Skip to content

Prophets बद्दल बायबलमधील वचने

655 वचने · 128 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुला मोठा सन्मान बहाल करणार आहे, म्हणजे सर्व इस्राएली लोकांना कळून येईल की, मी जसा मोशेबरोबर होतो, अगदी तसाच तुझ्याबरोबर देखील आहे.

  2. त्या समयी लप्पिदोथाची पत्नी दबोरा एक संदेष्टी होती आणि ती इस्राएलचे नेतृत्व करत होती.

  3. मिद्यान्यांमुळे जेव्हा इस्राएली लोक मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले,

  4. त्यांनी एक संदेष्टा पाठवला, तो म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला इजिप्तमधून, गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले.

  5. मी तुम्हाला इजिप्तमधील लोकांच्या हातातून सोडविले आणि जे तुमच्याशी क्रूरपणे वागत, त्या सर्व लोकांच्या हातून सोडविले आणि तुमच्या शत्रूंना तुमच्यापुढून घालवून त्यांचा देश तुम्हाला दिला.

  6. मी तुम्हाला म्हटले, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता, त्यांच्या दैवतांची उपासना करू नका. परंतु तुम्ही माझे ऐकले नाही.”

  7. तेव्हा याहवेहचा आत्मा गिदोनावर आला आणि त्याने रणशिंग फुंकले; अबिएजेरी लोक त्याच्याकडे आले.

  8. मग याहवेहचा आत्मा इफ्ताहावर आला. तो गिलआद व मनश्शेह पार करून गिलआदाच्या मिस्पेह येथे गेला आणि तिथून त्याने अम्मोनी लोकांवर आक्रमण केले.

  9. सोराह आणि एष्टाओल यांच्यामध्ये महनेह दान येथे असताना याहवेहचा आत्मा त्याला प्रवृत्त करू लागला.

  10. याहवेहचा आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर आला जेणेकरून त्याने आपल्या हाताने एखादी शेळी फाडावे त्याप्रमाणे त्याने त्या सिंहाचे जबडे फाडले. परंतु त्याबद्दल आपल्या वडिलांना किंवा आईला काहीही सांगितले नाही.

  11. नंतर याहवेहचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. तो खाली अष्कलोनला गेला, त्यांच्यापैकी तीस लोकांना मारले, त्यांच्याकडून सर्वकाही काढून टाकले आणि ज्यांनी कोडे समजावून सांगितले त्यांना त्यांचे कपडे दिले. रागाने पेटून तो आपल्या वडिलांच्या घरी परतला.

  12. परमेश्वराचा एक मनुष्य एलीकडे आला आणि त्याला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तुझे पूर्वज इजिप्तमध्ये फारोहच्या दास्यात असताना मी त्यांना स्पष्टपणे प्रगट झालो नाही काय?

  13. शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली याहवेहची सेवा करीत होता. त्या दिवसात याहवेहचे वचन दुर्मिळ होते; दृष्टान्तही फारसे मिळत नसत.

  14. तेव्हा याहवेहने शमुवेलाला हाक मारली. शमुवेलाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”

  15. आणि तो धावत एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” परंतु एली म्हणाला, “मी बोलाविले नाही; परत जा आणि झोप.” तेव्हा तो गेला आणि झोपला.

  16. याहवेहने पुन्हा, “शमुवेल!” अशी हाक मारली आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” एली म्हणाला, “माझ्या मुला, मी बोलाविले नाही; परत जा आणि झोप.”

  17. शमुवेलने तर अजूनही याहवेहला ओळखले नव्हते: याहवेहचे वचन आतापर्यंत त्याला प्रकट झाले नव्हते.

  18. याहवेहने तिसर्‍यांदा हाक मारली, “शमुवेल!” आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” तेव्हा एलीला समजले की, याहवेह त्या बालकाला बोलावित होते.

  19. म्हणून एलीने शमुवेलास सांगितले, “जा आणि झोप आणि जर त्यांनी पुन्हा तुला हाक मारली, तर म्हण, ‘याहवेह, बोला, कारण, तुमचा सेवक ऐकत आहे.’ ” तेव्हा शमुवेल गेला आणि त्याच्या जागेवर झोपला.

  20. याहवेह आले आणि तिथे उभे राहिले आणि इतर वेळेप्रमाणे हाक मारली, “शमुवेल! शमुवेल!” तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोला, तुमचा सेवक ऐकत आहे.”

  21. आणि याहवेह शमुवेलास म्हणाले: “पाहा, मी इस्राएलमध्ये असे काहीतरी करणार आहे, जे ऐकून प्रत्येकाचे कान भणभणतील.

  22. एलीच्या घराण्याविषयी मी जे काही बोललो होतो ते; सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी करेन.

  23. कारण मी त्याला सांगितले की, जे पाप त्याला माहीत होते त्यासाठी मी सर्वकाळ त्याच्या कुटुंबाचा न्याय करेन; त्याच्या पुत्रांनी परमेश्वराची निंदा केली आणि एली त्यांना आवरू शकला नाही.

  24. म्हणून मी एलीच्या घराण्यासाठी अशी शपथ घेतली, ‘एलीच्या घराण्याच्या पापाचे प्रायश्चित यज्ञ किंवा अर्पणाने कधीही होणार नाही.’ ”

  25. शमुवेल वाढत असता याहवेह त्याच्याबरोबर होते आणि त्यांनी शमुवेलाचे कोणतेही शब्द वाया जाऊ दिले नाही.