मुख्य मजकुरावर जा

Afflictions बद्दल बायबलमधील वचने: Often severe

14 वचने · 21 पैलू

Often severe बद्दल वचने

  1. खचितच, हे परमेश्वरा, तुम्ही मला झिजवून टाकले आहे; तुम्ही माझे घरदार उजाड केले आहे.

  2. तुम्ही मला अगदी शुष्क असे केले आहे—आणि तेच माझे साक्षीदार आहेत. माझी ओसाडी उठून माझ्याविरुद्ध साक्ष देते.

  3. परमेश्वर माझ्यावर तुटून पडतात आणि आपल्या क्रोधाने मला फाडून टाकतात, आणि माझ्यावर दात खातात; माझे विरोधी माझ्यावर कडक नजर लावून आहेत.

  4. ते आपले मुख उघडून माझी थट्टा करतात; तिरस्काराने ते माझ्या गालावर मारतात. आणि माझ्याविरुद्ध एकजूट करतात.

  5. परमेश्वराने मला देवहीनांच्‍या स्वाधीन केले आहे आणि दुष्टांच्या तावडीत सोपविले आहे.

  6. मी सुखात राहत होतो, परंतु त्यांनी मला विखरून टाकले आहे. माझ्या मानेला पकडून त्यांनी माझा चुराडा केला आहे. त्यांनी मला त्यांचा निशाणा म्हणून केले आहे;

  7. त्यांचे बाण माझ्या सभोवती आहेत. दया विरहित ते माझी आतडी छेदतात आणि माझे पित्त भूमीवर ओततात.

  8. पुनः पुनः ते माझ्यावर हल्ला करतात; एखाद्या योद्ध्यांप्रमाणे ते माझ्यावर धावून येतात.

  9. “मी गोणपाटाने माझे शरीर झाकले आहे आणि माझे डोके धुळीला मिळविले आहे.

  10. रडून रडून माझा चेहरा लाल झाला आहे, आणि माझ्या डोळ्यांभोवती काळे डाग पडले आहेत.

  11. तुमच्या गर्जणार्‍या धबधब्याप्रमाणे, सागर सागराला आव्हान करतो; तुमच्या सर्व लाटा व त्यांचा कल्लोळ माझ्यावर झपाटून आदळत आहेत.

  12. तुम्ही लोकांना आमची डोकी तुडवून जाऊ दिले; आम्ही अग्नी आणि प्रलय यामधून गेलो, परंतु तुम्ही आम्हाला बाहेर काढून समृद्ध भूमीवर आणले आहे.

  13. तुम्ही मला खोलवर, समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिले आणि प्रवाहाने मला घेरले; आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळ यांनी मला झाकून टाकले.

  14. मी म्हटले, “महाराज, ते तुम्हाला माहीत आहे.” तेव्हा ते म्हणाले, “जे महान संकटातून निभावून येतात, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकर्‍याच्या रक्ताने धुऊन शुभ्र केले आहेत.