Skip to content

Prophets बद्दल बायबलमधील वचने

655 वचने · 128 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा अहरोनाची बहीण, मिर्याम संदेष्टी, हिने हातात डफ घेतला आणि सर्व स्त्रिया तिच्यामागे हातात डफ घेऊन नाचू लागल्या.

  2. मिर्यामने त्यांच्यासाठी गाईले: “याहवेहप्रीत्यर्थ गीत गा, कारण ते अत्युच्च आहेत. घोडे व त्यांचे स्वार त्यांनी समुद्रात बुडवून टाकले आहेत.”

  3. नंतर मोशे परमेश्वराकडे गेला आणि याहवेहने पर्वतावरून त्याला आवाज देऊन म्हटले, “याकोबाच्या वंशजांना, म्हणजेच इस्राएली लोकांना तू हे सांगावे:

  4. मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी घनदाट मेघातून तुझ्याकडे येईन, अशासाठी की मी तुझ्याशी बोलत असताना लोक ऐकतील आणि तुझ्यावर विश्वास ठेवतील.” मग मोशेने लोक काय म्हणाले ते याहवेहला सांगितले.

  5. कर्ण्याचा आवाज जसा मोठा होत गेला, तसा मोशे बोलत होता आणि परमेश्वर त्याला उत्तर देत होते.

  6. आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला.

  7. हा निवासमंडप आणि त्याची रचना मी दाखवेन त्याप्रमाणेच असावी.

  8. तिथे, प्रायश्चिताच्या झाकणावर दोन करूब जे कोशावर ठेवलेले आहेत, त्यांच्यामध्ये मी तुला भेटेन आणि इस्राएल लोकांसाठी द्यावयाच्या सर्व आज्ञा मी तुला देईन.

  9. “मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे नमुन्याप्रमाणे निवासमंडप तयार करावा.

  10. आणि जेव्हा मोशे मंडपामध्ये प्रवेश करी, तेव्हा याहवेह मोशेशी बोलेपर्यंत, मेघस्तंभ खाली उतरून मंडपाच्या दाराशी थांबत असे.

  11. जसा एखादा व्यक्ती आपल्या मित्राशी बोलतो तसे याहवेह मोशेशी समोरासमोर बोलत असत. मग मोशे छावणीकडे परत जात असे, परंतु त्याचा तरुण सहकारी, नूनाचा पुत्र यहोशुआ हा मंडप सोडून जात नसे.

  12. आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—

  13. याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे.

  14. याहवेहनी मोशेला बोलाविले आणि सभामंडपातून त्याच्याशी बोलणे केले. ते म्हणाले,

  15. इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले:

  16. जेव्हा मोशे याहवेहशी बोलण्यासाठी सभामंडपात गेला, तेव्हा कराराच्या नियमाच्या कोशावर असलेल्या प्रायश्चिताच्या झाकणावरून, दोन करुबांमधून त्याच्याशी बोलत असलेली वाणी त्याने ऐकली. अशाप्रकारे याहवेह त्याच्याशी बोलले.

  17. मोशे त्यांना म्हणाला, “तुमच्याविषयी याहवेह काय आज्ञा देतील ते मी जाणून घेईपर्यंत तुम्ही थांबा.”

  18. मग याहवेहने मोशेला म्हटले,

  19. “इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा,

  20. मी खाली येऊन तिथे तुझ्याशी बोलेन आणि जो आत्मा तुझ्यावर आहे, त्याचे काही सामर्थ्य मी घेऊन त्यांच्यावर ठेवेन. ते तुझ्याबरोबर लोकांचा भार वाहतील म्हणजे तुला एकट्याला तो वाहावा लागणार नाही.

  21. मग याहवेह मेघातून खाली उतरले व मोशेशी बोलले आणि याहवेहने मोशेवर असलेल्या आत्म्याचे काही सामर्थ्य घेऊन त्या सत्तर वडिलांवर ठेवले. ज्यावेळी आत्मा त्यांच्यावर स्थिर झाला, त्यावेळी त्यांनी भविष्यवाणी केली—परंतु पुन्हा असे केले नाही.

  22. याहवेह त्यांना म्हणाले, “माझे शब्द ऐका: “जेव्हा तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा आहे, मी याहवेह, त्यांना दृष्टान्ताद्वारे स्वतःला प्रकट करतो, स्वप्नाद्वारे मी त्यांच्याशी बोलतो.

  23. परंतु माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही; तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे.

  24. मी त्याच्याशी कोड्यात नाही, तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो; तो याहवेहचे रूप पाहतो. माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास तुम्हाला भीती का वाटली नाही?”

  25. त्यावर मोशे म्हणाला, “ज्यागोष्टी मी करतो त्या करण्यास मला याहवेहने पाठविले आहे. हे माझ्या मनाचे विचार नाहीत, हे तुम्हाला यावरून समजेल: