मुख्य मजकुरावर जा

Afflictions बद्दल बायबलमधील वचने: Of saints, end in joy and blessedness

7 वचने · 21 पैलू

Of saints, end in joy and blessedness बद्दल वचने

  1. जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील.

  2. जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.

  3. याहवेहच्या कृपेचे वर्ष आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

  4. सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.

  5. धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल.

  6. परंतु ख्रिस्ताच्या दुःखात जेवढे तुम्हाला सहभागी होता येईल तेवढे होऊन आनंद करा, म्हणजे ज्यावेळी त्यांचे गौरव प्रकट होईल त्यावेळी तुम्ही अतिआनंदीत व्हाल.

  7. जर ख्रिस्ताच्या नावामुळे तुमचा अपमान झाला असेल तर तुम्ही धन्य, कारण गौरवाचा आत्मा म्हणजेच परमेश्वराचा आत्मा तुम्हावर येऊन स्थिरावला आहे.