मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग याहवेह मोशेला म्हणाले, “हे शब्द लिही, कारण या शब्दांनुसार मी तुझ्याशी व इस्राएलाशी करार केला आहे.”

  2. मोशे त्या ठिकाणी भाकरी न खाता किंवा पाणी न पिता चाळीस दिवस व चाळीस रात्र याहवेहबरोबर राहिला आणि त्याने पाट्यांवर कराराचे शब्द, म्हणजेच दहा आज्ञा लिहिल्या.

  3. निर्गम ३४:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    जेव्हा मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरून आला, तेव्हा याहवेहबरोबर बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता, हे त्याच्या लक्षात आले नाही.

  4. निर्गम ३४:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    जेव्हा अहरोन व सर्व इस्राएल लोकांनी मोशेला पाहिले, त्याचा चेहरा तेजस्वी होता आणि ते त्याच्याजवळ येण्यास घाबरत होते.

  5. निर्गम ३४:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    पण मोशेने त्यांना बोलाविले; म्हणून अहरोन व समुदायाचे वडीलजन परत त्याच्याजवळ गेले व तो त्यांच्याबरोबर बोलला.

  6. निर्गम ३४:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    यानंतर सर्व इस्राएली लोक त्याच्याजवळ आले आणि मोशेने त्यांना त्या सर्व आज्ञा दिल्या, ज्या याहवेहने सीनाय पर्वतावर त्याला दिल्या होत्या.

  7. निर्गम ३४:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशेने लोकांशी आपले संभाषण संपविले व आपल्या चेहर्‍यावर पडदा घातला.

  8. निर्गम ३४:३४सुमारे इ.स.पू. १४९१

    पण जेव्हा मोशे याहवेहबरोबर बोलण्यासाठी त्यांच्या समक्षतेत जात असे, बाहेर जाईपर्यंत तो पडदा काढत असे. जेव्हा तो बाहेर येई व त्याला जे काही आज्ञापिले गेले आहे ते तो इस्राएली लोकांना सांगत असे,

  9. निर्गम ३४:३५सुमारे इ.स.पू. १४९१

    इस्राएली लोकांनी पाहिले की मोशेचा चेहरा तेजस्वी होता. मग मोशे याहवेहबरोबर बोलावयास जाईपर्यंत आपल्या चेहर्‍यावर पडदा परत घालत असे.

  10. निर्गम ३५:१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशेने इस्राएली लोकांच्या संपूर्ण समुदायाला बोलाविले व त्यांना म्हटले, “ज्यागोष्टी तुम्ही कराव्या अशी याहवेहनी आज्ञा दिली आहे, त्या या आहेत:

  11. निर्गम ३५:२सुमारे इ.स.पू. १४९१

    सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातवा दिवस तुमचा पवित्र दिवस असेल, हा याहवेहप्रीत्यर्थ शब्बाथ विसाव्याचा दिवस असावा. जो कोणी या दिवशी काम करेल, त्याला जिवे मारावे.

  12. निर्गम ३५:३सुमारे इ.स.पू. १४९१

    शब्बाथ दिवशी तुमच्या कोणत्याही घरामध्ये विस्तव पेटवू नये.”

  13. निर्गम ३५:४सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशे सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “याहवेहने जे आज्ञापिले आहे ते हे:

  14. निर्गम ३५:५सुमारे इ.स.पू. १४९१

    तुमच्याजवळ जे काही आहे, त्यातून याहवेहसाठी अर्पण घ्या. ज्या कोणास याहवेहसाठी अर्पण आणावे अशी इच्छा आहे, त्यांनी हे अर्पण आणावे: “सोने चांदी आणि कास्य,

  15. निर्गम ३५:६सुमारे इ.स.पू. १४९१

    निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग; बोकडाचे केस;

  16. निर्गम ३५:७सुमारे इ.स.पू. १४९१

    लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म; बाभळीचे लाकूड;

  17. निर्गम ३५:८सुमारे इ.स.पू. १४९१

    दिव्यासाठी जैतुनाचे तेल; अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले;

  18. निर्गम ३५:९सुमारे इ.स.पू. १४९१

    एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने.

  19. निर्गम ३५:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    “तुमच्यामध्ये जे सर्व कुशल कारागीर आहेत, त्यांनी येऊन जे सर्वकाही याहवेहने आज्ञापिले आहे ते तयार करावे:

  20. निर्गम ३५:११सुमारे इ.स.पू. १४९१

    “निवासमंडप, त्याचा तंबू आणि त्याचे आच्छादन, आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;

  21. निर्गम ३५:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    कोश व त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण व त्याचा पडदा;

  22. निर्गम ३५:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    मेज व त्याचे दांडे आणि त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर;

  23. निर्गम ३५:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    प्रकाशासाठी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे, दिवे आणि प्रकाशासाठी तेल;

  24. निर्गम ३५:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप; निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी पडदा;

  25. निर्गम ३५:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    होमार्पणाची वेदी, तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; कास्याचे गंगाळ व त्याची बैठक;