- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 करिंथकरांस १६:५सुमारे इ.स. ५९
मासेदोनियामधून गेल्यानंतर, मी तुम्हाकडे येईन कारण मीही मासेदोनियामधून जाण्याचा विचार करत आहे.
- 1 करिंथकरांस १६:६सुमारे इ.स. ५९
तेव्हा मी तुमच्याबरोबर बहुतेककरून अधिक काळ, कदाचित हिवाळादेखील घालवेन. मग मी जिथे कुठे जाईन, तिथे माझी रवानगी करण्यात मला तुम्ही मदत करू शकता.
- 1 करिंथकरांस १६:७सुमारे इ.स. ५९
यावेळी तुम्हाला धावती भेट द्यावी आणि पुढे जावे अशी माझी इच्छा नाही; तर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्याकडे येऊन काही काळ तुमच्याबरोबर राहावे अशी माझी इच्छा आहे.
- 1 करिंथकरांस १६:८सुमारे इ.स. ५९
पण पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी येथेच म्हणजे इफिसमध्ये राहणार आहे.
- 1 करिंथकरांस १६:९सुमारे इ.स. ५९
कारण माझ्यासाठी चांगले व प्रभावी सेवेचे द्वार उघडले गेले आहे. परंतु तिथे मला विरोध करणारे देखील पुष्कळच आहेत.
- 1 करिंथकरांस १६:१०सुमारे इ.स. ५९
तीमथ्य तुमच्याकडे आला, तर तुमच्याबरोबर असताना त्याला भिण्याची गरज नाही असे त्याला कळू द्या, माझ्यासारखाच तोही प्रभूचे सेवाकार्य करीत आहे.
- 1 करिंथकरांस १६:११सुमारे इ.स. ५९
कोणीही त्याला कमी लेखू नये, शांती प्राप्त झालेला असा त्याला माझ्याकडे परत पाठवा. जे आणखी बंधू इकडे येणार आहेत, त्यांच्याबरोबरच त्यालाही भेटण्यास मी उत्सुक आहे.
- 1 करिंथकरांस १६:१२सुमारे इ.स. ५९
आता बंधू अपुल्लोसासंबंधी: त्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे येण्याची मी त्याला खूप विनंती केली. परंतु आताच तुम्हाकडे यावे अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती, परंतु संधी मिळेल तेव्हा तो येईल.
- 1 करिंथकरांस १६:१३सुमारे इ.स. ५९
जागृत राहा; विश्वासात स्थिर राहा; धैर्याने वागा व खंबीर असा.
- 1 करिंथकरांस १६:१४सुमारे इ.स. ५९
तुम्ही जे काही करता ते प्रीतीने करा.
- 1 करिंथकरांस १६:१५सुमारे इ.स. ५९
तुम्हाला माहीत आहे की स्तेफन आणि त्याचे कुटुंब हे अखया प्रातांमधील पहिले विश्वासू आहेत आणि प्रभूच्या लोकांसाठी सेवाकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे. बंधू व भगिनींनो मी तुम्हालाही विनंती करतो,
- 1 करिंथकरांस १६:१६सुमारे इ.स. ५९
की जे कोणी साहाय्य आणि श्रम करतात अशा लोकांच्या स्वाधीन राहा.
- 1 करिंथकरांस १६:१७सुमारे इ.स. ५९
स्तेफन, फर्तूनात व अखायिक यांच्या येण्याने मला फार आनंद झाला. त्यांच्यामुळे तुमच्यावतीने जे काही कमी होते त्यांची त्यांनी भरपाई केली.
- 1 करिंथकरांस १६:१८सुमारे इ.स. ५९
त्यांनी मला व तुमच्या आत्म्याला खूपच उल्लासित केले आहे. अशा लोकांना मान्यतेची आवश्यकता आहे.
- 1 करिंथकरांस १६:१९सुमारे इ.स. ५९
आशिया प्रांतातील मंडळ्या तुम्हाला शुभेच्छा पाठवितात. अक्विला व प्रिस्किल्ला, व त्यांच्या घरात जमणारी मंडळी तुम्हाला प्रभूमध्ये शुभेच्छा सांगतात.
- 1 करिंथकरांस १६:२०सुमारे इ.स. ५९
तसेच सर्व बंधू व भगिनी तुम्हाला शुभेच्छा देतात. एकमेकांचे पवित्र चुंबनाने अभिवादन करा.
- 1 करिंथकरांस १६:२१सुमारे इ.स. ५९
आता या पत्रातील शुभेच्छा मी पौल, स्वतःच्या हातांनी लिहित आहे.
- 1 करिंथकरांस १६:२२सुमारे इ.स. ५९
जो कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तो शापित असो. हे प्रभू या!
- 1 करिंथकरांस १६:२३सुमारे इ.स. ५९
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हावर असो.
- 1 करिंथकरांस १६:२४सुमारे इ.स. ५९
तुम्हा सर्वांना ख्रिस्त येशूंमध्ये माझी प्रीती असो. आमेन.
- 2 करिंथकरांस १:१सुमारे इ.स. ६०
परमेश्वराच्या इच्छेने, ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल आणि आपला बंधू तीमथ्य याजकडून,
- 2 करिंथकरांस १:२सुमारे इ.स. ६०
परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
- 2 करिंथकरांस १:३सुमारे इ.स. ६०
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता आणि आपला परमेश्वर, करुणेचा पिता आणि सर्व सांत्वन करणारे परमेश्वर यांची स्तुती असो.
- 2 करिंथकरांस १:४सुमारे इ.स. ६०
ते आपल्या सर्व दुःखांमध्ये आपले सांत्वन करतात, यासाठी की जे सांत्वन आम्हाला परमेश्वराकडून मिळाले आहे, त्या सांत्वनाने जे कोणत्याही दुःखात आहेत त्यांचे सांत्वन करावे.
- 2 करिंथकरांस १:५सुमारे इ.स. ६०
ज्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताच्या अगणित दुःखांमध्ये सहभागी आहोत, त्याच प्रकारे आमचे सांत्वनही ख्रिस्ताद्वारे विपुल होते.