मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीय १६:२२सुमारे इ.स.पू. १४९०

    जिथे कोणी राहत नाही अशा प्रदेशात तो बोकड लोकांच्या पापाचा भार वाहून नेईल, नंतर त्या मनुष्याने त्या बोकडाला रानात सोडून द्यावे.

  2. लेवीय १६:२३सुमारे इ.स.पू. १४९०

    “मग अहरोनाने सभामंडपात पुन्हा यावे व परमपवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागमिश्रित वस्त्रे काढावीत आणि तिथेच ठेवावीत.

  3. लेवीय १६:२४सुमारे इ.स.पू. १४९०

    नंतर त्याने पवित्रस्थानी पाण्याने स्नान करावे, आपली नियमित वस्त्रे घालावी. मग त्याने बाहेर यावे व स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्ताचे होमार्पण करावे म्हणून स्वतःसाठी होमार्पण व लोकांसाठीही होमार्पण करावे.

  4. लेवीय १६:२५सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याने पापार्पणासाठी ठेवलेल्या चरबीचा वेदीवर होम करावा.

  5. लेवीय १६:२६सुमारे इ.स.पू. १४९०

    “ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बोकड अरण्यात सोडून दिला, त्याने आपली वस्त्रे धुवावी, पाण्याने स्नान करावे आणि त्यानंतर छावणीत परत यावे.

  6. लेवीय १६:२७सुमारे इ.स.पू. १४९०

    पापार्पणाच्या ज्या गोर्‍ह्याचे व बोकडाचे रक्त अहरोनाने प्रायश्चित्तासाठी पवित्रस्थानात नेले होते, त्यांचे मृतदेह, कातडी व आतडी छावणीबाहेर नेऊन अग्नीने जाळण्यात यावीत.”

  7. लेवीय १६:२८सुमारे इ.स.पू. १४९०

    ज्या मनुष्याने ते जाळून टाकले, त्याने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे; त्यानंतर छावणीत परत यावे.

  8. लेवीय १६:२९सुमारे इ.स.पू. १४९०

    तुम्ही जो नियम सर्वकाळ पाळला पाहिजे तो हा: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे आणि—तुमच्यामध्ये जन्मलेले स्वदेशी किंवा तुमच्यामध्ये राहणारे परदेशी—कोणतेही कार्य करू नये

  9. लेवीय १६:३०सुमारे इ.स.पू. १४९०

    कारण या दिवशी तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी प्रायश्चित्त केले जाईल, तुम्ही याहवेहसमोर तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल.

  10. लेवीय १६:३१सुमारे इ.स.पू. १४९०

    तुमच्यासाठी हा विसाव्याचा शब्बाथ होय आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे; हा कायमचा नियम होय.

  11. लेवीय १६:३२सुमारे इ.स.पू. १४९०

    अभिषिक्त म्हणून आपल्या वडिलांच्या नंतर नियुक्त केलेल्या याजकाने प्रायश्चित्त करावे. त्याने पवित्र तागाची वस्त्रे घालावीत

  12. लेवीय १६:३३सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याने परमपवित्रस्थान, सभामंडप, वेदी, याजकवर्ग व इस्राएली लोक यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे.

  13. लेवीय १६:३४सुमारे इ.स.पू. १४९०

    “तुझ्यासाठी हा नेहमीचा नियम असेल: इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करावे.” याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे करण्यात आले.

  14. लेवीय १७:१सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह मोशेला म्हणाले,

  15. लेवीय १७:२सुमारे इ.स.पू. १४९०

    “अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांसाठी याहवेहने ज्या आज्ञा दिल्या त्या या आहेत:

  16. लेवीय १७:३सुमारे इ.स.पू. १४९०

    इस्राएलाच्या घराण्यातील कोणत्याही मनुष्याने बैल, कोकरू किंवा शेळी यांचा छावणीत किंवा छावणीबाहेर वध केला,

  17. लेवीय १७:४सुमारे इ.स.पू. १४९०

    परंतु याहवेहच्या निवासमंडपासमोर आणि तो प्राणी सभामंडपाच्या दाराशी याहवेहला अर्पण करण्याकरिता आणला नाही, तर त्या मनुष्याला रक्तपाताचा दोष लागेल; त्याने रक्त सांडले आहे, म्हणून त्याला आपल्या लोकातून बहिष्कृत करावे.

  18. लेवीय १७:५सुमारे इ.स.पू. १४९०

    या आज्ञेचा उद्देश असा आहे की, इस्राएली लोक जे उघड्या मैदानात यज्ञपशू मारीत होते, ते त्यांनी सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे याहवेहपुढे आणावे आणि शांत्यर्पणाचे यज्ञ म्हणून याहवेहला अर्पण करावे.

  19. लेवीय १७:६सुमारे इ.स.पू. १४९०

    याजकाने सभामंडपाच्या दाराशी असलेल्या याहवेहच्या वेदीवर रक्त शिंपडून याहवेहला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.

  20. लेवीय १७:७सुमारे इ.स.पू. १४९०

    यापुढे ज्यांच्याबरोबर ते स्वतःच व्यभिचार करतात, त्या बोकडाच्या मूर्तींना, त्यांचे कोणतेही अर्पण करू नये. हा नियम त्यांच्यासाठी आणि येणार्‍या पिढ्यांसाठी लागू आहे.”

  21. लेवीय १७:८सुमारे इ.स.पू. १४९०

    तू त्यांना सांग: इस्राएली किंवा तुमच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी यांनी होमार्पण किंवा यज्ञार्पण केले,

  22. लेवीय १७:९सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी तो प्राणी अर्पण करण्यास आणला नाही, तर त्याला आपल्या लोकांमधून बहिष्कृत करावे.

  23. लेवीय १७:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    इस्राएलांच्या घराण्यातील कोणीही किंवा त्यांच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी, जो रक्त खातो त्या माणसाविरुद्ध मी माझे मुख फिरवेन आणि मी त्यांना लोकांमधून बहिष्कृत करेन.

  24. लेवीय १७:११सुमारे इ.स.पू. १४९०

    कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या प्रायश्चित्तासाठी मी तुम्हाला वेदीवर शिंपडण्यासाठी ते दिले आहे; रक्तात जीवन असल्यामुळे प्रायश्चित्त होते.

  25. लेवीय १७:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    म्हणून मी इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुमच्यामधील कोणीही किंवा तुमच्यामध्ये राहणारा विदेशी यापैकी कोणीही रक्ताचे सेवन करू नये.”