- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Moses & The Exodus
God raises up Moses to confront Pharaoh; the ten plagues culminate in Israel's dramatic deliverance from four centuries of bondage.
या कालखंडातील वचने
- निर्गम १२:४२सुमारे इ.स.पू. १४९१
ही रात्र याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणण्यासाठी वेगळी करून ठेवली, ही रात्र इस्राएल लोकांनी पिढ्यान् पिढ्या याहवेहला सन्मान म्हणून पाळावी.
- निर्गम १२:४३सुमारे इ.स.पू. १४९१
नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “वल्हांडणाच्या भोजनाचे हे नियम आहेत: “कोणत्याही विदेशी व्यक्तीने ते खाऊ नये.
- निर्गम १२:४४सुमारे इ.स.पू. १४९१
पण तू मोल देऊन विकत घेतलेला गुलाम व ज्याची सुंता तू करून घेतली आहे त्याने ते खावे.
- निर्गम १२:४५सुमारे इ.स.पू. १४९१
पण तात्पुरता रहिवासी किंवा मोलकरी यांनी ते खाऊ नये.
- निर्गम १२:४६सुमारे इ.स.पू. १४९१
“ते घरातच खावयाचे आहे; त्यातील मांस घराबाहेर घेऊन जाऊ नये. त्यातील एकही हाड मोडू नये.
- निर्गम १२:४७सुमारे इ.स.पू. १४९१
इस्राएलाच्या सर्व समुदायाने हा सण पाळावा.
- निर्गम १२:४८सुमारे इ.स.पू. १४९१
“तुमच्याबरोबर राहणार्या विदेशी व्यक्तीला याहवेहचा हा वल्हांडणाचा सण पाळावयाचा असेल, तर त्यांच्यातील सर्व पुरुषांनी सुंता करवून घ्यावी; मगच ते या देशात जन्मलेल्याप्रमाणे हा सण पाळू शकतील. कोणत्याही बेसुंती पुरुषाने ते खाऊ नये.
- निर्गम १२:४९सुमारे इ.स.पू. १४९१
तुमच्यामध्ये असलेले स्वदेशी असो वा तुमच्यामध्ये असलेले विदेशी असो, दोघांनाही एकच नियम असावा.”
- निर्गम १२:५०सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा याहवेहने मोशे व अहरोन यांना सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.
- निर्गम १२:५१सुमारे इ.स.पू. १४९१
याच दिवशी याहवेहने वंशानुसार इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले.
- निर्गम १३:१सुमारे इ.स.पू. १४९१
याहवेहने मोशेला सांगितले,
- निर्गम १३:२सुमारे इ.स.पू. १४९१
“इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले प्रत्येक नर मला समर्पित कर. उदरातून आलेले इस्राएलातील प्रत्येक प्रथम संतान माझ्या मालकीचे आहे, ते मनुष्याचे असो किंवा पशूंचे.”
- निर्गम १३:३सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, हा दिवस स्मरणात ठेवा, याच दिवशी याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने इजिप्त देशातून, गुलामगिरीतून तुम्हाला बाहेर आणले. खमीर असलेले तुम्ही काहीही खाऊ नये.
- निर्गम १३:४सुमारे इ.स.पू. १४९१
आज, अवीव महिन्यात तुम्ही निघालात.
- निर्गम १३:५सुमारे इ.स.पू. १४९१
जेव्हा तुम्हाला कनानी, हिथी, अमोरी, यबूसी आणि हिव्वी यांचा देश, ज्यात दूध व मध वाहतो, ते तुम्हाला देतील अशी तुमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली, त्यात याहवेह तुम्हाला नेतील; तेव्हा या महिन्यात हा विधी तुम्ही पाळावा.
- निर्गम १३:६सुमारे इ.स.पू. १४९१
सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी आणि सातव्या दिवशी याहवेहचा उत्सव साजरा करावा.
- निर्गम १३:७सुमारे इ.स.पू. १४९१
या सात दिवसात बेखमीर भाकर खावी; खमीर असलेले काहीही तुमच्यात आढळू नये किंवा तुमच्या सीमेत कुठेही खमीर दृष्टीस पडू नये.
- निर्गम १३:८सुमारे इ.स.पू. १४९१
त्या दिवशी आपल्या लेकरांना सांगा, जेव्हा आम्ही इजिप्तमधून बाहेर आलो तेव्हा याहवेहने आमच्यासाठी जे केले, त्याचे चिन्ह म्हणून आम्ही हे करतो.
- निर्गम १३:९सुमारे इ.स.पू. १४९१
हे तुम्हाला तुमच्या हातावरील खूण व कपाळावर स्मरणचिन्हासारखे असणार. याहवेहचा हा नियम तुमच्या मुखात असावा. कारण याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.
- निर्गम १३:१०सुमारे इ.स.पू. १४९१
दरवर्षी हा सण तुम्ही ठराविक वेळी पाळावा.
- निर्गम १३:११सुमारे इ.स.पू. १४९१
“तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथेनुसार याहवेह तुम्हाला कनानी लोकांच्या देशात घेऊन जातील व तो देश तुम्हाला देतील,
- निर्गम १३:१२सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा प्रत्येक उदराचे पहिले संतान तुम्ही याहवेहला द्यावे. तुमच्या पशूंचे प्रथम जन्मलेले नर याहवेहचे आहेत.
- निर्गम १३:१३सुमारे इ.स.पू. १४९१
गाढवाच्या प्रथम जन्मलेल्या शिंगरूला कोकरू खंडणी म्हणून भरून सोडव, पण खंडणी भरून ते तू सोडविले नाहीस, तर त्याची मान मोड. मनुष्याच्या प्रत्येक नराला खंडणी भरून सोडव.
- निर्गम १३:१४सुमारे इ.स.पू. १४९१
“भविष्यकाळात तुमची मुले तुम्हाला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे?’ तेव्हा त्यांना सांगा, ‘याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले.
- निर्गम १३:१५सुमारे इ.स.पू. १४९१
जेव्हा फारोह हट्टाने आम्हाला जाऊ देत नव्हता, तेव्हा याहवेहने संपूर्ण इजिप्त देशातील लोकांचे व जनावरांचे प्रथम जन्मलेले मारून टाकले. म्हणून प्रत्येक उदरातून प्रथम जन्मलेला नर आम्ही याहवेहला समर्पित करतो आणि ते आम्ही खंडणी भरून सोडवितो.’