- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- लेवीय ४:३सुमारे इ.स.पू. १४९०
एखाद्या अभिषिक्त याजकाकडून अजाणतेने घडलेल्या पापामुळे लोकांवर दोष आला, तर पापार्पण म्हणून याहवेहला त्याने एक निर्दोष गोर्हा अर्पण करावा.
- लेवीय ४:४सुमारे इ.स.पू. १४९०
त्याने तो गोर्हा सभामंडपाच्या दाराशी आणून त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व याहवेहसमोर त्याचा वध करावा.
- लेवीय ४:५सुमारे इ.स.पू. १४९०
मग अभिषिक्त याजकाने त्या गोर्ह्याचे थोडे रक्त सभामंडपामध्ये नेऊन त्यात आपली बोटे बुडवून
- लेवीय ४:६सुमारे इ.स.पू. १४९०
याजकाने पवित्रस्थान वेगळे करणार्या पडद्यासमोर याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे.
- लेवीय ४:७सुमारे इ.स.पू. १४९०
नंतर याजकाने त्यातील काही रक्त घेऊन याहवेहसमोर सभामंडपातील धूपवेदीच्या शिंगांना लावावे व गोर्ह्याचे उरलेले सर्व रक्त त्याने सभामंडपातील दाराशी असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याजवळ ओतावे.
- लेवीय ४:८सुमारे इ.स.पू. १४९०
नंतर पापार्पणाच्या गोर्ह्याची सर्व चरबी, म्हणजे आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी,
- लेवीय ४:९सुमारे इ.स.पू. १४९०
दोन गुरदे व त्यावरील कंबरेजवळची चरबी व काळीज काढून त्यांचे वेदीवर होमार्पण करावे.
- लेवीय ४:१०सुमारे इ.स.पू. १४९०
शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे गोर्ह्याचे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून याजकाने त्यांचे होमवेदीवर होम करावे.
- लेवीय ४:११सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु त्या गोर्ह्याची कातडी आणि त्याचे सर्व मांस तसेच डोके आणि पाय, आतील अवयव आणि आतडी,
- लेवीय ४:१२सुमारे इ.स.पू. १४९०
त्या गोर्ह्याचे राहिलेले सर्व भाग, छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी, राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडांच्या विस्तवावर जाळून टाकावेत.
- लेवीय ४:१३सुमारे इ.स.पू. १४९०
जर संपूर्ण इस्राएली लोकांकडून अजाणतेने पाप घडले, आणि याहवेहनी निषिद्ध केलेल्यापैकी एखादी गोष्ट केली, ते केलेले जरी समुदायाला माहीत नसेल, पण जेव्हा त्यांना त्यांची चूक समजून येईल,
- लेवीय ४:१४सुमारे इ.स.पू. १४९०
आणि त्यांनी केलेले पाप सर्वांना माहीत होईल, तेव्हा त्या समुदायाने पापार्पण म्हणून एक गोर्हा आणावा आणि सभामंडपासमोर अर्पण करावा.
- लेवीय ४:१५सुमारे इ.स.पू. १४९०
तिथे इस्राएली समुदायातील पुढार्यांनी याहवेहसमोर त्यांचे हात त्या गोर्ह्याच्या मस्तकावर ठेवावेत, व याहवेहसमोर त्या गोर्ह्याचा वध करावा.
- लेवीय ४:१६सुमारे इ.स.पू. १४९०
नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोर्ह्याचे काही रक्त सभामंडपात घेऊन जावे.
- लेवीय ४:१७सुमारे इ.स.पू. १४९०
याजकाने त्याची बोटे त्यात बुडवून याहवेहसमोर पडद्यापुढे ते सात वेळा शिंपडावे.
- लेवीय ४:१८सुमारे इ.स.पू. १४९०
त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
- लेवीय ४:१९सुमारे इ.स.पू. १४९०
त्याने त्यावरील सर्व चरबी काढावी आणि तिचे वेदीवर होम करावे.
- लेवीय ४:२०सुमारे इ.स.पू. १४९०
पापार्पणाच्या गोर्ह्यासंबंधीच्या विधीप्रमाणेच त्याने या गोर्ह्याचेही करावे. अशा प्रकारे याजकाने संपूर्ण समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल.
- लेवीय ४:२१सुमारे इ.स.पू. १४९०
नंतर तो गोर्हा वस्तीबाहेर काढून, जसा पहिला गोर्हा त्याने जाळून टाकला तसाच हा गोर्हा जाळून टाकावा. समुदायासाठी हे पापार्पण आहे.
- लेवीय ४:२२सुमारे इ.स.पू. १४९०
जेव्हा एखादा पुढारी अजाणतेने याहवेह, त्याच्या परमेश्वराच्या आज्ञेचा भंग करून पाप करतो व दोषी ठरतो,
- लेवीय ४:२३सुमारे इ.स.पू. १४९०
ज्यावेळी त्याला हे पाप कळून येईल तेव्हा त्याने एका निर्दोष बोकडाचे अर्पण आणावे.
- लेवीय ४:२४सुमारे इ.स.पू. १४९०
त्याने त्या बोकडाच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व होमार्पणाच्या स्थळी त्याचा वध करून तो याहवेहला अर्पावा. हे त्याचे पापार्पण होय.
- लेवीय ४:२५सुमारे इ.स.पू. १४९०
मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना ते लावावे व राहिलेले रक्त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.
- लेवीय ४:२६सुमारे इ.स.पू. १४९०
शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे या सर्व चरबीचा वेदीवर होम करावा. अशाप्रकारे पुढार्याच्या पापाबद्दल, याजक प्रायश्चित करेल आणि त्याची क्षमा होईल.
- लेवीय ४:२७सुमारे इ.स.पू. १४९०
समुदायातील सामान्य मनुष्याने चुकून पाप केले व याहवेहने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे ते दोषी ठरले,