मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Moses & The Exodus

God raises up Moses to confront Pharaoh; the ten plagues culminate in Israel's dramatic deliverance from four centuries of bondage.

415 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. निर्गम १२:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    “बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सैन्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने तो पाळावा.

  2. निर्गम १२:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    पहिल्या महिन्यात चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी.

  3. निर्गम १२:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    या सात दिवसात तुमच्या घरात खमीर सापडू नये. आणि कोणीही, तो परदेशी असो वा देशात जन्मलेला असो, जो खमीर घातलेले पदार्थ खाईल तर त्याला इस्राएलाच्या समाजातून वाळीत टाकले जावे.

  4. निर्गम १२:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    खमीर घातलेले काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्ही बेखमीर भाकरीच खावी.”

  5. निर्गम १२:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशेने इस्राएलातील वडीलजनांना बोलाविले व म्हटले, “तुम्ही लगेच जा व आपआपल्या कुटुंबाप्रमाणे कोकरू निवडून घ्या व वल्हांडणाच्या कोकराचा वध करा.

  6. निर्गम १२:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    एजोबाची जुडी घेऊन ती पात्रात घेतलेल्या रक्तात बुडवा व त्याने ते रक्त घराच्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर लावा. तुम्हापैकी कोणीही सकाळ होईपर्यंत आपल्या घराबाहेर पडू नये.

  7. निर्गम १२:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    कारण याहवेह या देशात संचार करतील व इजिप्तवासियांचा संहार करतील. पण ज्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर रक्त दिसेल, याहवेह त्या घराला ओलांडून पुढे जातील व विनाशकाला तुम्हाला मारण्यास तुमच्या घरात येऊ देणार नाहीत.

  8. निर्गम १२:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    “तुमच्यासाठी व तुमच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा.

  9. निर्गम १२:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    वचन दिल्याप्रमाणे जो देश याहवेह तुम्हाला देणार आहेत, त्या देशात तुम्ही जाल, तिथेही हा विधी पाळावा.

  10. निर्गम १२:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    जेव्हा तुमची लेकरे तुम्हाला विचारतील, ‘या विधीचा अर्थ काय आहे?’

  11. निर्गम १२:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    तेव्हा त्यांना सांगा, ‘हा याहवेहसाठी वल्हांडणाचा यज्ञ आहे, ज्यांनी इजिप्तच्या लोकांचा संहार करून त्यांचा नाश केला, आणि इस्राएली लोकांची घरे ओलांडून गेले आणि आम्हाला वाचविले.’ ” तेव्हा लोकांनी आपली मस्तके नमवून त्यांना नमन केले व त्यांची आराधना केली.

  12. निर्गम १२:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेहने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.

  13. निर्गम १२:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    मध्यरात्रीत याहवेहने इजिप्त देशातील प्रथम जन्मलेले सर्व मारून टाकले. सिंहासनावर बसणार्‍या फारोहच्या प्रथम पुत्रापासून तुरुंगात असलेल्या कैद्याच्या प्रथम जन्मलेल्या पुत्रापर्यंत, जनावरांचे प्रथम जन्मलेले वत्स देखील मारून टाकले.

  14. निर्गम १२:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    तेव्हा फारोह, त्याचे अधिकारी व सर्व इजिप्तचे लोक रात्री जागे झाले आणि इजिप्तमध्ये मोठा आकांत झाला, कारण ज्या घरात मृत्यू झाला नाही, असे एकही घर नव्हते.

  15. निर्गम १२:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    तेव्हा फारोहने मोशे व अहरोन यांना रात्री बोलावून म्हटले, “उठा! तुम्ही व इस्राएली लोक माझ्या लोकांना सोडून जा! जा, आणि तुम्ही मागितल्याप्रमाणे याहवेहची उपासना करा.

  16. निर्गम १२:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    तुमची शेरडेमेंढरे आणि गुरे घ्या आणि निघून जा आणि मलाही आशीर्वाद द्या.”

  17. निर्गम १२:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    इस्राएली लोक देशाबाहेर त्वरेने जावे म्हणून इजिप्तच्या लोकांनी त्यांना विनंती केली. कारण ते म्हणाले, “नाहीतर आम्ही सर्व मरून जाऊ!”

  18. निर्गम १२:३४सुमारे इ.स.पू. १४९१

    मग इस्राएली लोकांनी खमीर घालण्यापूर्वी कणीक परातीसह कापडात बांधून खांद्यावर टाकली.

  19. निर्गम १२:३५सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशेने सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी इजिप्तच्या लोकांकडून चांदीचे व सोन्याचे दागिने व कपडे मागून घेतले.

  20. निर्गम १२:३६सुमारे इ.स.पू. १४९१

    इजिप्तचे लोक इस्राएली लोकांवर कृपादृष्टी करतील असे याहवेहने केले आणि जे काही त्यांनी मागितले ते सर्व त्यांनी त्यांना दिले; अशाप्रकारे त्यांनी इजिप्तच्या लोकांना लुटले.

  21. निर्गम १२:३७सुमारे इ.स.पू. १४९१

    इस्राएल लोकांनी रामसेस पासून ते सुक्कोथ पर्यंत प्रवास केला. स्त्रिया व लेकरे या खेरीज सुमारे सहा लाख पुरुष पायी चालणारे होते.

  22. निर्गम १२:३८सुमारे इ.स.पू. १४९१

    इतर पुष्कळ लोकसुद्धा त्यांच्याबरोबर निघाले होते, त्याचप्रमाणे शेरडेमेंढरांचे कळप व जनावरेही होती.

  23. निर्गम १२:३९सुमारे इ.स.पू. १४९१

    जी कणीक इस्राएल लोकांनी इजिप्तमधून बरोबर आणली होती, त्याच्या त्यांनी भाकरी भाजल्या. ते कणीक बेखमीर होते, कारण जेव्हा त्यांना इजिप्तमधून घालवून दिले, स्वतःसाठी अन्न तयार करावयाला वेळ नव्हता.

  24. निर्गम १२:४०सुमारे इ.स.पू. १४९१

    इस्राएली लोक इजिप्तमध्ये राहिले तो कालावधी चारशेतीस वर्षांचा होता.

  25. निर्गम १२:४१सुमारे इ.स.पू. १४९१

    चारशेतिसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी याहवेहच्या सैन्यांनी इजिप्त देश सोडला.