- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 थेस्सलनीकाकरांस १:१सुमारे इ.स. ५४
आपले परमेश्वर पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस,
- 1 थेस्सलनीकाकरांस १:२सुमारे इ.स. ५४
आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हाला निरंतर स्मरण करीत, तुमच्या सर्वांबद्दल सतत परमेश्वराचे आभार मानतो.
- 1 थेस्सलनीकाकरांस १:३सुमारे इ.स. ५४
आपले पिता परमेश्वरापुढे तुमचे विश्वासाचे कार्य व प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेचा धीर यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
- 1 थेस्सलनीकाकरांस १:४सुमारे इ.स. ५४
परमेश्वराचे प्रीतीस पात्र माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहीत आहे की परमेश्वराने तुम्हाला निवडले आहे.
- 1 थेस्सलनीकाकरांस १:५सुमारे इ.स. ५४
कारण आमची शुभवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दाने नव्हे, परंतु शक्तीने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण खात्रीने आली. तुमच्याकरिता तुम्हामध्ये तुमच्याबरोबर राहत असताना आम्ही कसे राहिलो हे तुम्हाला माहीतच आहे.
- 1 थेस्सलनीकाकरांस १:६सुमारे इ.स. ५४
पवित्र आत्म्याने जो आनंद तुम्हाला दिला आहे, त्याद्वारे तुम्ही अतिशय क्लेशांमध्ये असतानाही संदेशाचा स्वीकार केला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाले;
- 1 थेस्सलनीकाकरांस १:७सुमारे इ.स. ५४
आणि म्हणूनच मासेदोनिया व अखया येथील सर्व विश्वासणार्यांसाठी तुम्ही आदर्श झाले.
- 1 थेस्सलनीकाकरांस १:८सुमारे इ.स. ५४
प्रभूचा संदेश तुम्हाद्वारे केवळ मासेदोनिया व अखया येथेच घोषित करण्यात आला असे नाही, तर परमेश्वरावरील तुमचा विश्वास सर्वत्र जाहीर झाला आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल काही सांगण्याची आम्हाला गरजच राहिली नाही.
- 1 थेस्सलनीकाकरांस १:९सुमारे इ.स. ५४
कारण ते स्वतः अहवाल देतील की आमचे स्वागत तुम्ही कशाप्रकारे केले आणि जे जिवंत व खरे परमेश्वर आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही मूर्तीपासून कसे दूर झाला आहात.
- 1 थेस्सलनीकाकरांस १:१०सुमारे इ.स. ५४
आणि परमेश्वराचा पुत्र येशू ज्यांना त्यांनी मृतांतून पुनरुत्थित केले, जे येणार्या क्रोधापासून, आपल्याला सोडवितात त्यांची स्वर्गातून येण्याची तुम्ही वाट पाहात आहात.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:१सुमारे इ.स. ५४
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमची भेट घेण्यासाठी येणे काही व्यर्थ ठरले नव्हते हे तुम्हाला माहीतच आहे.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:२सुमारे इ.स. ५४
पूर्वी फिलिप्पैमध्ये आम्हाला दुःख व अपमानकारक वागणूक सहन करावी लागली हे तुम्हाला ठाऊक आहे, परंतु आमच्या परमेश्वराच्या साहाय्याने भयंकर विरोध असतानाही आम्ही परमेश्वराची शुभवार्ता सांगण्याचे धैर्य केले.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:३सुमारे इ.स. ५४
जो बोध आम्ही करतो तो अयोग्य किंवा अशुद्ध हेतूने नव्हे किंवा आम्ही तुमची फसवणूक करावी या उद्देशानेही नव्हे.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:४सुमारे इ.स. ५४
उलट, आम्ही परमेश्वराला मान्य असलेले व जी शुभवार्ता आमच्यावर सोपवून दिली आहे ज्यापुढे बोलतो. आम्ही लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करीत नाही, तर परमेश्वराला करतो जे हृदये पारखणारे आहेत.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:५सुमारे इ.स. ५४
तुम्हाला माहीत आहे की आम्ही कोणाची खुशामत कधीही केली नाही किंवा लोभ लपवण्यासाठी ढोंग केले नाही, परमेश्वर साक्षी आहेत.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:६सुमारे इ.स. ५४
आम्ही लोकांकडून म्हणजे, तुमच्याकडून किंवा दुसर्या कोणाकडूनही स्तुतीची कधीच अपेक्षा केली नाही.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:७सुमारे इ.स. ५४
वास्तविक ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून आमचा अधिकार निश्चितपणे मिळविता आला असता. जशी आई आपल्या लेकरांचे कोमलतेने पालनपोषण करते, त्याचप्रमाणे आम्हीही तुमच्याशी कोमलतेने व्यवहार केला.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:८सुमारे इ.स. ५४
तसेच आम्ही तुमची काळजी घेतली. आम्ही तुमच्यावर एवढी प्रीती केली की आम्ही आनंदाने केवळ परमेश्वराची शुभवार्ताच नव्हे तर आमचे स्वतःचे जीवनही देण्यास तयार होतो.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:९सुमारे इ.स. ५४
बंधू आणि भगिनींनो, आम्ही केलेले कष्ट आणि परिश्रम हे तुम्हाला आठवत असतील; परमेश्वराच्या शुभवार्तेचा प्रचार तुम्हाला करीत असताना आमचे ओझे कोणावर पडू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम केले.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:१०सुमारे इ.स. ५४
तुमच्यातील प्रत्येकाशी आमचे वागणे पवित्र, नीतीने व निर्दोष होते, याला तुम्ही विश्वासणारे स्वतः आणि परमेश्वर साक्षी आहेत.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:११सुमारे इ.स. ५४
पिता स्वतःच्या मुलांशी वागतो त्याचप्रमाणे आम्ही तुमच्या प्रत्येकाशी वागलो, हे तुम्हाला माहीत आहे,
- 1 थेस्सलनीकाकरांस २:१२सुमारे इ.स. ५४
तुम्हाला उत्तेजन, सांत्वन आणि विनंती करून सांगतो की ज्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या गौरवी राज्यात बोलाविले आहे, त्यांना शोभेल असे जीवन जगा.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:१३सुमारे इ.स. ५४
परमेश्वराचे आम्ही निरंतर आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून परमेश्वराचे वचन ऐकले, तेव्हा तुम्ही ते मानवाचे म्हणून नाही, परंतु परमेश्वराचे सत्यवचन म्हणून स्वीकारले, जे वास्तविकतेचे आहे आणि तेच तुमच्यामध्ये कार्य करीत आहे.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:१४सुमारे इ.स. ५४
कारण बंधू आणि भगिनींनो, यहूदीयामध्ये तुम्ही ख्रिस्त येशूंमध्ये असलेल्या परमेश्वराच्या मंडळ्यांचे अनुकरण करणारे झालात म्हणून स्वतःच्या बांधवांकडून तुम्हाला दुःख सहन करावे लागले, त्याच गोष्टी यहूदी लोकांकडूनही या मंडळ्यांना सहन कराव्या लागल्या.
- 1 थेस्सलनीकाकरांस २:१५सुमारे इ.स. ५४
त्यांनी प्रभू येशूंना आणि संदेष्ट्यांना ठार मारले; आणि आम्हालाही हाकलून लावले. त्यांनी परमेश्वराला नाखुश केले आणि सर्वांचे विरोधी झाले,