मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 करिंथकरांस १:१सुमारे इ.स. ५९

    परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित होण्यासाठी बोलविलेला पौल आणि बंधू सोस्थनेस यांच्याकडून,

  2. 1 करिंथकरांस १:२सुमारे इ.स. ५९

    करिंथ येथील परमेश्वराच्या मंडळीस, जे ख्रिस्त येशूंमध्ये पवित्र केलेले व पवित्र होण्यासाठी बोलाविलेले, तसेच ख्रिस्त येशू आपले व त्यांचे प्रभू यांचे नाव घेऊन प्रत्येक ठिकाणी धावा करतात त्या सर्वांस:

  3. 1 करिंथकरांस १:३सुमारे इ.स. ५९

    परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.

  4. 1 करिंथकरांस १:४सुमारे इ.स. ५९

    ख्रिस्त येशूंमध्ये जी कृपा तुम्हाला दिली, त्याबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.

  5. 1 करिंथकरांस १:५सुमारे इ.स. ५९

    त्यांच्यामध्ये तुम्ही सर्वप्रकारे संपन्न झाला आहात—सर्वप्रकारच्या भाषणात व सर्व ज्ञानात समृद्ध झाला आहात.

  6. 1 करिंथकरांस १:६सुमारे इ.स. ५९

    ख्रिस्ताविषयीची जी आमची साक्ष आहे त्याची परमेश्वर तुमच्यामध्ये पुष्टी करीत आहे.

  7. 1 करिंथकरांस १:७सुमारे इ.स. ५९

    यास्तव तुम्ही आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहत असताना आध्यात्मिक दानाची तुम्हाला काहीच उणीव पडलेली नाही.

  8. 1 करिंथकरांस १:८सुमारे इ.स. ५९

    प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असे असावे म्हणून तेच तुम्हाला शेवटपर्यंत स्थिर करतील.

  9. 1 करिंथकरांस १:९सुमारे इ.स. ५९

    परमेश्वर ज्यांनी त्यांचा पुत्र आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या सहभागितेत तुम्हाला बोलाविले ते विश्वसनीय आहेत.

  10. 1 करिंथकरांस १:१०सुमारे इ.स. ५९

    माझ्या प्रिय बंधूंनो व भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावास्तव मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही जे काही बोलता त्यामध्ये एकमत असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये, मनाने आणि विचाराने तुम्ही सर्व एकतेमध्ये परिपूर्ण असावे.

  11. 1 करिंथकरांस १:११सुमारे इ.स. ५९

    कारण बंधूंनो व भगिनींनो, तुम्हामध्ये भांडणे आहेत, असे मला ख्लोवेच्या घरातील काही लोकांनी सांगितले आहे.

  12. 1 करिंथकरांस १:१२सुमारे इ.स. ५९

    माझ्या म्हणण्याचा अर्थ हा: तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे,” तर कोणी “मी अपुल्लोसाचा” आणखी कोणी “मी केफाचा अनुयायी आहे,” आणखी कोणी “मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे.”

  13. 1 करिंथकरांस १:१३सुमारे इ.स. ५९

    ख्रिस्त विभागले गेले आहेत का? तुमच्यासाठी पौलाला क्रूसावर दिले होते का? तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावात झाला होता का?

  14. 1 करिंथकरांस १:१४सुमारे इ.स. ५९

    तुमच्यातील क्रिस्प आणि गायस यांच्याशिवाय मी इतर कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.

  15. 1 करिंथकरांस १:१५सुमारे इ.स. ५९

    त्यामुळे तुम्हापैकी कोणालाही, तुमचा बाप्तिस्मा माझ्या नावात झाला असे म्हणता येणार नाही.

  16. 1 करिंथकरांस १:१६सुमारे इ.स. ५९

    होय! मी स्तेफनाच्या कुटुंबीयांचाही बाप्तिस्मा केला, पण त्यांच्याशिवाय दुसर्‍या कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही.

  17. 1 करिंथकरांस १:१७सुमारे इ.स. ५९

    कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्याकरिता नव्हे, तर शुभवार्तेचा प्रचार करण्याकरिता पाठविले आहे—वाक्पटुतेने व ज्ञानाने नव्हे, यामुळे असे न होवो की ख्रिस्ताच्या क्रूसाचे सामर्थ्य रिक्त व्हावे.

  18. 1 करिंथकरांस १:१८सुमारे इ.स. ५९

    क्रूसाचा संदेश नाश पावत असलेल्यांना मूर्खपणाचा वाटतो, तरी तारणाची प्राप्ती होत आहे अशा आपल्यासाठी तो परमेश्वराचे सामर्थ्य असा आहे.

  19. 1 करिंथकरांस १:१९सुमारे इ.स. ५९

    कारण असे लिहिले आहे: “ज्ञानी लोकांचे ज्ञान मी नष्ट करेन. बुद्धिमानाची बुद्धी मी निष्फळ करेन.”

  20. 1 करिंथकरांस १:२०सुमारे इ.स. ५९

    मग ज्ञानी लोक कुठे आहेत? नियमशास्त्र शिक्षक कुठे आहेत? या युगाचे तत्वज्ञानी कुठे आहेत? जे मूर्ख आहेत त्यांना परमेश्वराने जगाचे ज्ञान असे केले नाही का?

  21. 1 करिंथकरांस १:२१सुमारे इ.स. ५९

    कारण परमेश्वराच्या ज्ञानामध्ये असतानाही जगाला त्याच्या ज्ञानाद्वारे परमेश्वराला ओळखता आले नाही, जो प्रचार मुर्खपणाद्वारे केला होता त्यावर विश्वास ठेवणार्‍या सर्वांचे परमेश्वराने आनंदाने तारण केले.

  22. 1 करिंथकरांस १:२२सुमारे इ.स. ५९

    यहूदी लोक चिन्हाची मागणी करतात; आणि ग्रीक लोक ज्ञान शोधतात.

  23. 1 करिंथकरांस १:२३सुमारे इ.स. ५९

    पण आम्ही क्रूसावर खिळलेल्या ख्रिस्ताला गाजवितो: जो यहूदीयांना अडखळण आणि गैरयहूदीयांना मूर्खपणा असा आहे,

  24. 1 करिंथकरांस १:२४सुमारे इ.स. ५९

    परंतु परमेश्वराने ज्यांना बोलाविले आहे, त्या यहूदी आणि ग्रीक, या दोघांनाही ख्रिस्त हे परमेश्वराचे सामर्थ्य आणि ज्ञान आहे.

  25. 1 करिंथकरांस १:२५सुमारे इ.स. ५९

    परमेश्वराची मूर्खता मानवी शहाणपणापेक्षा अधिक सुज्ञपणाची आहे, आणि परमेश्वराचा अशक्तपणा मनुष्याच्या सामर्थ्यापेक्षा बलवान आहे.