Skip to content

Afflictions बद्दल बायबलमधील वचने

106 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले, “तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश अत्यंत वाढवेन; वेदनांनी तू तुझ्या संतानास जन्म देशील, तुझ्या पतीकडे तुझी ओढ राहील, आणि तो तुजवर सत्ता गाजवील.”

  2. नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता, “तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे; तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील.

  3. भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील, आणि तू शेतातील पीक खाशील.

  4. ज्यामधून तू घडविला गेलास त्या मातीत परत जाऊन मिळेपर्यंत तू घाम गाळून अन्न खाशील, कारण तू माती आहेस आणि तू मातीतच परत जाऊन मिळशील.”

  5. मग याहवेहने अब्रामाला म्हटले, “हे निश्चितपणे जाणून घे की, तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल.

  6. परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन. त्यानंतर तुझे वंशज त्या देशातून पुष्कळ धन घेऊन बाहेर पडतील.

  7. तुम्ही जे वाईट योजिले होते, त्यातून परमेश्वराने चांगलेच निर्माण केले; कारण आज मला त्याने या पदावर यासाठी आणले की, मला पुष्कळ लोकांचे प्राण वाचविता यावेत.

  8. म्हणून त्यांनी इस्राएली लोकांवर गुलाम मुकादम ठेवले व त्यांच्याकडून जुलमाने फारोहसाठी पीथोम व रामसेस ही भंडारांची नगरे बांधून घेतली.

  9. परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले.

  10. तुमच्यापैकी अगदी शेवटचा देह या रानात पडेपर्यंत तुमची लेकरे तुमच्या अविश्वासूपणाचे परिणाम भोगत चाळीस वर्षे मेंढपाळ म्हणून राहतील.

  11. तेव्हा तुम्हाला हे समजावे की, जसा पिता आपल्या पुत्राला शिस्त लावतो तसे याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला शिस्त लावतात.

  12. विषारी सापाचा आणि विंचवांचा धोका असलेल्या अफाट व भयानक रानातून व उष्ण आणि कोरड्या भूमीतून त्यांनी तुम्हाला आणले. शुष्क भूमीत खडक फोडून तुम्हाला पाणी दिले.

  13. त्यांनी तुम्हाला रानात खावयास मान्ना दिला, जो तुमच्या पूर्वजांना कधीच माहीत नव्हता, यासाठी की त्यांनी तुम्हाला नम्र करावे आणि तुमची परीक्षा घ्यावी, जेणेकरून शेवटी तुमचे भले व्हावे.

  14. परंतु हे कृत्य करून तू याहवेहचा भयंकर अनादर केला आहेस, या कारणाने तुझ्यापासून जन्मलेला मुलगा मरण पावेल.”

  15. अलीशा हे सांगत असतानाच तो दूत खाली त्याच्याजवळ आला. राजा म्हणाला, “हे अरिष्ट याहवेहकडून आहे. तेव्हा मी याहवेहची अजून वाट का पाहावी?”

  16. “तर सत्य हे आहे की ही परिस्थिती केवळ आपल्याच वाईट कृत्यांमुळे आणि घृणास्पद अपराधांमुळे आपल्यावर आली आहे. असे असूनही, आमच्या परमेश्वराने आमच्या अपराधास योग्य शिक्षेपेक्षा कमी शिक्षा देऊन हा भाग आमच्या स्वाधीन केला आहेस

  17. मी असे पाहिले आहे की, जे दुष्टाईची नांगरणी करतात आणि दुःख पेरतात तेच त्यांची कापणी करतात.

  18. कारण कष्ट मातीतून वाढत नाही, आणि संकट सुद्धा जमिनीतून उगवत नाहीत.

  19. खरोखर जशा अग्नीच्या ठिणग्या वर उडतात तसा मनुष्यही कष्टासाठी जन्मला आहे.

  20. “परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको.

  21. “जर त्यांनी येऊन तुला बंदिवान केले व न्यायसभा बोलावली, तर त्यांना कोण प्रतिबंध करू शकेल?

  22. “स्त्रीपासून जन्मलेल्या मानवाचे जीवन, अल्पकालीन व त्रासाने भरलेले आहे.

  23. खचितच, हे परमेश्वरा, तुम्ही मला झिजवून टाकले आहे; तुम्ही माझे घरदार उजाड केले आहे.

  24. तुम्ही मला अगदी शुष्क असे केले आहे—आणि तेच माझे साक्षीदार आहेत. माझी ओसाडी उठून माझ्याविरुद्ध साक्ष देते.

  25. परमेश्वर माझ्यावर तुटून पडतात आणि आपल्या क्रोधाने मला फाडून टाकतात, आणि माझ्यावर दात खातात; माझे विरोधी माझ्यावर कडक नजर लावून आहेत.