- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय १३:२१सुमारे इ.स.पू. १४९०
पण तपासणीनंतर त्या चट्ट्यामध्ये पांढरे केस नाहीत आणि चट्टा त्वचेत खोल गेला नाही व त्याचा रंग करडा आहे, असे याजकाला दिसून आले असेल, तर याजकाने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
- लेवीय १३:२२सुमारे इ.स.पू. १४९०
त्या कालावधीत तो चट्टा पसरत गेला आहे असे दिसले, तर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो गंभीर आजार आहे.
- लेवीय १३:२३सुमारे इ.स.पू. १४९०
पण पांढरा चट्टा वाढला नाही किंवा पसरला नाही. तर तो केवळ फोडाचा व्रण आहे; म्हणून याजकाने तो मनुष्य शुद्ध आहे असे जाहीर करावे.
- लेवीय १३:२४सुमारे इ.स.पू. १४९०
एखादा काही कारणाने भाजला व जळालेली जागा लालसर पांढरी किंवा नुसती पांढरी झाली असे दिसून आले,
- लेवीय १३:२५सुमारे इ.स.पू. १४९०
तर याजकाने तो चट्टा अवश्य तपासावा. जर चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील, आणि तो त्वचेपेक्षा खोल गेला आहे असे दिसून आले, तर त्या जळालेल्या भागी कुष्ठरोग फुटला असे समजावे; याजकाने त्यास अशुद्ध जाहीर करावे; तो मनुष्य कुष्ठरोगी आहे.
- लेवीय १३:२६सुमारे इ.स.पू. १४९०
पण तपासणीनंतर त्या पांढर्या चट्ट्यावरील केस पांढरे झालेले नाहीत, आणि पांढरेपणा त्वचेच्या खोलवर गेलेला नाही व तो हळूहळू कमी होत आहे, असे जर याजकाला दिसून आले, तर याजकाने त्याला सात दिवसापर्यंत वेगळे ठेवावे;
- लेवीय १३:२७सुमारे इ.स.पू. १४९०
सातव्या दिवशी याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर चट्टा त्वचेवर पसरत गेला असेल, तर याजकाने त्यास अशुद्ध म्हणून जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे.
- लेवीय १३:२८सुमारे इ.स.पू. १४९०
पण पांढरा चट्टा त्वचेवर पांगून परसला नाही आणि तो हळूहळू कमी होत आहे, असे दिसून आले, तर याजकाने त्याला शुद्ध जाहीर करावे; तो जळालेल्या जागेत केवळ व्रण आहे आणि त्याला कुष्ठरोग नाही.
- लेवीय १३:२९सुमारे इ.स.पू. १४९०
एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर अथवा हनुवटीवर चट्टा असेल
- लेवीय १३:३०सुमारे इ.स.पू. १४९०
तर याजकाने त्याची तपासणी करावी. चट्टा त्वचेखाली खोलवर आहे असे वाटत असेल आणि चट्ट्यावर पिवळे केस सापडले असतील, तर याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे; हा डोक्याचा अथवा हनुवटीचा कुष्ठरोग आहे.
- लेवीय १३:३१सुमारे इ.स.पू. १४९०
पण तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नाही आणि त्यामध्ये काळे केस नाहीत, असे याजकाच्या तपासणीत दिसून आले तर याजकाने त्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे.
- लेवीय १३:३२सुमारे इ.स.पू. १४९०
सातव्या दिवशी याजकाने तपासणी करावी आणि चट्टा जर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेमध्ये खोलवर गेला नसेल किंवा पिवळसर केस दिसून येत नसतील,
- लेवीय १३:३३सुमारे इ.स.पू. १४९०
तर व्रणाभोवतीचे केस काढून टाकावे; व्रणावरचे केस मात्र काढू नयेत. मग याजकाने त्या व्यक्तीला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
- लेवीय १३:३४सुमारे इ.स.पू. १४९०
मग याजकाने सातव्या दिवशी तपासणी करावी, आणि व्रण त्वचेवर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेखाली खोलवर गेला नसेल, तर याजकाने त्या व्यक्तीला शुद्ध म्हणून जाहीर करावे आणि ती व्यक्ती कपडे धुतल्यानंतर शुद्ध व्हावी.
- लेवीय १३:३५सुमारे इ.स.पू. १४९०
पण तो शुद्ध जाहीर केल्यानंतर तो चट्टा पसरू लागला,
- लेवीय १३:३६सुमारे इ.स.पू. १४९०
तर याजकाने तपासणी करावी आणि चट्ट्याभोवतालचे केस पिवळे होतात की नाही याची वाट न पाहता, ती व्यक्ती अशुद्ध असे जाहीर करावे.
- लेवीय १३:३७सुमारे इ.स.पू. १४९०
पण चट्टा पसरण्याची क्रिया थांबली असून तिच्यावर काळे केस सापडले, तर ती व्यक्ती बरी झाली असून शुद्ध आहे आणि याजकाने त्याला शुद्ध असे जाहीर करावे.
- लेवीय १३:३८सुमारे इ.स.पू. १४९०
एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या त्वचेवर पांढरे चट्टे असतील,
- लेवीय १३:३९सुमारे इ.स.पू. १४९०
तर याजक तपासणी करेल आणि त्वचेवरील चट्ट्याचा रंग पांढरट असेल, तर इसब हा चर्मरोग झाला आहे, असे जाहीर करेल; ती व्यक्ती शुद्ध आहे.
- लेवीय १३:४०सुमारे इ.स.पू. १४९०
कोणा माणसाच्या डोक्यावरील केस गळून टक्कल झाले असेल तर तो शुद्ध आहे.
- लेवीय १३:४१सुमारे इ.स.पू. १४९०
जर त्याच्या मस्तकाच्या पुढच्या भागावरील केस गळून पडले असतील, तर ते केवळ साधे टक्कल आहे, तो शुद्ध होय.
- लेवीय १३:४२सुमारे इ.स.पू. १४९०
तरी टक्कलावर तांबूस पांढरा डाग असेल तर तो त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर कुष्ठरोग असण्याचा संभव आहे.
- लेवीय १३:४३सुमारे इ.स.पू. १४९०
याबाबतीत याजक त्याची तपासणी करेल आणि डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर अंगावरील त्वचेवर कुष्ठरोगासारखा दिसणारा तांबूस पांढरा चट्टा असेल,
- लेवीय १३:४४सुमारे इ.स.पू. १४९०
तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर पडलेला चट्टा कुष्ठरोगाचा आहे; ती व्यक्ती अशुद्ध आहे; याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे.
- लेवीय १३:४५सुमारे इ.स.पू. १४९०
असा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीने फाटलेले कपडे घालावेत, त्यांच्या केसात फणी न फिरविता ते तसेच वाढू द्यावेत; त्यांनी तोंडाखालील भाग झाकून घ्यावा आणि अशुद्ध! अशुद्ध! असे ओरडावे.