मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम ३५:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    अंगणाचे पडदे, त्यांच्या खुंट्या व बैठका आणि अंगणाच्या दाराचा पडदा;

  2. निर्गम ३५:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    निवासमंडप, त्याचे अंगण व त्यांच्या मेखा व त्यांच्या दोर्‍या;

  3. निर्गम ३५:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे; आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.”

  4. निर्गम ३५:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    मग इस्राएलचा सर्व समुदाय मोशेच्या समक्षतेतून निघून गेला,

  5. निर्गम ३५:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि ज्यांची इच्छा असेल व ज्यांच्या हृदयाला स्फूर्ती मिळाली त्यांनी सभामंडपाच्या कामासाठी व त्याच्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांची अर्पणे याहवेहसाठी आणली.

  6. निर्गम ३५:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    ज्या कोणाला इच्छा झाली, त्या स्त्री आणि पुरुषांनी येऊन सर्वप्रकारचे सोन्याचे दागिने, रत्नखचित पीना, कानातील डूल, अंगठ्या आणि दागिने आणले. त्या सर्वांनी आपले सोने याहवेहसाठी ओवाळणीचे अर्पण म्हणून दिले.

  7. निर्गम ३५:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    ज्यांच्याकडे निळे, जांभळे किंवा किरमिजी कापड किंवा रेशमी तागाचे होते किंवा बोकडाचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी किंवा टिकाऊ चर्म होते ते आणले.

  8. निर्गम ३५:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    चांदी किंवा कास्याची अर्पणे आणणार्‍यांनी ती याहवेहसाठी आणली आणि ज्या कोणाकडे बाभळीचे लाकूड होते, ते त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही भागात उपयोगी पडेल असे म्हणून आणले.

  9. निर्गम ३५:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    प्रत्येक कुशल स्त्रीने निळे, जांभळे आणि किरमिजी सूत व रेशमी ताग जे तिने आपल्या हाताने विणले होते ते आणले.

  10. निर्गम ३५:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि ज्या सर्व स्त्रियांना इच्छा झाली आणि ज्या सूतकताईत कुशल होत्या त्यांनी बोकडाचे केस कातले.

  11. निर्गम ३५:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    पुढार्‍यांनी एफोद व ऊरपट यावर लावण्यासाठी गोमेद व इतर रत्ने आणली.

  12. निर्गम ३५:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याचप्रमाणे त्यांनी दिव्यासाठी आणि अभिषेकासाठी आणि सुवासिक धुपासाठी जैतुनाचे तेल व सुगंधी मसाले आणले.

  13. निर्गम ३५:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेहने मोशेद्वारे जे काम आज्ञापिले होते त्यासाठी इस्राएली लोकांमधील सर्व इच्छुक पुरुष व स्त्रियांनी याहवेहकरिता स्वखुशीने अर्पणे आणली.

  14. निर्गम ३५:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे,

  15. निर्गम ३५:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—

  16. निर्गम ३५:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करावे,

  17. निर्गम ३५:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करावे.

  18. निर्गम ३५:३४सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि याहवेहने त्याला व दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब या दोघांना इतरांनाही शिकविण्याची क्षमता दिली आहे.

  19. निर्गम ३५:३५सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे.

  20. निर्गम ३६:१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग बसालेल, ओहोलियाब आणि सर्व निपुण व्यक्ती, ज्यांना याहवेहने कुशलता व पवित्रस्थानाचे बांधकाम करण्याचे कौशल्य आणि क्षमता दिली आहे, त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच काम करावे.”

  21. निर्गम ३६:२सुमारे इ.स.पू. १४९१

    मग बसालेल व ओहोलियाब व ज्यांना याहवेहने क्षमता दिली होती आणि ज्यांना येऊन काम करण्याची इच्छा होती त्यांना मोशेने बोलाविले.

  22. निर्गम ३६:३सुमारे इ.स.पू. १४९१

    पवित्रस्थानाच्या बांधकामासाठी इस्राएल लोकांनी आणलेली अर्पणे मोशेकडून त्यांनी घेतली. लोक दररोज सकाळी स्वैच्छिक अर्पणे आणत राहिले.

  23. निर्गम ३६:४सुमारे इ.स.पू. १४९१

    मग सर्व कुशल कारागीर जे पवित्रस्थानाचे काम करीत होते, त्यांनी ते पूर्वी करीत असलेले काम सोडले,

  24. निर्गम ३६:५सुमारे इ.स.पू. १४९१

    व मोशेला म्हणाले, “याहवेहने आज्ञापिलेल्या कामासाठी आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक सामुग्री लोक आणत आहेत.”

  25. निर्गम ३६:६सुमारे इ.स.पू. १४९१

    तेव्हा मोशेने आज्ञा दिली आणि सर्व छावणीत कळविण्यात आले: “कोणी पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्रस्थानासाठी कोणतेही अर्पण करू नये.” अशाप्रकारे अधिक सामुग्री आणण्यापासून लोकांना थांबविण्यात आले,