मुख्य मजकुरावर जा

Afflictions बद्दल बायबलमधील वचने

106 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते आपले मुख उघडून माझी थट्टा करतात; तिरस्काराने ते माझ्या गालावर मारतात. आणि माझ्याविरुद्ध एकजूट करतात.

  2. परमेश्वराने मला देवहीनांच्‍या स्वाधीन केले आहे आणि दुष्टांच्या तावडीत सोपविले आहे.

  3. मी सुखात राहत होतो, परंतु त्यांनी मला विखरून टाकले आहे. माझ्या मानेला पकडून त्यांनी माझा चुराडा केला आहे. त्यांनी मला त्यांचा निशाणा म्हणून केले आहे;

  4. त्यांचे बाण माझ्या सभोवती आहेत. दया विरहित ते माझी आतडी छेदतात आणि माझे पित्त भूमीवर ओततात.

  5. पुनः पुनः ते माझ्यावर हल्ला करतात; एखाद्या योद्ध्यांप्रमाणे ते माझ्यावर धावून येतात.

  6. “मी गोणपाटाने माझे शरीर झाकले आहे आणि माझे डोके धुळीला मिळविले आहे.

  7. रडून रडून माझा चेहरा लाल झाला आहे, आणि माझ्या डोळ्यांभोवती काळे डाग पडले आहेत.

  8. तारुण्याचा जो जोम त्याच्या हाडात भरलेला आहे तो त्याच्याबरोबरच धुळीत मिळेल.

  9. त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो, पण त्यांची कृपा जन्मभर राहते. विलाप करणे केवळ रात्रभर राहील, परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल.

  10. तुमच्या गर्जणार्‍या धबधब्याप्रमाणे, सागर सागराला आव्हान करतो; तुमच्या सर्व लाटा व त्यांचा कल्लोळ माझ्यावर झपाटून आदळत आहेत.

  11. तुम्ही आम्हाला कारागृहात आणले आणि आमच्या पाठीवर भारी ओझी लादली.

  12. तुम्ही लोकांना आमची डोकी तुडवून जाऊ दिले; आम्ही अग्नी आणि प्रलय यामधून गेलो, परंतु तुम्ही आम्हाला बाहेर काढून समृद्ध भूमीवर आणले आहे.

  13. तरी देखील परमेश्वर दयाळूच राहिले; त्यांच्या पापांची त्यांनी क्षमा केली आणि त्या सर्वांचाच नाश केला नाही; वारंवार त्यांनी आपला क्रोध आवरला आणि तो पराकोटीला जाऊ दिला नाही.

  14. कारण ते केवळ वार्‍याच्या झुळकेप्रमाणे क्षणात नाहीसे होणारे मर्त्य मानव आहेत, याचे त्यांना स्मरण झाले.

  15. तुम्ही त्यांना दुःखाच्या भाकरीचा आहार खाऊ घातला; वाट्या भरून अश्रूंचे पेय त्यांना पाजले.

  16. “जर त्याच्या मुलांनी माझ्या नियमांचा त्याग केला आणि माझे विधी पाळले नाहीत,

  17. माझ्या आज्ञेचे पालन केले नाही आणि माझे नियम भंग केले,

  18. मी त्यांच्या पापांचा छडीने समाचार घेईन, व दुष्कृत्यांसाठी चाबकाच्या फटकार्‍यांची शिक्षा करेन.

  19. ते सर्वदाच दोष देत राहणार नाहीत, व त्यांचा क्रोध सर्वकाळ टिकून ठेवत नाहीत.

  20. ते आपल्या अपराधास यथायोग्य असा दंड देत नाहीत, अथवा आपल्या कुकृत्याच्या प्रमाणात प्रतिफळ देत नाहीत.

  21. बरेचदा परमेश्वराने त्यांना सोडविले, तरी त्यांच्याविरुद्ध ते बंडखोरी करीत राहिले आणि शेवटी त्यांच्याच पापामुळे ते नाश पावले.

  22. असे असतानाही परमेश्वराने त्यांच्या यातनांची दखल घेतली आणि त्यांचा आक्रोश ऐकला;

  23. त्यांच्याकरिता त्यांनी आपल्या कराराचे स्मरण केले, आणि त्यांच्या महान प्रीतीमुळे त्यांचे अंतःकरण द्रवले.

  24. त्यांना बंदिवासात नेलेल्या शत्रूंच्या मनात त्यांच्याकरिता कृपा उत्पन्न केली.

  25. हे याहवेह, तुमचे निर्णय अगदी न्याय्य आहेत, हे मला माहीत आहे; सत्यतेने तुम्ही मला शिक्षा दिली;