Skip to content

Prophets बद्दल बायबलमधील वचने

655 वचने · 128 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर हे लोक नैसर्गिक कारणाने अपघाताने मरण पावले, तर याहवेहने मला पाठविले नाही.

  2. परंतु बलामाने त्यांना उत्तर दिले, “बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही.

  3. बलामाने बालाकाला उत्तर दिले, “पाहा आता मी तुझ्याकडे आलो आहे, परंतु मला वाटेल ते मी बोलू शकत नाही, परमेश्वर माझ्या मुखात जे शब्द घालतील तेच मी बोलेन.”

  4. तेव्हा याहवेहने बलामाच्या मुखात शब्द घातले व म्हटले, “जा आणि बालाकाला हे वचन सांग.”

  5. बलामाने म्हटले, “जे शब्द याहवेह माझ्या मुखात घालतील तेच मी बोलू नये काय?”

  6. आशीर्वाद देण्याची आज्ञा मला मिळाली आहे; याहवेहने आशीर्वाद दिला आहे आणि मी तो बदलू शकत नाही.

  7. बलामाने बालाकाला उत्तर दिले, “याहवेह जे सांगतील त्याचप्रमाणे मी केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

  8. जेव्हा बलामाने दृष्टी वर करून पाहिले की इस्राएली लोक आपआपल्या गोत्राप्रमाणे छावणी देऊन राहत होते, परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला

  9. आणि त्याने आपला संदेश सांगितला: “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, ज्याच्या डोळ्याला स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,

  10. जो याहवेहचा शब्द ऐकतो त्याची भविष्यवाणी, जो सर्वसमर्थाकडून दृष्टान्त पाहतो, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडले आहेत:

  11. मग त्याने हा संदेश दिला: “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, ज्याच्या नजरेस स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,

  12. जो परमेश्वराचे शब्द ऐकतो त्याची भविष्यवाणी, ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थाकडून दर्शन घडते, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडले आहेत:

  13. यार्देनच्या पूर्वेकडील मोआब प्रदेशात मोशे इस्राएली लोकांशी नियमांसंबंधी बोलला. तो म्हणाला:

  14. आपल्या याहवेह परमेश्वरांनी चाळीस वर्षांपूर्वी होरेब येथे आपल्याला सांगितले होते, “तुम्ही या पर्वताजवळ खूप दिवस राहिलात;

  15. याहवेह पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी समोरासमोर बोलले.

  16. (त्यावेळी मी तुमच्या आणि याहवेहमध्ये उभा राहिलो आणि तुम्हाला याहवेहच्या वचनाची घोषणा केली, कारण तुम्हाला अग्नीची भीती वाटत असल्यामुळे तुम्ही पर्वतावर चढून त्यांच्यापर्यंत गेला नाही.) आणि ते म्हणाले:

  17. “ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  18. पण तू माझ्याबरोबर इथेच थांब, म्हणजे मी तुला माझ्या सर्व आज्ञा, विधी व नियम देईन आणि ते त्यांना शिकव म्हणजे जो देश मी त्यांना वतन म्हणून देणार आहे तिथे त्यांचे पालन करावे.”

  19. याहवेह तुमचे परमेश्वर इस्राएलातून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील. तुम्ही त्याचे ऐकावे.

  20. त्यांच्या भाऊबंदांतून मी त्यांच्यासाठी तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करेन आणि मी माझी वचने त्याच्या मुखात घालेन. मी त्याला ज्याकाही आज्ञा देईन त्या सर्व तो त्यांना सांगेल.

  21. पण जो संदेष्टा माझ्या नावाने असे काही बोलतो ज्याची मी आज्ञा दिली नाही किंवा जो संदेष्टा इतर दैवतांच्या नावाने बोलतो त्याला जिवे मारावे.”

  22. मोशे नूनाचा पुत्र होशा सोबत आला आणि या गीताचे सर्व शब्द लोकांना ऐकू जातील असे म्हणून दाखविले.

  23. नूनाचा पुत्र यहोशुआ हा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण होता, कारण मोशेने त्याजवर आपले हात ठेवले होते. म्हणून इस्राएली लोकांनी त्याचे ऐकले आणि याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा ते पाळीत असत.

  24. मोशेसारखा संदेष्टा इस्राएलात पूर्वी झाला नाही, कारण याहवेह त्याच्याशी समोरासमोर बोलत असत,

  25. याहवेहच्या आज्ञेवरून त्याने इजिप्तमध्ये फारोह—त्याच्या दरबारातील लोक व संपूर्ण देशात आश्चर्यकारक चमत्कार केले.