- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय १७:१३सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘इस्राएली किंवा तुमच्यामध्ये असलेला कोणीही विदेशी शिकारीला गेला असता, त्याने खाण्यास योग्य असलेला पशू किंवा पक्षी यांची शिकार केली, तर त्याचे रक्त जमिनीवरच ओतून मातीने झाकून टाकावे,
- लेवीय १७:१४सुमारे इ.स.पू. १४९०
कारण रक्त हे प्रत्येक प्राण्याचे जीवन आहे. म्हणून इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुम्ही कोणत्याही प्राण्याचे रक्त खाऊ नका, कारण प्रत्येक प्राण्याचे जीवन हे त्याचे रक्त आहे; जो कोणी रक्ताचे सेवन करेल त्याला बहिष्कृत केलेच पाहिजे.”
- लेवीय १७:१५सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘जर कोणत्या व्यक्तीने, मग तो देशात जन्मलेला किंवा विदेशी असो, यापैकी जो कोणी मेलेल्या किंवा जंगली जनावराने फाडलेल्या मृत प्राण्याचे मांस खाईल, त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने स्नान करावे आणि तो संध्याकाळपर्यंत विधिनियमानुसार अशुद्ध राहील आणि त्यानंतर तो शुद्ध होईल.
- लेवीय १७:१६सुमारे इ.स.पू. १४९०
पण जर त्याने आपली वस्त्रे धुतली नाहीत व स्नान केले नाही, तर तो दोषीच राहील.’ ”
- लेवीय १८:१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- लेवीय १८:२सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
- लेवीय १८:३सुमारे इ.स.पू. १४९०
तुम्ही ज्या इजिप्त देशात राहिलात त्यांच्यासारखे वागू नका आणि मी तुम्हाला जिथे नेत आहे, त्या कनान देशाचे लोक जे करतात ते करू नका. त्यांच्या रीतिरिवाजाचे पालन करू नका.
- लेवीय १८:४सुमारे इ.स.पू. १४९०
तुम्ही माझ्या नियमांचे पालन केलेच पाहिजे आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञांप्रमाणे वागले पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
- लेवीय १८:५सुमारे इ.स.पू. १४९०
तुम्ही माझ्या आज्ञा आणि नियमांचे पालन करा, कारण जो व्यक्ती त्यांचे पालन करतो, तो त्यामुळे जिवंत राहील. मी याहवेह आहे.
- लेवीय १८:६सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तुमच्यापैकी कोणीही आपल्या जवळच्या नातलगाशी शारीरिक संबंध ठेऊ नये; मी याहवेह आहे.
- लेवीय १८:७सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून वडिलांचा अनादर करू नकोस. ती तुझी आई आहे; तिच्याशी संबंध ठेवू नकोस.
- लेवीय १८:८सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तुझ्या वडिलांच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; जे तुझ्या वडिलांचा अपमान करेल.
- लेवीय १८:९सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध तू ठेवू नकोस, तुझ्या वडिलांची कन्या असो किंवा तुझ्या आईची कन्या, मग ती एकाच घरात जन्मली असेल किंवा इतरत्र.
- लेवीय १८:१०सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तू तुझ्या पुत्राच्या कन्येशी किंवा तुझ्या कन्येच्या कन्येशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; त्यामुळे तुझा अपमान होईल.
- लेवीय १८:११सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तुझ्या पित्याच्या पत्नीच्या कन्येशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझी बहीण आहे.
- लेवीय १८:१२सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तू तुझ्या पित्याच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझ्या पित्याची जवळची नातेवाईक आहे.
- लेवीय १८:१३सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तुझ्या मातेच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस, कारण ती तुझ्या आईची जवळची नातेवाईक आहे.
- लेवीय १८:१४सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘आपल्या पित्याच्या भावाचा त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवून त्याचा अपमान करू नका; ती तुझी चुलती आहे.
- लेवीय १८:१५सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तू तुझ्या सूनेशी शारीरिक संबंध ठेवू नकोस. ती तुझ्या पुत्राची पत्नी होय; तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू नकोस.
- लेवीय १८:१६सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तुझ्या भावाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेऊ नकोस; हा तुझ्या भावाचा अपमान आहे.
- लेवीय १८:१७सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तू एखाद्या स्त्रीसोबत आणि तिच्या कन्येसोबत शारीरिक संबंध ठेऊ नकोस. तिच्या पुत्राच्या किंवा कन्येच्या कन्येशी तू शारीरिक संबंध ठेऊ नकोस, कारण ते तिचे जवळचे नातेवाईक आहेत; आणि असे करणे भयंकर पाप आहे.
- लेवीय १८:१८सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तुझी पत्नी जिवंत असताना तिची वैरीण म्हणून तिच्या बहिणीशी विवाह करू नकोस आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नका.
- लेवीय १८:१९सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘स्त्री ॠतुमती असताना तिच्या अशुद्धतेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला जाऊ नको.
- लेवीय १८:२०सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तू आपल्या शेजार्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेऊ नकोस आणि स्वतःला भ्रष्ट करू नकोस.
- लेवीय १८:२१सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तू आपल्या संतानांपैकी कोणालाही मोलख दैवतासाठी यज्ञबली म्हणून अर्पण करू नये, कारण असा यज्ञ केल्याने तुझ्या परमेश्वराच्या नावाचा अनादर होतो. मी याहवेह आहे.