- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Moses & The Exodus
God raises up Moses to confront Pharaoh; the ten plagues culminate in Israel's dramatic deliverance from four centuries of bondage.
या कालखंडातील वचने
- निर्गम १४:१९सुमारे इ.स.पू. १४९१
मग परमेश्वराचा दूत, जो इस्राएलांपुढे प्रवास करीत होता, तो आता त्यांच्या मागच्या बाजूला गेला. मेघस्तंभ देखील त्यांच्यापुढून निघून त्यांच्यामागे गेला,
- निर्गम १४:२०सुमारे इ.स.पू. १४९१
आणि इजिप्तचे सैन्य व इस्राएली लोक यांच्यामध्ये आला. त्या रात्रभर मेघांनी एका बाजूने प्रकाश तर दुसर्या बाजूने अंधकार आणला; म्हणून रात्रभर एक दल दुसर्यापर्यंत पोहोचला नाही.
- निर्गम १४:२१सुमारे इ.स.पू. १४९१
मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला आणि याहवेहने रात्रभर पूर्वेचा वारा वाहवून समुद्राचे पाणी मागे हटवून ती कोरडी जमीन केली व पाणी दुभागले.
- निर्गम १४:२२सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा इस्राएली लोक, त्यांच्या उजवी व डावीकडे पाण्याची भिंत उभी असताना, समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत गेले.
- निर्गम १४:२३सुमारे इ.स.पू. १४९१
इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि फारोहचे घोडे, रथ व स्वार त्यांच्यामागे समुद्राच्या मध्ये गेले.
- निर्गम १४:२४सुमारे इ.स.पू. १४९१
पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला.
- निर्गम १४:२५सुमारे इ.स.पू. १४९१
त्यांच्या रथांची चाके गच्च केली की त्यांना पुढे जाणे कठीण होऊ लागले. तेव्हा इजिप्तची लोक म्हणू लागले, “इस्राएलच्या लोकांपासून आपण दूर जाऊ या! कारण याहवेह त्यांच्यावतीने इजिप्तविरुद्ध लढत आहेत.”
- निर्गम १४:२६सुमारे इ.स.पू. १४९१
मग याहवेह मोशेला म्हणाले, “आपला हात समुद्रावर लांब कर म्हणजे समुद्राचे पाणी पूर्ववत होऊन इजिप्तचे सर्व सैन्य, त्यांचे रथ व घोडेस्वार यांच्यावर येईल.”
- निर्गम १४:२७सुमारे इ.स.पू. १४९१
मोशेने आपला हात समुद्रावर लांब केला आणि पहाटेच्या वेळी समुद्र त्याच्या ठिकाणी परत गेला. इजिप्तचे लोक त्याच्याकडे धावत असताना याहवेहने त्यांना समुद्रात बुडवून टाकले.
- निर्गम १४:२८सुमारे इ.स.पू. १४९१
पाणी परत वाहू लागले व फारोहचे सर्व सैन्य, घोडेस्वार व रथ—फारोहचे संपूर्ण सैन्य, ज्यांनी इस्राएली लोकांचा समुद्रामध्ये पाठलाग केला ते पाण्याखाली गेले. त्यांच्यातील एकही जिवंत राहिला नाही.
- निर्गम १४:२९सुमारे इ.स.पू. १४९१
पण इस्राएली लोक कोरड्या जमिनीवरून समुद्र पार करून गेले आणि त्यांच्या उजवीकडे व डावीकडे पाणी भिंतीप्रमाणे उभे राहिले.
- निर्गम १४:३०सुमारे इ.स.पू. १४९१
त्या दिवशी याहवेहने इस्राएलला इजिप्तच्या हातातून सोडविले, इस्राएली लोकांनी इजिप्तचे मेलेले लोक समुद्रकिनार्यावर पडलेले पाहिले.
