- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Moses & The Exodus
God raises up Moses to confront Pharaoh; the ten plagues culminate in Israel's dramatic deliverance from four centuries of bondage.
या कालखंडातील वचने
- निर्गम १३:१६सुमारे इ.स.पू. १४९१
आणि हे तुमच्या हातावर खूण व कपाळावर चिन्ह असे असावे, की याहवेहने आपल्या बलवान हाताने आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.”
- निर्गम १३:१७सुमारे इ.स.पू. १४९१
शेवटी फारोहने जेव्हा लोकांस जाऊ दिले, तेव्हा परमेश्वराने त्यांना पलिष्ट्यांच्या देशातून जवळचा मार्ग असूनही तिथून चालविले नाही. कारण परमेश्वर म्हणाले, “जर युद्धाला सामोरे जावे लागले तर त्यांचे मन बदलेल व ते पुन्हा इजिप्तकडे जातील.”
- निर्गम १३:१८सुमारे इ.स.पू. १४९१
म्हणून परमेश्वराने त्यांना तांबड्या समुद्राकडून रानाच्या मार्गाने नेले. इस्राएली लोक लढाईसाठी सज्ज होऊन इजिप्तमधून बाहेर पडले.
- निर्गम १३:१९सुमारे इ.स.पू. १४९१
मोशेने योसेफाची हाडे आपल्याबरोबर घेतली. कारण, योसेफाने इस्राएली लोकांकडून शपथ घेतली होती. तो म्हणाला होता, “परमेश्वर खरोखर तुमच्या मदतीला येईल, तेव्हा तुमच्याबरोबर माझी हाडे या ठिकाणातून घेऊन जा.”
- निर्गम १३:२०सुमारे इ.स.पू. १४९१
सुक्कोथ शहर सोडल्यावर त्यांनी वाळवंटाच्या सीमेवर एथाम येथे तळ दिला.
- निर्गम १३:२१सुमारे इ.स.पू. १४९१
दिवस व रात्र ते प्रवास करू शकतील, म्हणून दिवसा मेघस्तंभातून त्यांचे मार्गदर्शन करीत व रात्री अग्निस्तंभातून प्रकाश देत याहवेह त्यांच्या पुढे चालले.
- निर्गम १३:२२सुमारे इ.स.पू. १४९१
दिवसाचा मेघस्तंभ व रात्रीचा अग्निस्तंभ यांनी लोकांसमोरून आपले स्थान सोडले नाही.
- निर्गम १४:१सुमारे इ.स.पू. १४९१
मग याहवेह मोशेला म्हणाले,
- निर्गम १४:२सुमारे इ.स.पू. १४९१
“इस्राएली लोकांस सांग मागे फिरा आणि पी-हाहीरोथ जवळ, मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये, समुद्राजवळ तळ द्या, जो थेट बआल-सफोनासमोर आहे.
- निर्गम १४:३सुमारे इ.स.पू. १४९१
यामुळे फारोहला वाटेल की, इस्राएली लोक देशाभोवती गोंधळून भटकत आहेत, वाळवंटात अडकले आहेत.
- निर्गम १४:४सुमारे इ.स.पू. १४९१
मी फारोहचे मन कठीण करेन, म्हणजे तो त्यांचा पाठलाग करेल. पण फारोह व त्याच्या सैन्याकडून मी माझे गौरव करून घेईन आणि इजिप्तच्या प्रजेला समजेल की, मी याहवेह आहे.” मग इस्राएली लोकांनी तसे केले.
- निर्गम १४:५सुमारे इ.स.पू. १४९१
जेव्हा इजिप्तच्या राजाला सांगितले गेले की ते लोक पळून गेले, फारोहने व त्याच्या अधिकार्यांनी त्यांच्याविषयी आपले मन बदलले व ते म्हणाले, “आपण हे काय केले? आपण इस्राएली लोकांना जाऊ दिले व त्यांची सेवा गमावली!”
- निर्गम १४:६सुमारे इ.स.पू. १४९१
मग त्याने ताबडतोब आपला रथ जोडून आपले सैन्य सोबत घेतले.
- निर्गम १४:७सुमारे इ.स.पू. १४९१
सहाशे सर्वात उत्तम असे रथ व त्याबरोबर इजिप्तचे बाकी सर्व रथ व त्यावरील अधिकारी त्याने घेतले.
- निर्गम १४:८सुमारे इ.स.पू. १४९१
याहवेहने इजिप्तचा राजा फारोह याचे हृदय कठीण केले म्हणून इस्राएली लोक जे मोठ्या धैर्याने इजिप्तमधून जात होते, त्यांचा त्याने पाठलाग केला.
- निर्गम १४:९सुमारे इ.स.पू. १४९१
इजिप्तच्या लोकांनी—फारोहचे सर्व घोडे व रथ, घोडेस्वार व सैन्य यांच्यासह—इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि बआल-सफोनासमोर असलेल्या पी-हाहीरोथ, जिथे ते तळ देऊन होते तिथे त्यांना गाठले.
- निर्गम १४:१०सुमारे इ.स.पू. १४९१
फारोह जसा जवळ आला, इस्राएली लोकांनी पाहिले की इजिप्तचे सैन्य त्यांच्यावर चालून येत आहे. ते फार घाबरले व मोठ्याने याहवेहकडे आरोळी मारली.
- निर्गम १४:११सुमारे इ.स.पू. १४९१
ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले?
- निर्गम १४:१२सुमारे इ.स.पू. १४९१
आम्हाला असेच राहू दे; आम्हाला इजिप्त लोकांची सेवा करू दे, असे आम्ही तुला इजिप्तमध्ये असताना म्हणालो नव्हतो काय? या रानात मरण्याऐवजी इजिप्त लोकांची गुलामी करणे आम्हाला बरे होते!”
- निर्गम १४:१३सुमारे इ.स.पू. १४९१
मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. स्तब्ध राहा व आज याहवेह तुम्हाला अद्भुतरित्या कसे सोडविणार आहे ते पाहा. हे इजिप्तचे लोक जे तुम्हाला आज दिसतात ते पुन्हा दिसणार नाहीत.
- निर्गम १४:१४सुमारे इ.स.पू. १४९१
याहवेह तुमच्यासाठी लढतील; तुम्ही केवळ स्तब्ध राहा.”
- निर्गम १४:१५सुमारे इ.स.पू. १४९१
मग याहवेह मोशेला म्हणाले, “माझ्याकडे का रडतोस? इस्राएली लोकांना पुढे जायला सांग.
- निर्गम १४:१६सुमारे इ.स.पू. १४९१
समुद्रातील पाणी दुभागावे म्हणून तुझ्या हातातील काठी समुद्रावर उगार म्हणजे इस्राएली लोक समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून जातील.
- निर्गम १४:१७सुमारे इ.स.पू. १४९१
मी इजिप्तच्या लोकांची मने कठीण करेन आणि ते त्यांच्यामागे समुद्राच्या आत येतील. मग फारोह, त्याचे सर्व सैनिक, रथ व घोडेस्वार यांच्याकडून मी माझे गौरव करून घेईन.
- निर्गम १४:१८सुमारे इ.स.पू. १४९१
आणि जेव्हा फारोह, त्याचे रथ व त्याचे घोडेस्वार यांच्याकडून मला गौरव मिळेल, तेव्हा इजिप्तचे लोक जाणतील की मी याहवेह आहे.”