मुख्य मजकुरावर जा

Afflictions बद्दल बायबलमधील वचने: Frequently terminate in good

8 वचने · 21 पैलू

Frequently terminate in good बद्दल वचने

  1. तुम्ही जे वाईट योजिले होते, त्यातून परमेश्वराने चांगलेच निर्माण केले; कारण आज मला त्याने या पदावर यासाठी आणले की, मला पुष्कळ लोकांचे प्राण वाचविता यावेत.

  2. म्हणून त्यांनी इस्राएली लोकांवर गुलाम मुकादम ठेवले व त्यांच्याकडून जुलमाने फारोहसाठी पीथोम व रामसेस ही भंडारांची नगरे बांधून घेतली.

  3. परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले.

  4. विषारी सापाचा आणि विंचवांचा धोका असलेल्या अफाट व भयानक रानातून व उष्ण आणि कोरड्या भूमीतून त्यांनी तुम्हाला आणले. शुष्क भूमीत खडक फोडून तुम्हाला पाणी दिले.

  5. त्यांनी तुम्हाला रानात खावयास मान्ना दिला, जो तुमच्या पूर्वजांना कधीच माहीत नव्हता, यासाठी की त्यांनी तुम्हाला नम्र करावे आणि तुमची परीक्षा घ्यावी, जेणेकरून शेवटी तुमचे भले व्हावे.

  6. “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘हे उत्तम अंजीर यहूदीयातून बंदिवासात पाठवलेल्यांचे प्रतीक आहे, ज्यांना मी या ठिकाणातून खास्द्यांच्या देशामध्ये रवाना केले आहे.

  7. त्यांचे बरे होईल याकडे माझे लक्ष राहील, आणि मी त्यांना इकडे परत आणेन, मी त्यांना उभारेन आणि त्यांना उद्ध्वस्त करणार नाही; मी त्यांना रोपीन, उपटून टाकणार नाही.

  8. माझ्या काठीखालून तुम्ही जात असता मी बारकाईने तुम्हाला पाहीन आणि तुम्हाला कराराच्या बंधनात आणेन.