मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Moses & The Exodus

God raises up Moses to confront Pharaoh; the ten plagues culminate in Israel's dramatic deliverance from four centuries of bondage.

415 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. याकोबाबरोबर इजिप्तला गेलेल्या इस्राएलचे पुत्र, जे आपल्या कुटुंबासह गेले, त्यांची नावे ही आहेत:

  2. रऊबेन, शिमओन, लेवी आणि यहूदाह;

  3. इस्साखार, जबुलून आणि बिन्यामीन;

  4. दान आणि नफताली; गाद व आशेर.

  5. याकोबाचे एकूण सत्तर वंशज होते; योसेफ तर आधीच इजिप्तमध्ये गेला होता.

  6. निर्गम १:६सुमारे इ.स.पू. १६३५

    आता योसेफ आणि त्याचे सर्व भाऊ व ती सर्व पिढी मरण पावली.

  7. निर्गम १:७सुमारे इ.स.पू. १६३५

    परंतु इस्राएली लोक अत्यंत फलद्रूप झाले; ते बहुगुणित होऊन त्यांना पुष्कळ संतती झाली आणि त्यांची संख्या वाढून, लवकरच ते इतके असंख्य झाले की संपूर्ण देश त्यांनी व्यापून टाकला.

  8. निर्गम १:८सुमारे इ.स.पू. १६३५

    नंतर एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला, त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता.

  9. निर्गम १:९सुमारे इ.स.पू. १६३५

    त्याने आपल्या लोकांना सांगितले, “पाहा, इस्राएली लोक संख्येने आपल्यापेक्षा जास्त आहेत.

  10. निर्गम १:१०सुमारे इ.स.पू. १६३५

    चला त्यांच्याशी चातुर्याने वागू या, नाहीतर त्यांची संख्या अजून वाढेल, आणि लढाई झाली तर ते आपल्या शत्रूंशी एक होतील आणि देश सोडून जातील.”

  11. निर्गम १:११सुमारे इ.स.पू. १६३५

    म्हणून त्यांनी इस्राएली लोकांवर गुलाम मुकादम ठेवले व त्यांच्याकडून जुलमाने फारोहसाठी पीथोम व रामसेस ही भंडारांची नगरे बांधून घेतली.

  12. निर्गम १:१२सुमारे इ.स.पू. १६३५

    परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले.

  13. निर्गम १:१३सुमारे इ.स.पू. १६३५

    इजिप्तचे लोक इस्राएली लोकांकडून कठोरपणे कष्ट करून घेऊ लागले.

  14. निर्गम १:१४सुमारे इ.स.पू. १६३५

    विटा व चुन्यातील कष्टाच्या कामाने त्यांचे जीवन कठीण केले आणि शेतातील प्रत्येक प्रकारच्या कष्टाच्या कामात त्यांच्याशी इजिप्तचे लोक कठोरतेने वागले.

  15. निर्गम १:१५सुमारे इ.स.पू. १६३५

    इजिप्तच्या राजाने शिफ्राह व पुआह नावाच्या दोन इब्री सुइणींना अशी सूचना दिली की,

  16. निर्गम १:१६सुमारे इ.स.पू. १६३५

    “इब्री स्त्रियांची प्रसूतीच्या तिवईवर मदत करीत असताना जर मुलगा जन्मला तर त्याला मारून टाका, परंतु मुलगी असली तर तिला जगू द्या.”

  17. निर्गम १:१७सुमारे इ.स.पू. १६३५

    पण त्या सुइणी परमेश्वराचे भय धरणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाने सांगितल्याप्रमाणे केले नाही; तर मुलांनाही जिवंत राहू दिले.

  18. निर्गम १:१८सुमारे इ.स.पू. १६३५

    तेव्हा इजिप्तच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही मुलांना का जिवंत राहू दिले?”

  19. निर्गम १:१९सुमारे इ.स.पू. १६३५

    सुइणींनी फारोह राजाला उत्तर दिले, “इब्री स्त्रिया इजिप्तच्या स्त्रियांप्रमाणे नाहीत; त्या सशक्त आहेत आणि आम्ही तिथे पोहचण्या आधीच बाळंत होतात.”

  20. निर्गम १:२०सुमारे इ.स.पू. १६३५

    म्हणून परमेश्वराने त्या सुइणींना आशीर्वाद दिला आणि इस्राएली लोक बहुगुणित झाले व संख्येने फार अधिक झाले.

  21. निर्गम १:२१सुमारे इ.स.पू. १६३५

    या सुइणींनी परमेश्वराचे भय धरल्यामुळे परमेश्वराने त्यांची कुटुंबे स्थापित केली.

  22. निर्गम १:२२सुमारे इ.स.पू. १५७३

    मग फारोहने आपल्या सर्व लोकांना हुकूम दिला, “इब्य्रांना होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्यावा, परंतु प्रत्येक मुलीला जिवंत राहू द्यावे.”

  23. निर्गम २:१सुमारे इ.स.पू. १५७२

    लेवी वंशातील एका पुरुषाने लेवी तरुणीशी विवाह केला.

  24. निर्गम २:२सुमारे इ.स.पू. १५७१

    आणि ती गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. त्या बाळाचे रूप पाहून त्याच्या आईने त्याला तीन महिने लपवून ठेवले.

  25. निर्गम २:३सुमारे इ.स.पू. १५७१

    पण त्यानंतर त्याला ती लपवू शकत नव्हती, तेव्हा तिने त्याच्यासाठी लव्हाळ्याची एक टोपली घेतली, व तिला डांबर आणि चुन्याचा लेप लावला. मग तिने आपल्या बाळाला त्या टोपलीत ठेवले व ती टोपली तिने नाईल नदीच्या काठी लव्हाळ्यात नेऊन ठेवली.