- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- तीता १:१सुमारे इ.स. ६५
परमेश्वराने निवडलेल्या लोकांच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी आणि त्यांना भक्तीच्या मार्गावर नेणार्या सत्याच्या ज्ञानासाठी नेमलेला परमेश्वराचा दास व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून,
- तीता १:२सुमारे इ.स. ६५
परमेश्वर जे कधीही खोटे बोलत नाहीत, त्यांनी सार्वकालिक जीवनाच्या आशेचे अभिवचन सुरवातीच्या काळाच्या आधीपासून दिले
- तीता १:३सुमारे इ.स. ६५
आणि आता त्यांच्या नियोजित वेळेनुसार प्रचाराद्वारे ते प्रकाशात आणले, जे आपल्या तारणार्या परमेश्वराच्या आज्ञेने मला सोपविण्यात आले.
- तीता १:४सुमारे इ.स. ६५
आमच्यासारखाच विश्वासात असलेला माझा खरा पुत्र तीत याला:
- तीता १:५सुमारे इ.स. ६५
मी तुला क्रेता बेटावर सोडले, जेणे करून तू तेथील उर्वरित कार्याची संपूर्ण व्यवस्था करावी आणि माझ्या आज्ञेनुसार प्रत्येक नगरात मंडळीचे वडील नेमावे.
- तीता १:६सुमारे इ.स. ६५
जो निर्दोष आणि एकाच स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वासणारी असून त्यांच्यावर दुराचाराचा व ती अवज्ञा करणारी असल्याचा आरोप नसावा.
- तीता १:७सुमारे इ.स. ६५
अध्यक्ष हे परमेश्वराच्या घराचे कारभारी आहेत म्हणून त्यांचे जीवन निर्दोष असावे. तर स्वच्छंदी अथवा लवकर रागास येणारे, मद्यपी अथवा भांडखोर, किंवा अनीतीने धन मिळविणारे नसावेत.
- तीता १:८सुमारे इ.स. ६५
ते पाहुणचार करण्याची आवड असणारे, चांगल्या गोष्टींवर प्रेम करणारे, इंद्रियदमन करणारे, सरळ, पवित्र आणि शिस्तबद्ध असावे.
- तीता १:९सुमारे इ.स. ६५
त्याने शिकविल्याप्रमाणे विश्वासू संदेश दृढपणे धरून ठेवले पाहिजे, जेणेकरून ते चांगल्या शिकवणीने इतरांना प्रोत्साहन देणारे आणि जे विरोध करतात त्यांचे खंडन करणारे असावे.
- तीता १:१०सुमारे इ.स. ६५
कारण अनावर, व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत, त्यांच्यात विशेषकरून सुंता झालेल्या गटाचे आहेत.
- तीता १:११सुमारे इ.स. ६५
त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; कारण अप्रामाणिक लाभासाठी जे शिकवू नये ते शिकवून ते संपूर्ण घराण्यांची उलथापालथ करीत आहेत.
- तीता १:१२सुमारे इ.स. ६५
त्यांच्याच कोणाएका संदेष्ट्याने सांगितले आहे, “क्रेतीय लोक लबाड, दुष्ट पशू, आळशी खादाड आहेत.”
- तीता १:१३सुमारे इ.स. ६५
हा संदेश अगदी खरा आहे. यास्तव त्यांना कडकपणे ताकीद दे, जेणेकरून ते विश्वासात दृढ होतील,
- तीता १:१४सुमारे इ.स. ६५
यहूदी काल्पनिक कथाकडे आणि सत्याकडे पाठ फिरविलेल्या लोकांच्या आज्ञाकडे दुर्लक्ष करतील.
- तीता १:१५सुमारे इ.स. ६५
शुद्ध लोकांसाठी सर्वगोष्टी शुद्ध आहेत, तर भ्रष्ट आणि विश्वास नसलेल्या लोकांसाठी काहीही शुद्ध नाही. कारण त्यांचे मन आणि विवेकभाव हे दोन्ही अशुद्ध आहेत.
- तीता १:१६सुमारे इ.स. ६५
ते परमेश्वराला ओळखतात असा दावा करतात, परंतु त्यांच्या कृत्याने ते चुकीचे सिद्ध होते. ते घृणास्पद, आज्ञा न पाळणारे आणि कोणत्याही चांगल्या कार्यासाठी अयोग्य आहेत.
- तीता २:१सुमारे इ.स. ६५
शुद्ध शिक्षणास जे धरून आहे तेच तू शिकव.
- तीता २:२सुमारे इ.स. ६५
वयस्क पुरुषांनी नेमस्त, आदरास पात्र, आत्मसंयमी व विश्वास, प्रीती आणि सहनशीलता यामध्ये खंबीर असावे, असे शिक्षण तू त्यांना दे.
- तीता २:३सुमारे इ.स. ६५
त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्या असाव्या;
- तीता २:४सुमारे इ.स. ६५
म्हणजे त्या तरुण स्त्रियांस त्यांच्या पतींवर आणि मुलांवर प्रीती करण्यास,
- तीता २:५सुमारे इ.स. ६५
आत्मसंयमी, शुद्धाचरणी, घरकामात मग्न, मायाळू व आपल्या पतींच्या अधीन राहण्यास शिकविता येईल, म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही.
- तीता २:६सुमारे इ.स. ६५
तसेच, तरुणांनी आत्मसंयमी व्हावे, म्हणून त्यांना प्रोत्साहित कर.
- तीता २:७सुमारे इ.स. ६५
जे चांगले ते करून, तू त्यांना प्रत्येक गोष्टींत कित्ता घालून दे. तुझ्या शिकविण्यात प्रामाणिकपणा, गांभीर्य दाखव.
- तीता २:८सुमारे इ.स. ६५
दोष लावता येणार नाही अशा सद्भाषणाने युक्त तुझी शिकवण असावी; यासाठी की जे तुला विरोध करतील, त्यांना आपल्याविषयी वाईट बोलण्यास जागाच नसल्यामुळे लाज वाटावी.
- तीता २:९सुमारे इ.स. ६५
दासांना असा बोध कर की त्यांनी त्यांच्या धन्याच्या अधीन असावे, त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना उलट उत्तर देऊ नये;