- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय १४:३७सुमारे इ.स.पू. १४९०
त्याने घराच्या भिंतींची तपासणी करून त्यावरील चट्टा भिंतींपेक्षा खोलवर हिरवट किंवा लालसर आहे, असे याजकाला आढळले,
- लेवीय १४:३८सुमारे इ.स.पू. १४९०
तर याजकाने घराबाहेर दाराजवळ यावे आणि ते घर सात दिवस बंद ठेवावे.
- लेवीय १४:३९सुमारे इ.स.पू. १४९०
मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा भिंतीवर पसरला असेल,
- लेवीय १४:४०सुमारे इ.स.पू. १४९०
तर याजकाने चट्टा असलेला भाग काढून तो नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी.
- लेवीय १४:४१सुमारे इ.स.पू. १४९०
नंतर भिंतीचा आतील भाग पूर्णपणे खरवडून त्याची दगड व माती नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी.
- लेवीय १४:४२सुमारे इ.स.पू. १४९०
मग त्या जागी बसविण्यासाठी दुसरे दगड आणावेत व नव्या चुन्याचा गिलावा करावा.”
- लेवीय १४:४३सुमारे इ.स.पू. १४९०
दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर तो चट्टा पुन्हा आला,
- लेवीय १४:४४सुमारे इ.स.पू. १४९०
तर याजकाने आत येऊन तो तपासावा, आणि जर चट्टा पसरला आहे असे त्याला दिसून आले, तर तो न निघणारा कुष्ठरोग असून ते घर अशुद्ध झाले आहे.
- लेवीय १४:४५सुमारे इ.स.पू. १४९०
मग ते घर पाडून टाकण्यात यावे व त्या घराचे दगड, चुना, लाकूड नगराबाहेर नेऊन अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावे.
- लेवीय १४:४६सुमारे इ.स.पू. १४९०
असे घर बंद असता जो कोणी त्या घरात शिरेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील,
- लेवीय १४:४७सुमारे इ.स.पू. १४९०
जर कोणी अशा घरात झोपेल किंवा जेवेल, तर त्याने आपली वस्त्रे धुवावी.
- लेवीय १४:४८सुमारे इ.स.पू. १४९०
याजकाने आत जाऊन घर पुन्हा तपासावे आणि गिलाव्यावर चट्टे पुनः दिसले नाहीत, तर ते घर शुद्ध झाले असून तेथील कुष्ठरोग नाहीसा झाला आहे असे त्याने जाहीर करावे.
- लेवीय १४:४९सुमारे इ.स.पू. १४९०
मग त्याने दोन पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन शुद्धीकरणाचा विधी करावा.
- लेवीय १४:५०सुमारे इ.स.पू. १४९०
त्याने वाहत्या पाण्याच्या वर मातीचे पात्र धरून त्याच्यात एक पक्षी मारावे,
- लेवीय १४:५१सुमारे इ.स.पू. १४९०
व वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात, तसेच वाहत्या पाण्यात, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी, एजोब त्याचप्रमाणे दुसरा जिवंत पक्षी बुडवावा, आणि ते रक्त सात वेळा त्या घरावर शिंपडावे. अशाप्रकारे याजक ते घर शुद्ध करेल.
- लेवीय १४:५२सुमारे इ.स.पू. १४९०
And he shall cleanse the house with the blood of the bird, and with the running water, and with the living bird, and with the cedar wood, and with the hyssop, and with the scarlet:
- लेवीय १४:५३सुमारे इ.स.पू. १४९०
मग त्याने तो जिवंत पक्षी शहराबाहेर मोकळ्या जागी सोडून द्यावा. अशाप्रकारे त्याने घराकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे ते शुद्ध होईल.
- लेवीय १४:५४सुमारे इ.स.पू. १४९०
सर्व प्रकाराचा कुष्ठरोग, चाई,
- लेवीय १४:५५सुमारे इ.स.पू. १४९०
वस्त्रावरील आणि घरावरील कुष्ठरोग,
- लेवीय १४:५६सुमारे इ.स.पू. १४९०
सूज, खवंद, पांढरा चट्टा या सर्वांसंबंधीचा हा नियम आहे.
- लेवीय १४:५७सुमारे इ.स.पू. १४९०
अशाप्रकारे हा खरोखरच शुद्ध किंवा अशुद्ध आहे हे तुम्हाला समजेल. कुष्ठरोग आणि बुरशी यासाठी हे नियम दिलेले आहेत.
- लेवीय १५:१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,
- लेवीय १५:२सुमारे इ.स.पू. १४९०
इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: जेव्हा कोणाही माणसाच्या शरीरातून स्राव होत असेल, तर अशा प्रकारचा स्त्राव हा अशुद्ध आहे.
- लेवीय १५:३सुमारे इ.स.पू. १४९०
त्याचे शरीर सतत स्राव बाहेर टाकीत असले किंवा अडवून ठेवीत असले, तरी तो मनुष्य अशुद्ध आहे. या स्रावामुळे तो मनुष्य अशुद्ध होतो:
- लेवीय १५:४सुमारे इ.स.पू. १४९०
ज्या बिछान्यावर तो झोपेल आणि ज्या बैठकीवर तो बसेल ती अशुद्ध होईल.