पू. १४९०

    ज्या कोणा शुद्ध व्यक्तीवर असा मनुष्य थुंकेल, त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  5. लेवीय १५:९सुमारे इ.स.पू. १४९०

    ज्या वाहनांचा तो स्त्राव होणारा मनुष्य उपयोग करेल ते वाहन अशुद्ध होय,

  6. लेवीय १५:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि जो कोणी अशा माणसाच्या अंगाखालील वस्तूला स्पर्श करेल किंवा ती उचलेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  7. लेवीय १५:११सुमारे इ.स.पू. १४९०

    हात धुतल्याशिवाय स्त्राव होणारा मनुष्य जर कोणाला स्पर्श करेल, तर स्पर्श झालेल्या त्या मनुष्याने अवश्य आपली वस्त्रे धुवावीत आणि पाण्याने स्नान करावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  8. लेवीय १५:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    “असा मनुष्य ज्या मातीच्या पात्राला स्पर्श करेल ते अवश्य फोडून टाकावे आणि कोणत्याही लाकडाच्या भांड्याला त्याचा स्पर्श झाल्यास ते पाण्याने धुऊन घ्यावे.

  9. लेवीय १५:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    “स्राव थांबल्यावर त्याने आपली वस्त्रे धुऊन, सात दिवसांच्या शुद्ध होण्याच्या विधीची सुरुवात करावी. त्याने आपली वस्त्रे धुवावी आणि वाहत्या पाण्यात स्नान करून शुद्ध व्हावे.

  10. लेवीय १५:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घ्यावीत व सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर येऊन याजकाला ती द्यावीत.

  11. लेवीय १५:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने त्यातील एका पक्ष्याचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने त्याच्या स्त्रावासाठी याहवेहसमोर प्रायश्चित करावे.

  12. लेवीय १५:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    “जर एखाद्या मनुष्याला वीर्यपात झाला, तर त्याने संपूर्ण शरीर पाण्याने धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  13. लेवीय १५:१७सुमारे इ.स.पू. १४९०

    ज्या वस्त्रांवर वा चामड्यावर वीर्य लागले असेल, ते अवश्य धुऊन टाकावे व सायंकाळपर्यंत ते अशुद्ध समजावे.

  14. लेवीय १५:१८सुमारे इ.स.पू. १४९०

    जर एखाद्या पुरुषाने स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवले आणि या प्रक्रियेत त्याचे वीर्यस्खलन झाले, तर दोघांनीही पाण्याने स्नान केले पाहिजे. ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील.

  15. लेवीय १५:१९सुमारे इ.स.पू. १४९०

    “स्त्री ॠतुमती होते, तेव्हा तिने विधिनियमानुसार सात दिवस अशुद्ध राहावे. त्या काळात जो कोणी तिला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  16. लेवीय १५:२०सुमारे इ.स.पू. १४९०

    “याकाळात ती ज्या अंथरुणावर झोपेल किंवा बैठकीवर बसेल, ती सर्व अशुद्ध होतील

  17. लेवीय १५:२१सुमारे इ.स.पू. १४९०

    जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  18. लेवीय १५:२२सुमारे इ.स.पू. १४९०

    जो कोणी तिच्या बैठकीला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  19. लेवीय १५:२३सुमारे इ.स.पू. १४९०

    जो कोणी तिच्या अंथरुणाला किंवा बैठकीला स्पर्श करेल तो व्यक्ती सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  20. लेवीय १५:२४सुमारे इ.स.पू. १४९०

    “याकाळात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणारा पुरुष सात दिवस अशुद्ध राहील आणि ज्या बिछान्यावर तो झोपेल तो अशुद्ध समजावा.

  21. लेवीय १५:२५सुमारे इ.स.पू. १४९०

    “महिन्यात अनियमित वेळा किंवा मासिक पाळीच्या दिवसानंतरही जर ॠतुस्राव चालू राहिला, तर त्यामुळे मासिक पाळीच्या अशुद्धतेप्रमाणे ती या अशुद्ध स्त्रावात अशुद्धच राहील.

  22. लेवीय १५:२६सुमारे इ.स.पू. १४९०

    म्हणजे, नियमित मासिक पाळी चालू असलेल्या ॠतुस्रावाच्या काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल ते अशुद्ध होईल; आणि ज्या बैठकीवर बसेल ती ही अशुद्ध होईल.

  23. लेवीय १५:२७सुमारे इ.स.पू. १४९०

    जी व्यक्ती तिच्या अंथरुणाला वा बैठकीला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल. त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे आणि तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  24. लेवीय १५:२८सुमारे इ.स.पू. १४९०

    “जेव्हा ती स्त्री तिच्या स्त्रावातून शुद्ध होईल, तेव्हा तिने शुद्ध होण्यासाठी सात दिवस मोजावे, त्यानंतर ती शुद्ध होईल.

  25. लेवीय १५:२९सुमारे इ.स.पू. १४९०

    आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी;