Afflictions बद्दल बायबलमधील वचने: God appoints
God appoints बद्दल वचने
अलीशा हे सांगत असतानाच तो दूत खाली त्याच्याजवळ आला. राजा म्हणाला, “हे अरिष्ट याहवेहकडून आहे. तेव्हा मी याहवेहची अजून वाट का पाहावी?”
कारण कष्ट मातीतून वाढत नाही, आणि संकट सुद्धा जमिनीतून उगवत नाहीत.
“परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको.
तुम्ही आम्हाला कारागृहात आणले आणि आमच्या पाठीवर भारी ओझी लादली.
नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो, तेव्हा लोक घाबरत नाही काय? शहरात विपत्ती आली तर, ती याहवेहने घडवून आणली नाही काय?
ऐका! याहवेह नगराला हाक मारीत आहेत— आणि तुमच्या नावाचे भय बाळगणे हे ज्ञान आहे— “काठी आणि त्यास नियुक्त करणाऱ्याचे ऐका.