Skip to content

Pharaoh

5 वचने · 1 कुटुंब सदस्य

Pharaoh चा उल्लेख असलेली वचने

  1. म्हणून त्यांनी इस्राएली लोकांवर गुलाम मुकादम ठेवले व त्यांच्याकडून जुलमाने फारोहसाठी पीथोम व रामसेस ही भंडारांची नगरे बांधून घेतली.

  2. सुइणींनी फारोह राजाला उत्तर दिले, “इब्री स्त्रिया इजिप्तच्या स्त्रियांप्रमाणे नाहीत; त्या सशक्त आहेत आणि आम्ही तिथे पोहचण्या आधीच बाळंत होतात.”

  3. मग फारोहने आपल्या सर्व लोकांना हुकूम दिला, “इब्य्रांना होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्यावा, परंतु प्रत्येक मुलीला जिवंत राहू द्यावे.”

  4. फारोहची कन्या नाईल नदीवर स्नान करण्यासाठी गेली व तिच्या दासी नदीच्या कडेने चालत होत्या. तिने लव्हाळ्याजवळ एक टोपली पाहिली; तेव्हा ती टोपली आणण्यासाठी तिने आपल्या एका दासीला पाठविले.

  5. जेव्हा फारोहने हे ऐकले, त्याने मोशेला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मोशे फारोहपासून पळून मिद्यानास राहवयाला गेला, तिथे जाऊन तो एका विहिरीजवळ बसला.