- निर्गम १४:३१सुमारे इ.स.पू. १४९१
जेव्हा इस्राएली लोकांनी इजिप्तच्या लोकांविरुद्ध आलेला याहवेहचा पराक्रमी हात बघितला, त्यावेळी त्यांना याहवेहचे भय वाटले आणि त्यांनी याहवेह व त्यांचा सेवक मोशे यांच्यावर विश्वास ठेवला.
- निर्गम १५:१सुमारे इ.स.पू. १४९१
नंतर मोशे व इस्राएली लोकांनी याहवेहप्रीत्यर्थ हे गीत गाईले: “मी याहवेहला गीत गाईन, कारण ते अत्युच्च आहेत. घोडे व त्यांचे स्वार त्यांनी समुद्रात फेकले आहेत.
- निर्गम १५:२सुमारे इ.स.पू. १४९१
“याहवेह माझे सामर्थ्य व माझे संरक्षण आहेत; याहवेह माझे तारण झाले आहेत. तेच माझा परमेश्वर आहेत आणि मी त्यांची स्तुती करेन, माझ्या पूर्वजांचे परमेश्वर, मी त्यांचा महिमा वर्णीन.
- निर्गम १५:३सुमारे इ.स.पू. १४९१
याहवेह योद्धा आहेत; याहवेह त्यांचे नाव आहे.
- निर्गम १५:४सुमारे इ.स.पू. १४९१
फारोहचे रथ व सैन्य त्यांनी समुद्रात उलथून टाकले. फारोहचे सर्वोत्तम अधिकारी तांबड्या समुद्रात बुडून गेले.
- निर्गम १५:५सुमारे इ.स.पू. १४९१
खोल पाण्याने त्यांना झाकून टाकले; दगडाप्रमाणे ते खोल तळाशी बुडून गेले.
- निर्गम १५:६सुमारे इ.स.पू. १४९१
हे याहवेह, तुमचा उजवा हात, सामर्थ्याने ऐश्वर्यमान आहे. हे याहवेह तुमच्या उजव्या हाताने, शत्रूला हादरून टाकले.
- निर्गम १५:७सुमारे इ.स.पू. १४९१
“तुमच्या ऐश्वर्याच्या महानतेने तुमच्या विरोधकांना तुम्ही खाली पाडले. स्वैर सोडलेल्या तुमच्या क्रोधाने; भुशाप्रमाणे त्यांना भस्म केले.
- निर्गम १५:८सुमारे इ.स.पू. १४९१
तुमच्या नाकपुड्यांच्या श्वासाने जले एकत्र आली. पाण्याचे प्रवाह भिंतीप्रमाणे उभे राहिले; डोहातील पाणी समुद्राच्या मध्यभागी गोळा झाले.
- निर्गम १५:९सुमारे इ.स.पू. १४९१
शत्रूने फुशारकी मारीत म्हटले, ‘मी पाठलाग करून त्यांच्यावर मात करेन. मी लूट वाटून घेईन; त्यांच्या जिवावर मी तृप्त होईन. मी माझी तलवार उपसेन आणि माझ्या हाताने त्यांचा नाश होईल.’
- निर्गम १५:१०सुमारे इ.स.पू. १४९१
पण तुम्ही आपला श्वास फुंकला, आणि समुद्राने त्यांना झाकून टाकले. ते शीसाप्रमाणे महाजलात बुडून गेले.
- निर्गम १५:११सुमारे इ.स.पू. १४९१
सर्व दैवतांमध्ये हे याहवेह तुमच्यासारखे कोण आहे? पवित्रतेत ऐश्वर्यमान; वैभवात अद्वितीय, आश्चर्यकर्मे करणारे, असे तुमच्यासारखे कोण आहे?”
- निर्गम १५:१२सुमारे इ.स.पू. १४९१
तुम्ही आपला उजवा हात उगारला, आणि पृथ्वीने तुमच्या शत्रूंना गिळून टाकले.